' हे १० 'नमुनेदार' शोध सिद्ध करतात की जपान हा विचित्र देश म्हणून का ओळखला जातो!

हे १० ‘नमुनेदार’ शोध सिद्ध करतात की जपान हा विचित्र देश म्हणून का ओळखला जातो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जपान म्हणजे क्रियेटीव्हीटीची खाण आहे जणू! तिकडे सारखं काही न काही नवीन संशोधन होत असतं आणि त्यातून चित्र विचित्र गोष्टी जन्माला येतात आणि मुख्य म्हणजे आपल्याला जरी त्या गोष्टी चित्र विचित्र गोष्टी वाटल्या तरी जपानी मात्र अजिबात न लाजता त्या गोष्टींचा वापर करतात.

संपूर्ण जगात जपान या गोष्टीमुळेच नेहमी चर्चेत राहिला आहे. आज आपण जपान मधील अश्याच काही मजेशीर गोष्टींचा आढावा घेऊया.

 

१. सुपर छत्री

 

japan-crazy-thing-marathipizza01

 

जपानमध्ये जोरात पाऊस पडत असेल तर तेथील लोक सुपर छत्रीचा वापर करणे पसंत करतात, कारण ही छत्री व्यक्तीला डोक्यापासून पायांपर्यंत पूर्णपणे कवर करते. ही छत्री दिसायला जरी विचित्र असली तरी ती खूप उपयुक्त आहे.

 

२. मायक्रोवेवबल पग

 

japan-crazy-thing-marathipizza02

 

सुपर छत्री जपानी लोकांना जोरदार पावसापासून वाचवते. पण जर खूप थंडी जाणवत असेल तर हे लोक मायक्रोवेवबल पगचा वापर करतात, जो अंग गरम करून थंडीपासून बचाव करतो. त्या पगला अंगाशी कवटाळून झोपायचं – म्हणजे थंडी वाजणार नाही – अशी हि एकंदर कल्पना!

 

३. टॉयलेट स्लीपर्स

 

japan-crazy-thing-marathipizza03

 

जपानमध्ये स्वच्छतेचे नियम कडक आहेत. या देशात अस्वच्छता करणाऱ्यांवर खूप कडक कारवाई केली जाते. त्यामुळे यामध्ये काही आश्चर्य नाही की, ते लोक टॉयलेट स्लीपर्सचा वापर करतात जेणेकरून त्यांचे अस्वच्छ पाय टॉयलेट फ्लोर्सना लागून ते खराब होऊ नयेत.

 

४. प्रवासात आराम देणारे साधन

 

japan-crazy-thing-marathipizza04

 

जपानमधील लोक सतत काम करत असल्याने नेहमीच दमलेले असतात आणि त्यांना त्यांच्या प्रवासामध्ये आराम हवा असतो. त्यामुळे हे विशेष असे उपकरण बनवले गेले आहे, ज्यावर हनुवटी टेकून जपानी व्यक्ती एक डुलकी काढू शकतो.

===

===

५. आईस्क्रीम फ्लेवर्स

 

japan-crazy-thing-marathipizza05

 

जपानमध्ये अतिविचित्र असे आईस्क्रीमचे फ्लेवर्स बघायला मिळतात. त्यापैकी काही फ्लेवर्समध्ये कोळसा, निवडुंग आणि ऑक्टोपस यांचा समावेश असतो. आपण कधी कल्पना करू शकणार नाही असे आईस्क्रीमचे फ्लेवर्स जपानमध्ये आढळतात.

तुम्ही कधी सरड्याच्या आईस्क्रीमची कल्पना केली आहे का, जपान मध्ये ते हि मिळतं.

 

६. बेबी मोप्स

 

japan-crazy-thing-marathipizza06

 

जपानमधील लोक बेबी मोप्सचा वापर करतात, ज्यामुळे अगदी बाळ रेंगाळत जरी असले तरी ते घरातील लाद्यांची स्वच्छता करत असते. हे जपान मधील सर्वात मोठ्या गृहपयोगी शोधापैकी एक मानले जाते.

 

७. लहान एस्केलेटर

 

japan-crazy-thing-marathipizza07

 

जपानच्या कवासकी शहराच्या तळघरातील एका दुकानामध्ये जगातील सर्वात लहान एस्केलेटर (स्वयंचलित पायऱ्या) आहे. हा एस्केलेटर फक्त पाच पायऱ्यांचा आहे आणि त्याची उंची फक्त ३३ इंच इतकी आहे.

 

८. किटकॅट फ्लेवर्स

 

japan-crazy-thing-marathipizza08

 

आईस्क्रीम सारखेच जपानी लोकांनी किटकॅटचा अपमान होईल आणि जगातील इतर लोकांना असेही किटकॅटचे फ्लेवर्स असू शकतात असा विचार पडेल, असे फ्लेवर्स शोधून काढले आहेत.

उदा. उकडलेल्या बटाट्याची किटकॅट, सोया सॉस किटकॅट आणि अजूनही कितीतरी वेगवेगळे किटकॅटचे फ्लेवर्स काढले आहेत.

 

९. एकाकी पुरुषांसाठी उशी

 

japan-crazy-thing-marathipizza09

===

===

जपान मध्ये जर कोणी एकटे राहत असेल आणि त्याला कोणाची तरी सोबत हवी असेल तर त्याच्यासाठी खास ही उशी तयार करण्यात आली आहे.

या उशीवर डोके ठेवून झोपल्यास आपण कोणाच्या तरी मांडीवर डोके ठेवून झोपलो आहे असा भास होतो. ही उशी अशी डीझाइन करण्यात आली आहे की यावर फक्त एकच माणूस झोपू शकतो.

 

१०. एकाकी महिलांसाठी उशी

 

japan-crazy-thing-marathipizza10

 

ज्या प्रमाणे एकाकी असणाऱ्या पुरुषांसाठी उशी तयार करण्यात आली आहे तशीच एकाकी असणाऱ्या जपानी महिलांसाठी देखील वेगळ्या प्रकारची उशी तयार करण्यात आली आहे. हि उशी जपानी महिलांना त्यांचा पती आणि प्रियकर जवळ असल्याची आठवण करून देते म्हणे!

विश्वास बसत नसेल तर एकदा जपानला भेट द्याच, या गोष्टींपेक्षा विचित्र गोष्टी पाहायला मिळतील तुम्हाला!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “हे १० ‘नमुनेदार’ शोध सिद्ध करतात की जपान हा विचित्र देश म्हणून का ओळखला जातो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?