'हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रत्येक कलाकार आयुष्यभर झटत असतो, जाणून घ्या!

हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रत्येक कलाकार आयुष्यभर झटत असतो, जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – तुषार दामगुडे 

ऑस्कर पुरस्काराचे खरे नाव म्हणजे “ऍकॅडमी ऍवार्ड” ! अत्यंत मानाचा असा पुरस्कार आपल्याला मिळावा अशी जगभरातील चित्रपट क्षेत्राशी संबंधीत प्रत्येकाची इच्छा असते ! आज थोडक्यात या पुरस्काराची माहिती घेऊ.

२७० प्रेक्षकांच्या उपस्थितित १९२९ मधे मेट्रो गोलविन मेयर कंपनीतर्फ़े अमेरिकेतील “हॉटेल हॉलिवुड रुझवेल्ट” मध्ये पहिला सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याच्या तिकिटाचा दर होता ५ डॉलर.

oscar-awards-marthipizza011
all.com

सुरवातीच्या काळात पुरस्कारांचा निकाल ३ महिने आधीच जाहिर होत असे, त्यानंतर सोहळ्याच्या आदल्या रात्री ११ वाजता जाहिर होऊ लागला, कालौघात पुरस्कार सोहळ्यातच बंद लिफ़ाफ़ा फ़ोडल्यावर नाव जाहिर होण्याची प्रथा सुरु झाली.

पुरस्काराची बाहुली सोन्याच्या वर्खाने मढलेली असते. फ़िल्म रिळावर उभा असलेला योद्धा असे या पुरस्कार बाहुलीचे स्वरुप आहे. फ़िल्मची रीळ चित्रपटाच्या पाच अंगाचे प्रतिनिधित्व करते- अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ आणि लेखक.

आतापर्यंत २७०१ बाहुल्या पुरस्कारार्थ वितरीत झालेल्या आहेत. “ऑस्कर”हे खरेतर या पुरस्काराचे टोपण नाव आहे आणि या नावाबद्दल अनेक कथा आहेत.

 

oscars awards InMarathi

 

हे देखील वाचा : जगप्रसिद्ध Academy Awards च्या बाहुलीला “Oscars” नाव कसं पडलं-जाणून घ्या

पुरस्कार वितरणाची पद्धत :

साधारण पणे जानेवारी महिन्यात संबंधीत क्षेत्रातील वेगवेगळ्या विभांगाचे नॉमिनेशन जाहिर होते आणि फ़ेब्रुवारी महिन्यात पुरस्काराचे वितरण होते. आपल्या इथल्या पुरस्कार सोहळ्यासारखी गटबाजी किंवा वशिलेबाजी या सोहळ्यात नसते.

२०१२ पर्यंत ५७८३ तज्ञ लोकांची समिती चित्रपट पाहुन मतदान करते. माननीय मतदार या क्षेत्राशी संबंधितच असतात. मतदारांमधे अभिनेत्याची संख्य लक्षणीय म्हणजे १३११ आहे. (२२%) मतदार संख्या इतकी प्रचंड असल्यामुळे दबाव आणणे, लॉबिंग करणे अशक्य होऊन बसते.

oscar-awards-marthipizza02
fortunedotcom.files.wordpress.com

मुख्य पुरस्कारासाठी चित्रपटाची वेळ कालावधी कमीतकमी ४० मिनिटांच्या वर हवा. त्याच्या आतील फ़िल्म लघुपट म्हणुन गणला जातो. अजुन असे बरेच नियम आहेत, जसे की चित्रपट त्या वर्षीच्या सोहळ्यासाठी गणला जावा म्हणुन चित्रपट ३१ डिसेंबरच्या रात्री पर्यंत प्रदर्शीत करण्याची अट वगैरे वगैरे…..

२००२ सालापसुन हा सोहळा कोडॅक थियेटर मधेच संपन्न होतो. साधारण पणे काळा सुट आणि बो असा पेहराव सर्वमान्य आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट ते सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट, असे वेगवेगळे विभाग आहेत. आता जगभर असे सोहळे होतात.

