' भारतातील अश्लीलतेशी संबंधित कायदे जे रणवीर सिंगच नव्हे - सर्वांना माहीत असायला हवेत!

भारतातील अश्लीलतेशी संबंधित कायदे जे रणवीर सिंगच नव्हे – सर्वांना माहीत असायला हवेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही वर्षांपूर्वी माजी मिस इंडिया आणि भारताची पहिली सुपरमॉडेल मधु सप्रे , एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मिलिंद सोमणसोबत न्यूड पोज दिल्याने चर्चेत आली होती. या पोस्टवरून बराच वाद झाला होता. मधुने या विषयी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होत की, मिलिंदसोबतच्या या न्यूड फोटोशूटमध्ये तिला काहीही अश्लील वाटले नाही.

मधू म्हणाली होती की, जेव्हा एखाद्या महिलेला मारहाण, शाब्दिक हिंसा, बलात्कार केला जातो तेव्हा अश्लीलता येते. फॅशन आणि फिल्म इंडस्ट्री ज्या वेगाने प्रगती करत आहे ते पाहता आगामी काळात त्यात दाखवली जाणारी नग्नताही वाढेल, लोकांना नग्नता बघायचीआहे आणि त्यावर टीका ही करायची आहे असं ही ती त्यावेळी म्हणाली होती.

मधु सप्रे आणि मिलिंद सोमण यांची ही न्यूड पोस्टर जाहिरात आल्यानंतर त्यांच्यावर अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता . मात्र, नंतर २००९ मध्ये या प्रकरणात दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ही एका शू ब्रँडची जाहिरात होती ज्यात मधु सप्रे आणि मिलिंद सोमण पूर्णपणे नग्न होते आणि त्यांनी फक्त बूट घातले होते. जाहिरातीत दोघांनीही गळ्यात अजगर घातला होता.

 

milind soman inmarathi 1
hindustan times

 

हे सगळे आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे रणवीर सिंग आणि सध्या गाजत असलेले त्याचे न्यूड फोटोशूट! त्यातच आता अनेक ठिकाणी त्याच्या विरुद्ध अनेक पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्याने तो चांगलाच अडचणीत आला आहे. ‘बॅंड बाजा बरात ‘ या सिनेमातून फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण करणारा रणवीरसिंग आपल्या भूमिकांपेक्षा आपल्या अतरंगी पणामुळे कायम चर्चेत राहिला आहे.

आताही आपल्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नग्न छायाचित्रामुळे अभिनेता रणवीर सिंह अडचणीत आला आह़े चेंबूर पोलिसांनी मंगळवारी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला़ काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंहने एका मासिकासाठी नग्न छायाचित्र दिले होते. त्याचे हे छायाचित्र सध्या प्रसारमाध्यमांवर सर्वत्र पसरले आहे. त्यावरून अनेकांनी रणवीरला लक्ष्य केल़े आहे.

चेंबूर परिसरातील एका सामाजिक संस्थेचे ‘ललित टेकचंदानी’ यांनी या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी रणवीर सिंहविरोधात ‘भादंवि कलम २९२, २९३, ५०९’ अंतर्गत गुन्हा नोंदवला़ भारताला चांगली संस्कृती लाभली असून, या छायाचित्रामुळे महिलांसह सर्वाच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदाराने केला आह़े.

 

ranveer 2 im

 

याआधी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी रणवीरच्या या छायाचित्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होत़े ‘‘जर लोकांसमोर नग्न होणे हे कलास्वातंत्र्य असेल तर मग मुस्लीम महिलांच्या हिजाबला विरोध का’’, असा सवाल त्यांनी केला होता़. एनजीओ आणि वकील ‘वेदिका चौबे’ यांच्या तक्रारीच्या आधारे, मुंबई पोलिसांनी कलम २९२ (अश्लील साहित्याची विक्री), २९३ (अल्पवयीनांना अश्लील साहित्याची विक्री), ५०९ (कोणत्याही शिक्षेद्वारे महिलेचा अपमान) अंतर्गत गुन्हा नोंदवला. दंडविधान. कर्ण) आणि आयटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला.

अभिनेत्याच्या नग्न छायाचित्रामुळे महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप एनजीओने केला आहे. तक्रारकर्त्याने म्हंटल आहे की, “रणवीर सिंग एक ए-लिस्ट अभिनेता आहे ज्याच्या चित्रपटांचा तरुणांवर मोठा प्रभाव पडतो. त्याची ही छायाचित्रे अतिशय अश्लील असून केवळ पैशाच्या लालसेपोटी त्याने हे कृत्य केल्याचं दिसतं, तेव्हा त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

रणवीर सिंगवर अश्लीलता पसरवल्याप्रकरणी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरवर कोणत्या कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि काय शिक्षा होऊ शकते ते ही आपण जाणून घेऊया.

