' एमबीए चा फुगा फुटला, केवळ ७ % विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या – InMarathi

एमबीए चा फुगा फुटला, केवळ ७ % विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

पदवीचे शिक्षण संपवून बिझनेस स्कूलमधून एमबीए करून गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याची अनेक तरुण तरुणींची इच्छा असते परंतु त्यांच्या या विचारसरणीस तडा देणारा एक अहवाल समोर आला आहे.

 

MBA marathipizza

स्त्रोत

काही प्रतिष्ठित व्यवस्थापन महाविद्यालये आणि विद्यापीठांचा अपवाद वगळता इतर बिझनेस स्कूल सुमार दर्जाचे पदवीधर तयार करीत असून ते रोजगार मिळवण्यास अपात्र असल्याचे दिसून आले आहे.

भारतात किमान ५,५०० बिझनेस स्कूल्स आहेत. त्यापैकी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद, लखनौ, हैदराबाद, देहरादून या शहरातील २२० बी-स्कूल्स बंद झाल्याचे या अहवालात म्हटले आहे तर शहरातील किमान १२० बी-स्कूल्स काही काळातच बंद होतील असे अहवालात म्हटले गेले आहे. २०१४-१६ या काळात कॅम्पस रिक्रूटमेंट म्हणजेच परिसर भरती ४५ टक्क्यांनी घटली आहे.

प्रमाणापेक्षा जास्त जागा

अनेक बी-स्कूल्स आपली पात्रता आणि गुणवत्ता नसताना प्रमाणापेक्षा जास्त जागा देतात. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत जातो. २०११-१२ मध्ये एमबीएच्या कोर्सला ३.६ लाख जागा होत्या तर तीन वर्षात तेच प्रमाण सव्वा पाच लाखांवर गेले. दर्जात घसरण, सोयी सुविधांचा अभाव, कॅम्पस रिक्रूटमेंट होऊनही मिळणारे कमी पगार, यामुळे बी-स्कूल्सची अवस्था भयावह झाली असल्याचे आसोकामचे महासचिव डी.एस. रावत यांनी म्हटले आहे.

भारतात दरवर्षी १५ लाख अभियांत्रिकी स्नातक तयार होतात. त्यापैकी केवळ २०-३० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात. अभियांत्रिकीतील ९७ टक्के विद्यार्थ्यांना आयटी आणि कोअर इंजिनिअरिंगमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा असते परंतु आयटीमध्ये नोकरी करण्यासाठी १८.४३ टक्के मुले पात्र असतात तर कोअर इंजिनिअरिंगसाठी ७.४९ टक्के मुले पात्र (एम्प्लॉयेबल) असतात. या व्यतिरिक्त संभाषण कौशल्य, इंग्रजीवरील प्रभुत्व या गोष्टींचा देखील अडसर असतोच.

बिझनेस स्कूलची संख्या बेसुमारपणे वाढल्याने विद्यार्थ्यांना रोजगार मिळणासा झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांनी नोकरी मिळवली त्यांना १०,००० रुपयांपेक्षा कमी पगार मिळत आहे – असे आसोकामने म्हटले आहे.

केवळ सात टक्के पदवीधरांना नोकऱ्या

बिझनेस स्कूलच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उचलत आसोकाम एज्यकेशन कमिटीने मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. केवळ सात टक्के व्यवस्थापन शास्त्रातील पदवीधरानांच नोकऱ्या मिळत आहेत.

 

: तुषार कुलकर्णी

 

महत्वाची नोट : वरील माहितीवरून “MBA करू नये” हा निष्कर्ष नं काढता – “उत्तम institute मधूनच MBA करायला हवं” – असा निष्कर्ष काढायला हवा ! 🙂

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?