'मोहरमच्या महिन्यात सुरा आणि तलवारींनी का करतात मुसलमान लोक स्वत:ला जखमी?

मोहरमच्या महिन्यात सुरा आणि तलवारींनी का करतात मुसलमान लोक स्वत:ला जखमी?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मोहरम हा इस्लामिक दिनदर्शिकेमधील पहिला महिना आहे. जो बकरी ईदच्या शेवटच्या महिन्यानंतर येतो.

मोहरम कर्बालाच्या युद्धाचे प्रतिक आहे, जे इराकमध्ये लढले गेले होते. आजही कर्बाला इराकचे एक प्रमुख शहर आहे. जे इराकची राजधानी बगदाद पासून १२० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.

कर्बाला ही शिया मुसलमानांसाठी मक्का आणि मदिना नंतरची दुसरी सर्वात प्रमुख जागा आहे, कारण याच जागी इमाम हुसैनची कब्र आहे.

जगभरातील शिया मुसलमानच नाहीतर सुन्नी मुसलमान सुद्धा येथे भेट देण्यासाठी येतात. कर्बालामध्ये झालेले युद्ध इतर इस्लामिक युद्धांपेक्षा वेगळे मानले जाते.

याच युद्धामध्ये इमाम हुसैनची हत्या करण्यात आली होती.

 

karbala-war-marathipizza

 

इमाम हुसैन म्हणजे मुसलमानांचे चौथा खलिफा आणि शिया मुसलमानांचे पहिले इमाम असणाऱ्या हजरत अली यांचा मुलगा होता. हुसैनची अजून एक ओळख म्हणजे अल्लाहचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची मुलगी फातिमा हिचा तो मुलगा होता.

मुसलमानांच्या मते, कर्बालाचे युद्ध दोन शहजादां मधील युद्ध नव्हते तर हे इस्लामचे असे युद्ध होते, जिथे एकीकडे हुसैन होता तर, दुसरीकडे शहजादा यजाद होता.

===

हे ही वाचा हा मुस्लिम विचारवंत रमजानमधील रोजा वर जे लिहितोय ते विचारात टाकणारं आहे

===

हुसैनचे म्हणणे होते की, राज्य कारभार हा त्यांच्या आजोबांनी (मोहम्मद पैगंबर) दाखवलेल्या मार्गावरून म्हणणेच दीन-ए-इस्लाम नुसार चालवला जावा.

शहजादा यजीद मात्र स्वतःची मनमानी करू इच्छित होता. यजीद सत्तेत होता, तो त्यावेळेचा खलिफा बनला होता.

त्याने हुसैनला सांगितले की, त्याने इस्लामचा उल्लेखही करु नये आणि मी सांगेन तसेच करावे, परंतु हुसैनने त्याचे म्हणणे ऐकले नाही. त्याने शहजादा यजादला निक्षून सांगितले,

मी कुरानविषयी मी बोलणार, हजविषयी बोलणार, अल्लाह एक आहे

हा वाद इतका विकोपाला गेला की आता रक्तसंहार निश्चित होता.

इस्लामी दिनदर्शिकेनुसार २ मोहरमला हुसैन एक लहान लष्कर घेऊन कर्बालाला पोहचला त्याच्या लष्करामध्ये बायका होत्या, वृद्धपण होते. हुसैनचा अभिमान मोडावा म्हणून यजादने ७ मोहरमला त्यांना होणारा पाणीपुरवठा बंद केला.

अश्या बिकट परिस्थितीतही हुसैनने हार मानली नव्हती.

९ मोहरमच्या रात्री हुसैनने आपल्या साथीदारांना सांगितले की,

उद्या म्हणजे १० मोहरमला आपल्याला लढाई करायची आहे. जर कोणाला परत जायचे असल्यास ते जाऊ शकतात. मला त्याबद्दल काहीच वाईट वाटणार नाही.

 

the-battle-of-karbala-marathipizza

 

कोणीही इमाम हुसैनची साथ सोडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नमाज पढण्याच्या वेळेसच यजादने कपटाने तीरांचा मारा केला.