IPC कलम २९४

अश्लीलता कायद्याच्या २९४ मध्ये म्हंटल आहे की जर कोणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केलं तर तो गुन्हा आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ मध्येअसं  म्हटलंआहे की अश्लील कृत्ये करणं, अश्लील गाणी गाणं किंवा सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द बोलणं ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्रास होऊ शकतो.

या प्रकरणात आरोपीला ‘तीन महीने कारावास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही’ अशी शिक्षा होवू शकते. आयपीसी सेक्शन २९२अंतर्गत अश्लील पुस्तकं, पॅम्प्लेट, चित्रे, चित्रे विकणं, वाटणं हा गुन्हा आहे. तथापि, लोककल्याण, विज्ञान, साहित्य, कला किंवा कोणत्याही शिक्षणासाठी पुस्तक तयार केलेल्या प्रकरणांमध्ये हा कायदा लागू होत नाही.

 

pak-court.InMarathi

 

या कलमान्वये, आरोपीला दोन वर्षांपर्यंत वाढू शकणार्‍या कालावधीसाठी कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची आणि दोन हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते आणि दुसर्‍यांदा दोषी आढळल्यास कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. पाच वर्षांपर्यंत वाढू शकेल अशी मुदत आणि पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

आयपीसी सेक्शन २९३ अंतर्गत जर एखादी व्यक्ती २० वर्षाच्या आतली असेल आणि ती व्यक्ती अश्लील मासिकं विकताना आढळून  त्या व्यक्तीला ३ वर्ष कारावासाची शिक्षा आणि २००० रुपये दंड भरावा लागतो शकतो.

IPC कलम ५०९

एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेला अपमानित करण्याच्या हेतूने शब्द बोलणं हा गुन्हा आहे. यात दोषी आढळल्यास ३ वर्षे कारावासाची शिक्षा होवू शकते.

IT Act ६७(A) अंतर्गत सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे अश्लील साहित्य पोस्ट करणं  हा IT कायद्याच्या कलम ६७(A) नुसार गुन्हा आहे. यामध्ये आरोपीला ५ वर्षे तुरुंगवास किंवा १० लाख रुपये दंड होऊ शकतो.

रणवीर सिंगवर लावण्यात आलेल्या आरोपांवर वरिष्ठ वकील नीति प्रधान म्हणाल्या, ‘रणवीर सिंगला त्याचे हे फोटो प्रसिद्ध होऊ द्यायचे नव्हते. हे मीडियाने केलं आहे आणि जर रणवीरने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केले असेल तर तो गुन्हा ठरत नाही. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी कोणाचीही सक्ती नाही.

जर एखाद्याला कलेचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तो खजुराहो मंदिरात जाऊ शकतो.’ ज्येष्ठ वकील अमित देसाई म्हणतात, ‘नग्न छायाचित्रे दाखवणे अश्लीलता कायद्याच्या कक्षेत येऊ नये. नग्नता अश्लील नाही आणि IPC च्या कलम २९२ च्या अर्जाद्वारे आवश्यक असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या फायद्यासाठी किंवा द्वेषासाठी प्रकाशित केले गेले नाही असे दिसते.

प्रसिद्ध जाहिरात चित्रपट निर्माते प्रल्हाद कक्कर म्हणतात, ‘या तक्रारीला कोणताही आधार नाही. रणवीर सिंग भारतात नव्हे तर न्यूयॉर्कमध्ये प्रकाशित होणाऱ्या मासिकासाठी पोझ देत असताना हे कसं घडू शकतं ? मला वाटतं तक्रार दाखल करणाऱ्या वकिलाला फक्त प्रसिद्धी हवी असेल. कुंभमेळ्यात नग्न योगीच्या पायाला हात लावणे ठीक आहे, पण समोरच्या व्यक्तीची पूर्ण नग्नताही न दाखवणारे नग्न चित्र त्यांच्या भावना दुखावते.

 

aghori sadhu featured IM

आजच्या ‘बोल्ड’ मॉडेल्सना लाजवेल अशी एक मॉडेल “तेव्हा” जुहू बीचवर नग्न धावली होती!

९० च्या दशकातल्या ‘या’ जाहिराती लागल्या की पालक लगेच टीव्हीचा रिमोट शोधायचे!

अखेर प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आपल्या देशाच्या घटनेने दिला आहे. आणि पाऊस पडला की वर्षभर अज्ञातवासात असलेले बेडूक त्यांचा आलाप गायला सुरू करतात हे तर तुम्ही जाणताच. तेव्हा एकंदर अश्लिलता कायद्यातील तरतूद पाहता रणवीर सिंग याला शिक्षा होईल की नाही हे पाहणं उत्सुकता वाढवणारं आहे नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?