' सर्वांच्या मोबाईलमद्धे असणारे हे app करू शकतात बँकेतले पैसे गायब!

सर्वांच्या मोबाईलमद्धे असणारे हे app करू शकतात बँकेतले पैसे गायब!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हल्ली जगात कुठेही जा, मोबाईल फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. लहान असो वा वयस्कर प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतोच…! तसे बघितले तर मोबाईल फोनमुळे आपली अनेक कामे आता सोपी झाली आहेत.

मोबाईल फोनमुळे अवघे जग आता आपल्या खिश्यात आले आहे. परंतु आपल्याला माहित आहे का, जेवढे याचे फायदे आहे तेवढेच याचे तोटे देखील आहेत. मोबाईल फोनच्या वाढत्या वापराबरोबरच सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

mobile-in-hand-inmarathi

इंटरनेटच्या या युगात सायबर ठग मोठ्या प्रमाणावर लोकांना आपला बळी बनवत आहेत. यावरच आधारित हिंदी वेब सिरीज “जामतारा” सुद्धा बनलेली आहे.

Android वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ट्रेंड मायक्रोच्या नवीन सुरक्षा संशोधनातून असे दिसून आले आहे की, मालवेअर-लोड केलेले ड्रॉपर अॅप्स बँकिंग माहिती, पिन, पासवर्ड आणि बरेच काही यासह तुमचा डेटा चोरत आहेत. हे अप्स तुमच्या मोबाइल फोनवरील टेक्स्ट मेसेज देखील रोखू शकतात आणि धोकादायक मालवेअरने संक्रमित करू शकतात.

ड्रॉपर-एज-ए-सर्व्हिस (DaaS) मॉडेलकडे नेणारे मालवेअर वाहून नेत असताना Google Play Store सुरक्षेला बायपास करणारे अॅप्सला प्रकारे ड्रॉपर अॅप्स म्हणतात. ट्रेंड मायक्रोच्या सुरक्षा संशोधकांनी अशा 17 अॅप्सची यादी उघड केली आहे जी तुमच्या फोनवर इंस्टॉल केली जाऊ शकतात आणि तुमचा महत्त्वाचा डेटा चोरू शकतात.

apps-marathipizza

यादी –

Call Recorder APK, Rooster VPN, Super Cleaner- hyper & smart, Document Scanner – PDF Creator, Universal Saver Pro, Eagle photo editor, Call recorder pro+, Extra Cleaner, Crypto Utils, FixCleaner, Universal Saver Pro, Lucky Cleaner, Just In: Video Motion, Document Scanner PRO, Conquer Darkness, Simpli Cleaner और Unicc Scanner.

पेगासस आणि केंब्रिज अॅनालिटिकाच्या घटना जेव्हा जगासमोर आल्या होत्या तेव्हा जगभरातील अनेक वापरकर्ते त्यांच्या गोपनीयतेबद्दल चिंतित असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे लोकांच्या मनात नेहमीच भीती असते की, त्यांच्या मोबाईलमध्ये तर काही हेरगिरीचे अॅप डाउनलोड तर नाही झाले ना? किंवा त्यांचा खाजगी डेटा कुठेतरी लीक तर होत नाही ना? त्यामुळे आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरील स्पाय अॅप शोधू शकता आणि हटवू शकता.

fraud apps im

अनेकदा आपण कोणताही चित्रपट किंवा गाणी डाउनलोड करण्यासाठी पायरेटेड वेबसाइटला भेट देतो. त्यादरम्यान फोनमध्ये अनेक लिंक्स आपोआप उघडतात. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये स्पायवेअर अॅप येण्याची शक्यता असते. याशिवाय, अनावश्यक लिंक उघडल्यानंतरही तुमच्या फोनमध्ये स्पाय अॅप इन्स्टॉल होऊ शकतो.

===

बँक अकाउंटमध्ये पैसे instant transfer करण्याचा नवीन UPI app फंडा !

मनोरंजन असो किंवा काम, चायनीज ऍपशिवाय तुमचं काहीही अडत नाही हे सांगणारी भारतीय ऍप्स!

===

जर तुमच्या फोनवर स्पायवेअर अॅप इन्स्टॉल केले असेल तर अशावेळी फोनची बॅटरी लवकर संपुष्टात येईल. फोन कोणत्याही कारणाशिवाय स्वतःहून गरम होण्यास सुरवात करेल. याशिवाय अनेक अनावश्यक कामे मोबाईलमध्ये आपोआप होऊ लागतील. जर तुम्हाला तुमच्या फोनवर ही चिन्हे दिसली तर तुमच्या फोनमध्ये स्पायवेअर अॅप लपलेले आहे, असे समजून जावे.

settings im

फोनमधून स्पायवेअर अॅप डिलीट करण्‍यासाठी, प्रथम तुम्हाला सेटिंग्जवर जावे लागेल. तेथे तुम्हाला खाली अॅप व्यवस्थापनाचा (Application Management) पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर अॅप लिस्टचा पर्याय निवडा. आता तुमच्यासमोर अनेक अॅप्सची यादी उघडेल. येथे शीर्षस्थानी तुम्हाला एक रिकामी जागा दिसेल. ही रिकामी जागा काही नसून त्याच स्पायवेअर अॅप आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ते सहज हटवू शकता.

याशिवाय अनेक वेळा नाव बदलल्यानंतरही हे स्पायवेअर अॅप्स फोनमध्ये इन्स्टॉल होतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ते शोधू शकत नसाल तर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन रीसेट करावा लागेल. त्यानंतरच ते स्पायवेअर अॅप तुमच्या स्मार्टफोनमधून कायमस्वरुपी डिलीट होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?