टीव्हीवरील एखाद्या कार्यक्रमाचा “टीआरपी” जास्त आहे म्हणजे नेमकं काय? तुम्हाला माहित नसलेली ‘माहिती’!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
बऱ्याचदा आपल्या कानावर पडतं, अमुक शो फार पाहिला जातो, त्याचा टीआरपी जास्त आहे. तमुक शो जास्त फेमस नाही, कारण त्याचा टीआरपी कमी आहे.
पण मंडळी कधी विचार केलाय का काय आहे हा टीआरपी? आणि कश्या प्रकारे आपण पाहतो त्या कार्यक्रमांना रेटिंग दिलं जातं, चला जाणून घेऊया.

२-४ वर्षांपूर्वी भारतामध्ये टीआरपी (Television Rating Point) साठी डेटा मिळवण्याचं काम हे TAM Media Research या कंपनीकडे होतं, पण नंतर Broadcast Audience Research Council (BARC) यांनी हे काम स्वत:च्या अखत्यारीत करून घेतलं आणि आता BARC कडून कार्यक्रमांना दिल्या जाणाऱ्या रेटिंग या अधिकृत मानल्या जातात.
टीआरपी म्हणजे ठराविक लोकसंख्येच्या लोकांनी ठराविक वेळेला पाहिलेल्या कार्यक्रमाची टक्केवारी होय!
या रेटिंग साठी डेटा मिळवण्याचं काम केलं जातं रेटिंग मशीनच्या माध्यमातून! या मशीन्सना People’s Meter म्हटले जाते. या मशीन्स कंपनीशी जोडल्या गेलेल्या ठराविक प्रेक्षकांच्या घरी बसवल्या जातात.
या मशीन नजर ठेवतात की प्रेक्षक कोणत्या वेळेला, कोणता कार्यक्रम, किती वेळ पाहतो. या मशीन्स संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या घरी त्यांच्या समंतीनेच बसवल्या जातात.
३० दिवसांनंतर त्या प्रेक्षकाने कोणत्या चॅनेल आणि कार्यक्रम किती वेळ पाहिला याची अंदाजे आकडेवारी उपलब्ध होते.

टीआरपी मिळवण्यासाठी दोन प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात.
पहिली पद्धत म्हणजे – frequency monitoring
या पद्धतीमध्ये वर सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांच्या घरी मशीन्स बसवल्या जातात. या मशीन्स प्रत्येक चॅनेलच्या फ्रिक्वेन्सी समजून घेतात आणि नंतर त्या ठराविक चॅनेलच्या नावामध्ये रेकॉर्ड केलेला डेटा डिकोड करतात. पण या पद्धतीमध्ये एक त्रुटी आहे.
त्रुटी अशी की बऱ्याचदा केबल ऑपरेटर्स टीव्हीला सिग्नल पाठवण्यापूर्वी विविध चॅनेल्सच्या फ्रिक्वेन्सी वारंवार बदलतात. त्यामुळे ठराविक फ्रिक्वेन्सी वरून ठराविक चॅनेलचाच डेटा मशीन रेकॉर्ड करत असले याची खात्री देता येत नाही.

दुसरी पद्धती म्हणजे – picture matching technique
या पद्धतीमध्ये देखील प्रेक्षकांच्या घरी मशीन्स बसवल्या जातात. पण त्या काहीश्या वेगळ्या पद्धतीने काम करतात.
या मशीन्स ठराविक टीव्हीवर पाहिल्या जाणाऱ्या चित्रीकरणाचा संक्षिप्त भाग वारंवार रेकॉर्ड करत असतात. तसेच ठराविक चॅनेलचा डेटा देखील संक्षिप्त चित्र रुपात साठवला जातो.
हा गोळा केलेला डेटा नंतर मेन डेटा बँक मधील डेटाशी जुळवून पाहिला जातो आणि त्यानुसार चॅनेलचे नाव समोर येते आणि कोणता चॅनेल किती वेळ पाहिला त्याची आकडेवारी केली जाते.
अश्याप्रकारे महिन्याभरच डेटा गोळा केल्यानंतर कोणता चॅनेल आणि कोणता कार्यक्रम किती वेळा पाहिला जातो आणि त्याची पॉप्यूलॅरिटी काय हे मिळालेल्या रिझल्टनुसार सादर केले जाते.
त्यानुसार आपल्या चॅनेल आणि एखाद्या ठराविक कार्यक्रमामध्ये सुधारणा कशी आणावी त्याची वेळ बदलली जावी का, या सर्व गोष्टी ठरवल्या जातात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.