' पूर्वीचे लोक टी-शर्टचा उपयोग ‘वेगळाच’ करायचे; जाणून घ्या इतिहास! – InMarathi

पूर्वीचे लोक टी-शर्टचा उपयोग ‘वेगळाच’ करायचे; जाणून घ्या इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टी-शर्ट म्हणजे पुरुष मंडळीची अगदी जिवाभावाची आणि आवडती  गोष्ट. घाई घाईत असलं की शर्टा प्रमाणे बटन वगैरे लावत बसायची गरज नाही. दोन हात आणि मान टाकली की सरळ अंगावर चढवलं जातं.

कुठेही आणि कधीही अगदी कम्फर्टेबल फील करून देणारा कपडा म्हणून या टी-शर्टची इमेज! आज आम्ही तुम्हाला याच टी-शर्टचा इतिहास सांगणार आहोत, जो वाचून तुम्ही देखील चाट पडालं.

t-shirt-marathipizza01

टी – शर्टचा शोध १९ व्या शतकाच्या सुरुवातीला लागला होता आणि हे अगदी खरे आहे की, त्यावेळी टी -शर्टचा वापर इनरवेयर म्हणून केला जाई.  (पूर्वी टी-शर्ट शरीरावरच घातला जायचा, पण तो उघड उघड घालुन कोणी फिरत नसे, त्यावर दुसरा टी-शर्ट वा कोट चढवला जाई.)

जेव्हा टी-शर्टचा शोध लागला, तेव्हा खाणी मध्ये काम करणारे आणि जहाजावर माल उतरवणारे कामगार काम करताना इनरवेअर म्हणून टी-शर्टचा वापर करत करत असतं.

१८९८ मध्ये स्पेन-अमेरिका युद्धाच्यावेळी यू.एस. नेव्हीच्या सैनिकांनी देखील टी–शर्टचा वापर इनरवेयर सारखा केला होता. १९१३ मध्ये टी-शर्ट हा कपडा म्हणून आर्मी ड्रेस कोड मध्ये समाविष्ट करण्यात आला.

 

t-shirt-marathipizza02
historythings.com

त्यावेळी टी – शर्ट मध्ये कोणतेच बटन नसायचे आणि त्या टी – शर्टना हात नसायचे म्हणजेच ते स्लीव्हलेस असतं. काही काळानंतर सर्व नाविक आणि कामगार शर्टऐवजी टी – शर्टचाच वापर करू लागले.

कालांतराने शर्ट घालणे या लोकांनी जवळजवळ सोडूनच दिले आणि उघड उघड ते टी-शर्ट घालून वावरू लागले. हळूहळू याचा वापर दुसऱ्या उद्योगांमध्ये देखील होऊ लागला.

कृषी उद्योगापासून फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या सर्वानीच टी-शर्ट घालून काम करण्याला पसंती दिली. तरुण पिढीमध्येही टी – शर्ट प्रचंड लोकप्रिय झाले होते.

t-shirt-marathipizza03
gazabpost.com

१९२० च्या आसपास टी -शर्ट हा शब्द एवढा प्रसिद्ध झाला होता की, अमेरिकन डिक्शनरीने हा शब्द केवळ आपल्या शब्दकोशात समाविष्टचं करून घेतला नाही तर, त्याची परिभाषा सुद्धा लिहिली.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत यू.एस नेव्ही याचा उपयोग युनिफॉर्म (इनरवेयर) सारखाच करत असत. सर्वसाधारण लोकांमध्ये टी – शर्टचा प्रसार करण्याचे काम यु.एस. नेव्हीच्या जवानांनीच केले होते.

ते दैनंदिन जीवनात वा पार्टी, समारंभाला जाताना टी-शर्ट  घालूनच जायचे, त्यामुळे आपसूकच सामान्य जनतेमध्ये टी-शर्टबद्दल आकर्षण वाढीस लागले.

t-shirt-marathipizza04
historythings.com

फॅशन मॅगझीन लाइफने टी – शर्टला त्या काळातील ट्रेंड बनवले होते, जेव्हा ११९४२ मध्ये Air Corps Gunnery शाळेने टी – शर्टचे काही खास प्रिंटेड एडिशन काढले. १९६० पासून लोक छापील टी – शर्टचा वापर विरोध प्रदर्शनासाठी करू लागले आणि नंतर इतिहास घडला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?