' "क्रोसीन" औषधाने रशियात प्रचंड राजकीय उलथापालथ घडवली होती

“क्रोसीन” औषधाने रशियात प्रचंड राजकीय उलथापालथ घडवली होती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक: डॉ. अभिराम दीक्षित
===

रासपुतीन हा रशियाच्या इतिहासातला व्हिलन म्हणून ओळखला जातो. ग्रिगोरी रासपुतीन हा एक व्यसनी दुष्ट आणि पाताळयंत्री भाट म्हणून इतिहासाला ठाऊक आहे.

या रासपुतीनने आपल्या हलकट राजकारणामुळे रशियाची राजवट उलथवली. रशियातील राजकीय उलथा पालथ आणि रशियन राज्यक्रांतीचे एक कारण रासपुतीनचा रशियातील उदय असे अनेक इतिहासकार मानतात.

ग्रिगोरी रासपुतीन रशियाच्या झारला (राजाला) आपल्या नादी लावतो म्हणून इतिहासात ही प्रचंड उलथापालथ झाली आहे.

 

rasputin-marathipizza01

 

१९०३ मध्ये रासपुतीन आपले घरदार सोडून पेगन चेटके अशा काही अघोरी धार्मिक लोकांसोबत राहीला — तिथेच त्याचा काही रशियातील वजनदार सरदार उमरावांशी परिचय झाला.

हीच ओळख पुढे वाढवत रासपुतीन थेट रशियाच्या सम्राटाच्या सानिध्यात आला. त्या सम्राटाचे नाव आहे झार दुसरा निकोलस.

त्यावेळी या राजाचा मुलगा – राजपुत्र अलेक्सेई – हा रक्तदोषाने आजारी होता. त्याच्यावर रासपुतीनने उपचार केल्याने युवराज अलेक्सेईच्या रोगाची तीव्रता कमी झाली. यामुळे रासपुतीनचा प्रभाव रशियन झारशाहीवर पडला.

मग रासपुतीनने आपल्या हलकट स्वभावाला साजेशी कुलंगडी राजकारणं केली – त्यामुळे झारशाही डळमळीत झाली – प्रजा चिडली आणि त्यातून पुढे क्रांती होऊन झारशाही बुडाली.

असे कोणते अघोरी उपचार रासपुतीनने केले? ज्यामुळे जगाच्या इतिहासात प्रचंड उलथापालथ झाली?

क्रोसीन हे औषध आपल्या साऱ्याना माहीत आहे. ताप आल्यावर केला जाणारा तो घरगुती उपचार आहे. या क्रोसिनचा शोध १८८६ इतका जुना आहे.

पण क्रोसीन हे ब्रॅण्डचे नाव झाले. त्यातले केमिकल औषध पॅरासिटेमॉल असे आहे. तर या औषधाने ताप कमी होतो – वेदना कमी होतात – सूज कमी होते.

त्यामुळे रासपुतीनच्या काळी हे औषध दैवी चमत्कार मानले जायचे – इतर कोणत्याही आधुनिक औषधाचा शोध त्याकाळी लागलेला नाही.

रोग कोणताही होवो – पॅरासिटेमॉल म्हणजे क्रोसीन हे एकच औषध त्याकाळी ठाऊक होते . तेच औषध प्रत्येक रोगावर दिले जात असे.

 

rasputin-marathipizza

 

हे औषध (NSAID) गटातले आहे. या गटातली औषधे आपण आजही अनेक रोगावर वापरतो. उदाहरणार्थ एस्पिरीन हे औषध रक्त पातळ करण्यासाठी वापरले जाते. तापावरही ते लागू पडते.

रक्ताच्या गुठळ्या होऊन – त्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांत अडकल्या तर हार्ट अटॅक येतो. अशा पेशंटला पुन्हा गुठळी होऊन हार्ट अटॅक येऊ नये म्हणून – एस्पिरीन हे औषध दिले जाते. हा क्रोसीनचा केमिकल भाऊ आहे.

रशियन राजपुत्राला हिमोफिलिया नावाचा आजार होता. झारच्या राजवंशात हा अनुवांशिक आजार प्रबळ होता. या आजारात रक्त गोठत नाही. जखम झाली की रक्ताची गुठळी तयार होत नाही.

रक्तपात होऊन पेशंट मरू शकतो – कारण रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावलेली असते. हिमोफिलिया आजारात रक्त अधिक पातळ झालेले असते.

त्या काळाच्या मर्यादेनुसार – हिमोफिलियाने आजारी असलेल्या रशियन झारपुत्राला क्रोसीन दिले जात होते – कारण त्यावेळी ते एकच औषध माहीत होते.

हे (NSAID) गटातले हे औषध राजपुत्राचे रक्त अधिकच पातळ करून – त्याचा हिमोफिलिया आजार वाढवत होते. त्यावेळी हा भोंदू रासपुतीन रशियन झारच्या संपर्कात आला.

रासपुतीनने सर्व औषधे बंद करून मंत्रोपचार चेटूक भानामती वगैरे सुरु केले…!

अर्थात चेटूक भानामतीचा काही उपयोग नव्हता – पण चुकीचे औषध बंद केल्याबरोबर – झारपुत्र टुणटुणीत झाला – रासपुतीन हा क्रोसीनच्या वरच्या दर्जाचा चमत्कार मानला गेला. रासपुतीनने झारशाही वर प्रभाव टाकला आणि त्यामुळेच – पुढे झारशाही बुडाली.

 

rasputin-marathipizza01

 

विज्ञान म्हणजे केमिकल्स नाही,  विज्ञान ही विचार करायची पद्धती आहे. हे झार कालीन डॉक्टर बांधवाना माहीत नव्हते – त्याचा परिणाम म्हणून एक अघोरी चेटक्या रासपुतीन रशियाच्या झारचा अध्यात्मिक गुरु बनला – पुढे झारशाहीचा यमदूत बनला…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?