समुद्रात बुडालेले ‘कुमारी कंदम’ : निव्वळ दंतकथा की लुप्त झालेला भारतीय इतिहास?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान हे तुमच्या शालेय जीवनामध्ये मिळेलच असे नाही. काही गोष्टी अश्या असतात ज्या आपल्याला शिकवल्या जात नाहीत किंवा त्यांचा पाठ्यपुस्तकाशी आणि आपल्या शिक्षणाशी कधीच संबंध येत नाही.

पण शालेय जीवनातून बाहेर पडल्यावर अनेक माहित नसलेल्या गोष्टी आपल्याला कळू लागतात आणि आपलाच ”अज्ञात’ इतिहास नव्याने आपल्यासमोर येतो.

तुमच्यापैकी बहुतेक जण प्राचीन विचारवंत प्लेटोबद्दल परिचित असतील.

 

plato-marathipizza
wikipedia.org

तर या विचारवंताने जलसमाधी मिळालेल्या अटलांटीस शहराविषयी सिद्धांत मांडला होता. त्याच्या मते समुद्राखाली एक असे शहर दडलेले आहे, जे फार प्राचीन आणि प्रगत होते.

हे शहर म्हणजे दंतकथा असल्याचे अनेकांचे मत आहे. पण अशीही लोक आहेत ज्यांना अटलांटिस शहर सापडेल अशी आशा आहे आणि त्या दिशेने त्यांचा शोधही सुरू आहे. असो, या शहराचा येथे संदर्भ देण्यामागचं कारण म्हणजे भारतीय उपमहाद्वीप समूहामध्येही अश्याच प्रकारची एक संकृती लुप्त झालेली आहे असा अनेक जणांचा दावा आहे.

ही संस्कृती एका महाद्वीपावर वसलेली होती. लेमुरीया नामक हे संपूर्ण महाद्वीपचं समुद्राखाली गेले. तामिळ संशोधकांच्या मते मात्र लेमुरीया आणि कुमारी कंदम ही दोनी महाद्वीपे एकच आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल हे कुमारी कंदम काय आहे?

असे मानण्यात येते की, कुमारी कंदम वा कुमारीनाडू हे असे प्राचीन बेट आहे जेथे तमिळ संस्कृतीचा वास होता. आणि तेथूनच आजच्या मानवी संस्कृतीचा उदय झाला.

 

kumari-kandam-marathipizza01
ancient-origins.net

१९ व्या शतकामध्ये अमेरिका आणि यूरोपीय संशोधकांच्या एका गटाने अफ्रिका, भारत आणि मादागास्कर मध्ये जिओलॉजिकल आणि इतर समानता समजून घेण्यासाठी, या सर्वाचे मूळ म्हणजे समुद्रात बुडालेले महाद्वीपच असावे असा तर्क लावला. आणि त्या लुप्त झालेल्या महाद्वीपाला लेमुरीया असे नाव दिले. तर तमिळ विद्वान तमिळ संस्कृतीमधील प्राचीन नोंदींच्या आधारावर हे महाद्वीप म्हणजे कुमारी कंदम असून त्यांचा पांडियन महापुरुषांशी संबध असल्याचे सांगतात.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार,

एका नैसर्गिक आपत्तीमुळे जलसमाधी मिळण्यापूर्वी लेमुरीया महाद्वीपा वर तामिळ संस्कृतीचे अस्तित्व होते.

जेव्हा लेमुरीयाविषयी माहिती देणारे संशोधक शोध करता करता भारतात पोहोचले तेव्हा भारतीय लोकगीतांमध्ये त्यांना इतिहासासोबतच लुप्त झालेल्या त्या प्राचीन संस्कृतीचेही वर्णन आढळले. त्याच आधारावर त्यांनी देखील कुमारी कंदम आणि त्यांच्या तर्कातील लेमुरीया बेट एकच असू शकते हे मान्य केले.

 

kumari-kandam-marathipizza02
onlinekanyakumari.com

असे मानले जाते की, कुमारी कंदनचे पांडियन राजा संपूर्ण भारतीय महाद्वीपचे शासक होते. तेथे वास करणारी तामिळ संस्कृती ही जगातील सर्व संस्कृतींपेक्षा जुनी संस्कृती आहे.

जेव्हा कुमारी कंदम बेटाला जलसमाधी मिळाली तेव्हा तेथील निवासी संपूर्ण जगामध्ये पसरले आणि त्यांनी कितीतरी नवीन संस्कृतीं निर्माण केल्या. म्हणूनच असा सिद्धांत मांडला जातो की हे बुडालेले महाद्वीप मानवी संस्कृतीचे मूळ आहे.

कुमारी कंदनची गोष्ट किती सत्य आहे ?

कुमारी कंदनच्या अस्तित्वाचे समर्थन करण्यासाठी एक पुरावा म्हणजे श्रीलंकेला भारताशी जोडणारा दगड, रेती, गाळ आणि छोट्या खड्यांनी बनलेला १८ मैलाचा रामसेतू म्हणजेच एडम ब्रीज आहे.

पहिल्यांदा या जमिनीच्या तुकड्याला प्राकृतिक स्वरूपाने पहिल्यास समजते की हा एक तुटलेला पूल आहे जो महासागरामध्ये बुडालेला आहे.

या पुलाबद्दल धार्मिक ग्रंथ रामायणामध्ये देखील सांगितले आहे. रामायणानुसार या सेतूची संरचना भगवान रामांच्या देखरेखीखाली लंकेत जाण्यासाठी करण्यात आली होती.

भारतीय समुद्र विज्ञानाच्या राष्ट्रीय संस्थेमधील संशोधकांच्या निष्कर्षानुसार,

१४,५०० वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा १०० मीटर खाली होती आणि १०,००० वर्षांपूर्वी ६० मीटर खाली होती. त्यामुळे ही गोष्ट खरी असू शकते की या ठिकाणी भारतातून श्रीलंकेतून जाण्यास एक पूल असावा.

…!

हाच पूल रामायणातील ‘राम सेतू’आहे असे आपण मानतो. म्हणजे ही शक्यता नाकारता येत नाही की कधीकाळी भारतातून श्रीलंकेच्या बेटाला जोडण्यासाठी एक भूमी पूल होता. म्हणजे या ठिकाणी मानवी वस्ती देखील असावी.

 

kumari-kandam-marathipizza03
krishna.org

गेल्या १२ ते १० हजार वर्षात समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीने वारंवार त्सुनामी आणि पुराने आसपासचा परिसर आपल्यात सामावून घेतला. अश्याच एखाद्या नैसर्गिक कारणामुळे हे महाद्वीप बुडाले असावे.

आजवर कुमारी कंदम म्हणजे निव्वळ थाप असल्याचे आधुनिक जगाचे मत आहे. पण त्या जागी सापडलेले संदर्भ आणि मुख्य म्हणजे भारत आणि श्रीलंकेला जोडणाऱ्या प्राचीन पुलाचे अस्तित्व कुमारी कंदम बद्दल नव्याने अभ्यास व्हायला हवा असे दर्शवते, तेव्हाच हा लुप्त इतिहास जगासमोर येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?