'ताजमहालशी निगडीत १५ रंजक गोष्टी, ज्या फारश्या कोणाला माहित नाहीत!

ताजमहालशी निगडीत १५ रंजक गोष्टी, ज्या फारश्या कोणाला माहित नाहीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

ताजमहाल म्हणजे भारताची शान…..

जगातील सात आश्चर्यांपैकी एक! प्रेमाची निशाणी म्हणून शाहजहाँ याने आपली बेगम मुमताजसाठी बांधून घेतलेली ही वास्तू जगभरात भारताची ओळख निर्माण करते.

शाहजहाने आपली प्रिय पत्नी मुमताज साठी ही वास्तु बांधली असली, तरी त्याच्या सौंदर्यामुळे आज संपुर्ण जगातील सर्वोत्तम वास्तुंपैकी एक आहे.

अश्या या अति महत्त्वपूर्ण वास्तूबद्दल आजही सर्वसामन्यांना माहित नसलेल्या रंजक गोष्टी जाणून घेऊया.

 

taj-mahal-inmarathi
tajmahal.org.uk

 

१. एका दाव्यानुसार ताजमहल हे एक शिव मंदिर आहे. ज्याचे खरे नाव ‘तेजोमहालय’ हे आहे, कारण कोणत्याही मुस्लिम देशामध्ये अशी कोणतीच इमारत नाही, जिच्या नावामध्ये महल आहे.

‘महल’ हा मुस्लिम शब्द नाही. सदर दावा कितपत खरा आहे याबद्दल अद्यापही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

२. ताजमहल शाहजहाँने बनवला होता अशी इतिहासात नोंद आहे. पण त्याने ताजमहलाची निर्मिती त्याने आपली चौथी बेगम मुमताज हिच्या स्मरणार्थ केली होती, याबद्दल अनेकांना शंका आहे.

शाहजहाँने एकून ७ लग्ने केली होती. अजून एक गोष्ट म्हणजे मुमताजचा मृत्यू १४ व्या मुलाला जन्म देताना झाला होता. तसेच मुमताजच्या मृत्युनंतर शाहजहाँने तिच्या बहिणी बरोबर लग्न केले होते.

३. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहल बनवण्यासाठी २२ वर्ष लागली होती. निर्मितीचे काम १६३२ मध्ये सुरु झाले आणि १६५४ मध्ये पूर्ण झाले.

ताजमहलच्या बांधकामात जवळपास २२,००० मजूर अहोरात्र कष्ट घेत होते.

 

taj-mahal-inmarathi
db9uq61ujlkdm.cloudfront.net

 

४. १६३२ मध्ये ताजमहल बनवण्यासाठी ३.२ कोटी रुपये खर्च झाले होते, परंतु आज जर ताजमहल बनवायचा झाला तर ६८०० कोटी रुपये खर्च येईल.

५. ही गोष्ट तुम्हालाही विचित्र वाटू शकते, पण ती अगदी खरी आहे. ताजमहल हे लाकडांच्या आधारावर उभे आहे आणि ही अशी लाकडे आहेत, ज्यांना टिकून राहण्यासाठी आद्रतेची गरज भासते आणि या लाकडांना ही आद्रता यमुना नदीच्या पाण्यातून मिळते.

६. ताजमहलची चारही मिनारे अशाप्रकारे बनवण्यात आली आहेत की, भूकंप येऊ दे किंवा वीज पडू दे, त्याचा मधल्या घुमटावर काहीही परिणाम होणार नाही.

७. ताजमहल हे जगभरातील सर्वात जास्त भेट देली जाणारे स्थळ आहे. दररोज जगभरातून जवळपास १२,००० लोक ताजमहल पाहण्यासाठी येतात.

 

taj mahal 2
the guirdian

 

८. ताजमहल बनवण्यासाठी २८ वेगवेगळ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये लावण्यात आलेला संगमरवर दगड राजस्थान, चीन, अफगाणिस्तान आणि तिबेट मधून मागवण्यात आला होता.

ताजमहलच्या सजावटीचे समान नेण्यासाठी जवळपास १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता.

 

taj-mahal-inmarathi
Askideas.com

 

९. ताजमहलचा रंग हा बदलत असतो, सकाळी बघितल्यावर गुलाबी, रात्रीचा दुधासारखा पांढरा आणि चांदणे पडलेवर रात्री सोन्यासारखा दिसतो.

परंतु आग्र्यातील वाढत्या प्रदूषणामुळे ताजमहलचा रंग हळूहळू पिवळा पडू लागला आहे. हे लक्षात आल्याबरोबर ताजमहलच्या परिसरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

१०. ताजमहलचे सर्व कारंजे एकसाथ कार्यरत असतात. सर्वच कारंज्यांच्या खाली तांब्याच्या टाक्या आहेत.

 

taj mahal inmarathi

 

ह्या सर्व टाक्या एकत्र भरतात आणि त्यावर दाब पडल्यावर एकत्रच पाणी सोडतात.

११. १९७१ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान, त्यानंतर भारत–पाक युद्धादरम्यान आणि पुन्हा अमेरिकेत झालेल्या  ९/११ च्या हल्ल्यानंतर ताजमहलवर बांबूच्या लाकडांचे आच्छादन बांधण्यात आले,

जेणेकरून त्या प्रांतात हल्ला झाल्यास ताजमहलला कोणतेही नुकसान होऊ नये.

१२. सफेदशुभ्र रंगाचा ताजमहल बनवल्यानंतर शाहजहाँचे स्वप्न होते की, असाच एक काळा ताजमहल बनवावा, परंतु त्याचा मुलगा औरंगजेब याने त्याला कैद केले आणि त्यामुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

 

taj-mahal-inmarathi
wallpapercave.com

 

१३. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की, शाहजहाँने ताजमहल बनवणाऱ्या मजुरांचे हात कापले होते, कारण त्यांनी या सारखा दुसरा ताजमहल बनवू नये. पण या गोष्टीत म्हणावे तितके तथ्य वाटत नाही,

कारण ‘अहमद लौहरी’ या एका मजुराने ताजमहल बनवणाऱ्या दलामध्ये काम केले होते, त्यानेच पुन्हा लाल-किल्याच्या बांधकामासाठी देखील काम केले होते.

१४. शाहजहाँची इच्छा होती की, ताजमहलमध्ये अगदी छोटीशीही चूक वा कमीपणा नसावा, परंतु ताजमहल मध्ये एक होल आहे, ज्यामधून थेट पाणी मुमताजच्या कब्रीवर पडते. म्हटले जाते की, एका कारीगराने हे होल मुद्दामहून केला होता.

ताजमहल मध्ये अजून एक कमीपणा आहे, तो म्हणजे भिंतींवर बनलेल्या ११ नक्षीदार खांबांपैकी एकाचा आकार गोल आहे आणि बाकी १० खांबांचा आकार त्रिकोणी आहे.

१५. आता शेवटची रंजक गोष्ट- जर तुम्हाला विचारले, ताजमहल उंच की कुतुबमिनार उंच? तर तुम्ही लगेच सांगाल की कुतुबमिनार.

पण तुमचं उत्तर चूक आहे, कारण ताजमहल हा कुतुबमिनारपेक्षा ५ फूट उंच आहे.

 

taj-mahal-marathipizza06
i0.wp.com

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?