त्यातील विविध आपल्याला माहित आहेतच, परंतु अत्यंत विशेष असेही पुरस्कार या सोहळ्यात दिले जातात. जसे की,  “बेस्ट टायटल रायटिंग”!

त्याशिवाय Academy Honorary Award, Academy Scientific and Technical Award, Gordon E. Sawyer Award, Jean Hersholt Humanitarian Award, Irving G. Thalberg Memorial Award असेही विभाग आहेत.

 

oscar-awards-marthipizza03
nyfa.edu

सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार मिळालेले चित्रपट (११ ऍकॅदमी) :

Ben-Hur (1959)
Titanic (1997)
The Lord of the Rings: The Return of the King (2003)

 

the lord of the rings InMarathi

 

———————

सर्वाधिक ऑस्कर मिळालेली व्यक्ती

वोल्ट डिस्ने, ज्यांना तब्बल 22 ऑस्कर्स मिळालेळे आहेत. तसेच एकाच वर्षात सर्वात जास्त ४ ऑस्कर जिंकण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.

 

walt disney InMarathi

———————–

सर्वाधिक ऑस्कर मिळालेली स्त्री

एडिथ हेड यांनी कॉस्च्युम डिजाईनिंग साठी ८ ऑस्कर्स पटकावले आहेत.

 

Edith-Head-InMarathi

———————–

अभिनयासाठीचे सर्वाधिक ऑस्कर मिळालेली व्यक्ती

कॅथरीन हेपबर्न हिने सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी  ऑस्कर्स जिंकले आहेत.

 

katharine hepburn 1 InMarathi

————————–

दिग्दर्शनासाठीचे सर्वाधिक ऑस्कर मिळालेली व्यक्ती

जॉन फ्रोड यांच्या नावावर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ४ ऑस्कर्स मिळवण्याचा विक्रम आहे.

————————-

john ford InMarathi

 

इतर लक्षणीय माहिती

मेरिल स्ट्रिपला आतापर्यंत अभिनयासाठी सर्वाधिक १७ वेळा नामांकन मिळालेले आहे.

वॉल्ट डिस्नेने सलग दहावेळा पुरस्कार प्राप्त केला आहे.

सर्वाधिक कमी वयाचा पुरस्कार विजेता टाटुम ओनील फ़क्त १० वर्षांचा होता आणि सर्वाधिक वृद्ध विजेता ७४ वर्षांचा क्लिंट इस्टवुड आहे.

पीटर ओ टुल ला ८ वेळा नामांकन मिळालं, परंतु एकदाही पुरस्कार मिळाला नाही शेवटी त्याला “मानाचा ऑस्कर पुरस्कार”देऊन गौरविण्यात आलं.

 

peter o toole InMarathi

 

बेट्राइज स्ट्रेट  याने नेटवर्क चित्रपटात अवघी ५ मिनिटे ४० सेकंदाची भुमिका करुन ऑस्कर प्राप्त केला आहे.

डेन्झल वॉशिंग्टन हा २ वेळा पुरस्कार प्राप्त करणारा एकमेव कृष्णवर्णीय आहे.

 

denzel_washington InMarathi

 

वॉल्ट डिस्नेला ५८ वेळा नामांकन मिळाली होती.

पुरस्कार मिळवणारा सर्वाधिल लांबिचा चित्रपट म्हणजे Gone With the Wind – 224 मिनिटे आणि सर्वाधिक कमी लांबीचा चित्रपट म्हणजे Marty – 94 मिनिटे!

असा हा मानाचा ऑस्कर पुरस्कार म्हणजे प्रत्येक कलाकारासाठी आपल्या अथक प्रयत्नांची मिळालेली पावती असते! हीच पावती मिळवण्यासाठी त्याची संपूर्ण कारकिर्दीभर धडपड सुरु असते. 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com | वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com | त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?