' तुरटी गुणकारक असते हे माहीत असेलच - पण "हे" भन्नाट फायदे महितीयेत का?

तुरटी गुणकारक असते हे माहीत असेलच – पण “हे” भन्नाट फायदे महितीयेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्वस्त आणि तितकीच बहुगुणी तुरटी

तुरटी हिची ओळख आपल्याला लहानपणी शाळेच्या पुस्तकातून झालेली असते किंवा आपल्या घरातील पुरुष मंडळींना बऱ्याचदा दाढी केल्यानंतर अॅण्टी सेपटीक म्हणून तिला गालावरून फिरविताना पाहिलेले असते. तर कधी पावसाळ्यात गढूळ झालेले पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी त्या पाण्यात फिरविली जाते. इतकीच आपल्याला तुरटी विषयी माहिती असते.
पण वरवर लहान दिसणारी ही चीज पार डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत हरएक बाबतीत उपयोगी असते ,हे तुम्हाला माहित आहे का?

तर पाहूया तुरटीचे ६ महत्त्वाचे फायदे –

१. केसांच्या समस्येवर उपयुक्त –

आजकाल तरुण वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी तुरटीची बारीक पूड करून, तुम्ही केसांना लावत असलेल्या तेलामध्ये ते थोडेसे कोमट करून, त्यात मिसळावी. अर्धा तासांनी ही पूड त्या तेलामध्ये चांगलीच विरघळलेली दिसेल. मग या तेलाने डोक्याला मसाज करावा. नंतर नेहमीप्रमाणे केस शॅम्पूने धुऊन टाकावे. महिन्यातून २-३ वेळा हा उपचार केल्यास हळूहळू पांढऱ्या केसांची समस्या कमी झालेली दिसेल.

Early Grey hair Feature InMarathi

तसेच बऱ्याचदा शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये डोक्यात उवा निर्माण होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी हे तुरटी मिश्रित तेल लावल्याने उवांचा नायनाट होतो आणि सतत डोक्याला खाज निर्माण होण्याच्या समस्येपासून सुटकारा मिळतो.

२. तोंड व दातांवरील समस्येवर रामबाण औषध –

एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर मीठ व एक लहानसा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करावे. हे पाणी गार झाल्यावर या पाण्याने गुळण्या केल्यास दातावरील किड कमी होते. शिवाय तोंडाला एक प्रकारची दुर्गंधी येत असल्यास ती हळूहळू नाहीशी होऊन तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

===

रात्री-अपरात्रीही डोकं वर काढणारी दातदुखी दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय…

केसांना फाटे फुटत आहेत? या टिप्स वापरा, केसही घनदाट होतील

===

३. ताप, खोकला व दमा सारख्या रोगांवर औषध म्हणून –

सध्या वातावरणातील बदलामुळे ताप, खोकला, दमा यासारख्या समस्या डोके वर काढू लागल्या आहेत. या समस्यांच्या सुरुवातीच्या काळातच रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये १० ग्रॅम खडी साखर व तितकीच तुरटीची पूड एकत्र करून घ्यावी. यामुळे चांगलाच आराम पडतो.

alum im

४. आखडलेल्या मांसपेशीवर उपयुक्त –

बऱ्याच जणांना मांसपेशी आखडण्याची समस्या भेडसावीत असते. अशावेळी तुरटी आणि हळदीची पूड एकत्र करून आखडलेल्या मांसपेशीवर लावल्यास आराम मिळतो.

५. चेहऱ्यावरील त्वचा उजळविण्यासाठी –

तुरटी हे एक उत्तम प्रकारचे सौंदर्य प्रसाधन आहे हे तुम्हाला माहितेय का. तुरटीची पूड करून त्यात थोडे गुलाबजल टाकून, त्याची दाटसर पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहरा धुवून त्यावर लावावी. १०-१५ मिनिटे ठेवून मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुमची त्वचा उजळलेली दिसेल. शिवाय चेहऱ्यावर वांग किंवा डागाची समस्या असल्यास ते देखील या वापराने दूर होतात.

alum and skin im

६. नितळ पायांसाठी –

चेहरा आणि केसांची आपण जितकी काळजी घेतो तितकीशी काळजी आपण आपल्या पायांची घेत नाही. बऱ्याच जणांचे पाय काळवंडलेले आणि त्यावरील त्वचा फाटलेली असते. अशावेळी कोमट पाण्यात तुरटी फिरवून त्या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय
बुडवून ठेवल्यास पायांच्या त्वचेमध्ये चांगलाच फरक झालेला दिसून येतो. केवळ शारीरिकदृष्ट्या नाही तर वास्तूच्या दृष्टीने देखील तुरटी ही खूप महत्वाची मानली जाते. तुरटीचा छोटासा खडा तुमच्या दरवाज्या जवळील पायपुसण्याखाली ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा येत नाही ,असे म्हटले जाते.

आता इतके सारे वाचल्यानंतर या स्वस्त अशा तुरटीचे किती फायदे आहेत, हे तुमच्या लक्षात आलेच असेल.

फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की, तुरटीचा वापर हा माफक प्रमाणात असावा. रोजच्या रोज तुरटीचा वापर केल्यास तो आरोग्याच्या दृष्टीने नुकसानदायी ठरू शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?