पण हुसैन काही नमाज पूर्ण केल्याशिवाय जागचा हलला नाही. त्याच्या भोवती कडे करून असणारे एक एक जण धारातीर्थी पडत होते.

हुसैनच्या शरीरातही तीर घुसले होते. पण त्याचे नमाज पठण सुरूच होते. इतक्यात मागून यजादने पाठवलेल्या एका जल्लादाने हुसैनच्या गळ्यावर सुरा फिरवला.

म्हणतात की, त्याचे शीर हे मृत्यूनंतर ही नमाजाच्या स्थितीतच होते.

हुसैन सोबत त्याचा लहान मुलगा अली असगर आणि इतर ७० सहकारी मारले गेले. शिया मुसलमान मानतात की, इमाम हुसैनने दाखवून दिले की अल्लाहवर विश्वास असेल तर कोणतेही अत्याचार सहन केले जाऊ शकतात.

===

हे ही वाचा कुणाच्या शिकवणींमुळे भारतासकट सर्वत्र रक्तपात आणि जिहाद फोफावतोय?

===

इमाम हुसैनचे एकच ध्येय होते ते म्हणजे इस्लाम टिकवून ठेवणे, त्याचा अपमान होऊ न देणे आणि त्यासाठी त्याने आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

याच बलिदानाची आणि हुसैनवर यजादने केलेल्या अत्याचाराची आठवण म्हणून शिया मुसलमान संपूर्ण सव्वा महिना स्वत:ला दोष देतात. हुसैनने अंगावर झेललेला प्रत्येक वार ते स्वत:च्या अंगावर जखमा करून अनुभवतात.

या प्रथेला ‘मोहरम मातम’ म्हणतात. या जखमांद्वारे ते शहजादा यजादच्या पाशवी अत्याचाराचा निषेध करतात. लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक शिया मुसलमान या महिन्यात शोक करतात.

 

Muharram-Festival-marathipizza01

 

सुन्नी मुसलमान मात्र या ‘मोहरम मातम’ प्रथेचा विरोध करतात. त्यांच्यानुसार ही प्रथा पाशवी आहे. ती थांबली पाहिजे. याच दृष्टीने सुन्नी मुसलमानांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.

यासाठी त्यांनी लहान मुलांना आधार बनवला आहे.

याचिका दाखल करताना त्यांनी आपले मत मांडले की, मोहरम मातम मध्ये लहान मुलांना भाग घेण्यास मनाई करण्यात यावी.

शिया मुसलमानांनी मात्र प्रथेच्या समर्थनार्थ असे मत मांडतात की,

“या प्रथेत आजवर कोणताही मूत्यू झालेला नाही.अंगावर करून घेण्यात येणाऱ्या जखमा या किरकोळ असतात. केवळ गुलाब पाणी लावूनदेखील त्या  भरून निघतात. इतर जाती-धर्मांच्या प्रथांना मिळणारी सुरक्षा आम्हाला देखील मिळायला हवी.”

विविध धर्मातील लोक हे विविध श्रद्धांचे पालन करत असतात. श्रद्धेच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीवर अत्याचार होऊ न देणे हेच मूळ असावे.

===

वरील माहिती ही घटनांवर आधारित असून कोणत्याही रीतीने या प्रथेचे समर्थन करण्याचा किंवा कोणत्याही पंथाच्या भावनांना दुखावण्याचा आमचा हेतू नाही.

===

हे ही वाचा इस्लाम मध्ये ‘समता’ आहे का? – वाचा काय म्हणतात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved

One thought on “मोहरमच्या महिन्यात सुरा आणि तलवारींनी का करतात मुसलमान लोक स्वत:ला जखमी?

  • September 13, 2019 at 12:57 pm
    Permalink

    हलाला या प्रथेबद्दल लेख लिहावा.तसेच हा विषय कोर्टात कुठेपर्यत आला आहे ते ही लिहावे.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?