' ८००० च्या आत येणारे हे स्मार्टफोन्स आहेत इतके जबरदस्त, की तुमचे पैसे वसूल होतीलच – InMarathi

८००० च्या आत येणारे हे स्मार्टफोन्स आहेत इतके जबरदस्त, की तुमचे पैसे वसूल होतीलच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोबाईल ही आता गरज राहिली नसून, ते एक व्यसन झालंय’ ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकलेली असेल, मात्र आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात काही वस्तूंसाठी ही म्हण चक्क उलट करून वापरावी लागेल. यातीलच एक महत्त्वाची वस्तू, म्हणजे मोबाईल!

‘स्मार्टफोन हे आता व्यसन राहिलं नसून, ती एक गरज झाली आहे’ असं जर म्हटलं, तर ते अजिबात चुकीचं ठरत नाही. कारण आज अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मोबाईलच्या साहाय्याने केल्या जातात.

युपीआयसारखे पेमेंटचे पर्याय आल्यापासून तर खिशात असणारा मोबाईल, ही चालतीफिरती बँक सुद्धा झालेला आहे. लहान मुलांसाठी विरंगुळा ते वयस्कर व्यक्तींसाठी दूरवर असणाऱ्या मुलांना सहज पाहता यावं याची सोय करणारा एक पर्याय; एक ना अनेक फायदे सांगता यावेत. अशी ही गरजेची वस्तू घेण्यासाठी बजेटचा सुद्धा विचार करावाच लागतो.

चला आज जाणून घेऊयात, काही बजेट फ्रेंडली फोन्स, ज्यांची किंमत आहे ८००० रुपयांहून कमी!

१. सॅमसंग गॅलक्सी एम 02

 

samsung galaxy m 02 im

 

९ हजारांच्या आसपास जाणारी मूळ किंमत असणारा हा फोन अनेक ऑनलाईन वेबसाईट्सवर अवघ्या सडे सात हजारांत उपलब्ध आहे. स्वस्तात हाय रिझोल्युशन आणि चांगल्या प्रोसेसरची अपेक्षा करत असाल, तर हा एक चांगला पर्याय आहे.

रॅमची अधिक आवश्यकता नसल्यास, ३ जीबी रॅमचा पर्याय सुद्धा यात उपलब्ध आहे. ३२ जीबी इंटर्नल मेमरीसह १३ आणि २ मेगापिक्सल असा कॅमेरा तुमचे फोटो सुद्धा उत्तम काढू शकतो.

तुम्ही सॅमसंग फोन्सचे चाहते असाल, तर या पर्यायाचा नक्कीच विचार करायला हवा.

२. झायोमी रेडमी 9 A

 

XIAOMI REDMI 9A im

 

दमदार बॅटरी बॅकअपसाठी हा फोन म्हणजे उत्तम पर्याय! तब्बल ५००० Mah ची बॅटरी असणारा हा फोन, ऑक्टा कोअर प्रोसेसर असणारा आहे.

२ जीबी, ३ जीबी आणि ४ जीबी असे तिन्ही पर्याय रॅमच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. अशा या झकास फोनची किंमत अवघी ८००० रुपये आहे. दिसायलाही स्टायलिश असणारा हा फोन घ्यायचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.

३. इनफिनिक्स स्मार्ट 6

 

infinix 6 im

 

मोठीथोरली स्क्रीन ही या फोनची खासियत म्हणायला हवी. ६.६ इंचांची स्क्रीन असलेला हा फोन आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह उपलब्ध आहे. याची किंमत ७९९९ रुपये इतकी आहे.

तुम्ही कॅमेराचे चाहते असाल, तर मात्र या फोनचा पर्याय तुमच्यासाठी फारसा फायदेशीर नाही असं म्हणायला हवं.

४. जिओनी मॅक्स प्रो

 

Gionee Max Pro im

 

उत्तम बॅटरी बॅकअप असणारा फोन हवा असणाऱ्यांसाठी हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे. ६००० Mah ची बॅटरी आणि १३ + २ मेगापिक्सल कॅमेरा असणारा हा फोन अवघ्या ६९९९ रुपयांत मिळू शकतो.

याचा फ्रंट कॅमेरा सुद्धा ८ मेगापिक्सल असून, सेल्फी काढण्याचं काम उत्तमरित्या करू शकतो.

५. रिअलमी सी ११

 

realme c11 im

 

कमी बजेटमध्ये स्टायलिश फोन हवा असेल, तर हा फोन तुमच्यासाठीच आहे. साडे सात हजार रुपये किंमत आणि लुकमध्ये अगदीच भारी असा हा फोन आहे.

१३ मेगापिक्सल कॅमेरा आणि ठीकठाक बॅटरी बॅकअपचा लाभ तुम्हाला या फोनमुळे होईल. लो बजेट फोन असल्यामुळे यात ४ जीबी फोनचा पर्याय मात्र उपलब्ध नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?