' तिबेटी लोक ज्यांना गौतम बुद्धाचा अवतार मानतात, त्या दलाई लामांची निवड नेमकी कशी होते?

तिबेटी लोक ज्यांना गौतम बुद्धाचा अवतार मानतात, त्या दलाई लामांची निवड नेमकी कशी होते?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तिबेटचे दलाई लामा म्हणजे बौद्ध धर्मातील सगळ्यात महत्त्वाची आणि माननीय व्यक्ती! दलाई लामा होणे ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे, तश्या पात्र व्यक्तीलाच दलाई लामा सारख्या महत्त्वाच्या पदावर बसण्याचा आणि धर्मोपदेश देण्याचा अधिकार दिला जातो.

काही तिबेटी जमातींमध्ये दलाई लामा म्हणजे खुद्द गौतम बुद्धाचा अवतार असल्याचे मानतात.

मग अर्थातच जी व्यक्ती गौतम बुद्धाचा अवतार म्हणून धर्मातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणून समाजात वावरणार आहे, ती व्यक्ती निवडण्याची प्रक्रिया साधी, सरळ कशी असेल!!

दलाई लामांची निवड ही देखील विशिष्ट पद्धतीने केली जाते. दलाई लामा होण्यासाठी एका मोठ्या प्रक्रियेतून तावून सुलाखून बाहेर पडावं लागतं.

 

Dalai-Lama-marathipizza01
tibetanreview.net

 

विद्यमान दलाई लामांचा मृत्यू झाल्यावर पुढील दलाई लामांची निवड ही मतदानाने वा कोणत्या निवडणुकीने घेतली न जाता पुनर्जन्माच्या आधारावर केली जाते हे विशेष!

असे म्हणतात की पुढील धर्मगुरू अर्थात दलाई लामा कोण होणार या संदर्भात विद्यमान धर्मगुरू काही संकेत मागे सोडून जातात. त्या धर्मगुरुंनी मागे सोडलेल्या संकेतांच्या आधारावर ठराविक बालकांची यादी बनवली जाते.

या यादीमध्ये केवळ त्याच बालकांचा समावेश केला जातो ज्यांच्यात काही विशेषता असेल. शिवाय ज्यांचा जन्म विद्यमान दलाई लामांचा मृत्यू झाल्यानंतर ९ महिन्यानंतर झाला असेल. अर्थातच यामागे पुनर्जन्माची संकल्पना आहे.

१९५९ मध्ये तिबेटवर चीनने अधिकार मिळण्यापूर्वी सर्व बालके आसपासच्या भागातुन मिळवली जात असत. पण त्यानंतर मात्र संपूर्ण जगभरामध्ये लामाचा शोध घेतला जाऊ लागला.

 

Dalai-Lama-marathipizza02
chinabuddhismencyclopedia.com

 

१९३३ मध्ये १३ व्या दलाई लामा तुबेतेन ग्यात्सो यांचा मृत्यू झाला होता. यानंतर नवीन दलाई लामाचा शोध घेणे सुरु झाले. या शोधाच्या दरम्यान असे आढळून आले की १३ व्या दलाई लामांचे मृत शरीर दक्षिण दिशेला वळून काही दिवसांमध्येच पूर्व दिशेला सरकू लागले आहे.

असे म्हटले जाते की, ज्या दिशेला त्यांचे मृत शरीर वळले होते, त्या दिशेला विचित्र प्रकारचे ढग दिसू लागले होते. जणू ते त्या दिशेला संकेत देत होते.

या शोध मोहिमेच्या प्रमुखांनी अनेक दिवस ध्यान लावून आणि पूजा करून तिबेटी धर्माच्या पवित्र सरोवरामध्ये अ, क आणि म अक्षरांच्या आकृत्या पाहिल्या, सोबतच त्यांना सोनेरी छत असलेला मठ आणि बाजूला लाल रंगाच्या छपराचे घर दिसले.

वर्षभरानंतर ल्हासातून शोध मोहिमेसाठी निघालेल्या एका दलाने पूर्वेच्या आम्ददो प्रांतामध्ये तसाच एक सोनेरी छत असलेला मठ आणि बाजूला लाल रंगाच्या छपरचे घर पाहिले. याच घरामध्ये एक शेतकऱ्याचा तेनजिन ग्यात्सो नामक एक लहान मुलगा होता.

 

Dalai-Lama-marathipizza03
wordpress.com

 

त्या दलाने या मुलाला शोध मोहिमेच्या प्रमुखांकडे आणले. त्यांनी विविध प्रकारे १३ व्या दलाई लामांचे सर्व संकेत पडताळून पाहिले आणि त्यांची सर्व बाबतीत खात्री पटली.

पुढे हाच मुलगा १४ वा दलाई लामा म्हणून नावारूपास आला.

गमतीचा भाग असा, की या चौदाव्या दलाई लामा यांनी त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याचं काम कठीण केलं आहे.

त्यांनी २००४ साली एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की,

“माझा पुनर्जन्म तिबेटमध्येच होईल असं नाही. मग तिबेट बाहेरील व्यक्तीला दलाई लामा म्हणून चीनचे सरकार स्वीकारेल का? तशी शक्यता कमीच आहे. मग असं झाल्यास सरकारनियुक्त आणि तिबेटच्या जनतेने निवडलेला असे दोन दलाई लामा अस्तित्वात येतील.”

एवढंच नाही, तर चौदावे दलाई लामा तेनजिन ग्यात्सो यांनी असंही म्हटलं आहे, की पुढील दलाई लामा ही एक स्त्री सुद्धा असू शकते.

ही प्रथा पुढे न्यायची की नाही, हे आता इतरांनाच ठरवावं, अशी तेनजिन ग्यात्सो यांची इच्छा आहे…!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?