'सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र स्वतः बारकाईने वाचून समजावून घ्या.

सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र स्वतः बारकाईने वाचून समजावून घ्या.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

The Central Board of Film Certification (CBFC) म्हणजेच आपलं सेन्सॉर बोर्ड! जे चित्रपटांना सेन्सॉर प्रमाणपत्र देण्याचं काम करतं. हे सेन्सॉर प्रमाणपत्र प्रत्येक चित्रपटाला मिळवावंच लागतं.

सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करता येत नाही. अतिशय कडक नियमांमुळे भारतीय सेन्सॉर बोर्ड हे जगातील सर्वात पॉवरफुल सेन्सॉर बोर्ड्सपैकी एक म्हणून ओळखलं जातं.

या सेन्सॉर बोर्डाचं मुख्यालय मुंबईमध्ये असून, प्रसून जोशी हे सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्याकडून त्यांनी हा पदभार स्वीकारला आहे.

 

sensor-borad-marathipizza01

 

चित्रपटांना मिळणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राबद्दल सामान्य प्रेक्षकाला नेहमीच कुतुहूल असतं. चला तर मग आज सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राबद्दल अगदी इत्यंभूत माहिती जाणून घेऊया.

चित्रपट सुरु होण्यापूर्वी किमान १० सेकंद तरी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे. या प्रमाणपत्रावर U, U/A, A, S या रेटिंग आढळतात.

त्यापैकी U म्हणजे- Unrestricted अर्थात हा चित्रपट कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक पाहू शकतो.

 

sensor-borad-marathipizza03

 

U/A म्हणजे- Unrestricted with caution अर्थात १२ वर्षांच्या खालील मुले हा चित्रपट आपल्या पालकांसोबत पाहू शकतात.

 

sensor-borad-marathipizza02

 

A म्हणजे- Adults only अर्थात हा चित्रपट केवळ १८ वर्षा वरील वयोगटातील प्रेक्षकच पाहू शकतात.

 

sensor-borad-marathipizza04

 

S म्हणजे- Restricted to special classes अर्थात केवळ खास प्रेक्षकच हा चित्रपट पाहू शकतात जसे की डॉक्टर, वैज्ञानिक इत्यादी.

 

sensor-borad-marathipizza05
या प्रमाणपत्रामध्ये चित्रपटाचे नाव, भाषा, चित्रपटाचा रंग, आणि चित्रपटाचा प्रकार कोणता आहे त्याचा उल्लेख असतो.

 

sensor-borad-marathipizza06

 

बाजूला चित्रपटाचा कालावधी किती आहे ते सांगितलेले असते.

 

sensor-borad-marathipizza07

 

काही प्रमाणपत्रांमध्ये चित्रपटाच्या कालावधी व्यतिरिक्त चित्रपटाच्या फिल्म रीलची एकूण लांबी किती आहे ते दर्शवलेले असते.

 

sensor-borad-marathipizza08

 

वरच्या बाजूला प्रमाणपत्राची वैधता दिलेली असते. म्हणजे हा चित्रपट कोठे रिलीज केला जाऊ शकतो.

 

sensor-borad-marathipizza09

 

सोबतच प्रमाणपत्रामध्ये सर्टिफिकेट नंबर, सेन्सॉर बोर्ड ऑफिसचे ठिकाण आणि प्रमाणपत्र कधी दिले गेले त्याचे वर्ष नोंदवलेले असते.

 

sensor-borad-marathipizza10

 

डाव्या बाजूला या चित्रपटाचे कोणी परीक्षण केले त्यांची नावे दिलेली असतात.

 

sensor-borad-marathipizza11

 

त्या खालोखाल निर्मात्याच्या आणि अर्जदाराच्या नावाची नोंद असते.

 

sensor-borad-marathipizza12

 

काही प्रमाणपत्रांमध्ये त्रिकोणाचे चिन्ह आढळते, हे चिन्ह दर्शवते की त्या चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डने कट्स सुचवले आहेत. ज्या चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डने कट्स सुचवले नसतील, त्या चित्रपटाच्या प्रमाणपत्रामध्ये त्रिकोणाचे चिन्ह आढळत नाही.

 

sensor-borad-marathipizza13

ज्या चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डने कट्स सुचवले आहेत, त्या चित्रपटाला दोन भागात प्रमाणपत्र दिले जाते, बहुतांश वेळा A रेटिंग असलेल्या चित्रपटाला दोन भागात प्रमाणपत्र मिळते.

 

sensor-borad-marathipizza14

 

त्या प्रमाणपत्राचा दुसरा भाग खालीलप्रमाणे असतो.

 

sensor-borad-marathipizza15jpg

 

तसेच फिल्म किती MM च्या पडद्यावर दाखवण्यासाठी बनवली आहे त्याची देखील नोंद प्रमाणपत्रावर आढळते.

 

sensor-borad-marathipizza16jpg

 

मग आता पुढच्या वेळेपासून स्वत: कोणत्याही चित्रपटाचे प्रमाणपत्र वाचण्याची सवय लावून घ्या आणि इतरांनाही ही रंजक माहिती द्या!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?