' धक्कादायक वास्तव समोर? नेताजींचा विमान अपघातातील मृत्यू ही निव्वळ दिशाभूल… – InMarathi

धक्कादायक वास्तव समोर? नेताजींचा विमान अपघातातील मृत्यू ही निव्वळ दिशाभूल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गुपित म्हणजे इतिहासामधील न उलगडलेले सत्य आहे. या विषयावर इतिहासामध्ये एवढे वेगवेगळे सिद्धांत आहे की कोणतीही एक बाजू घेणे खूप कठीण आहे.

प्रत्येकवेळी वेगवेगळे दावे केले जातात. आता एका फ्रेंच इतिहासकाराने असा दावा केला आहे की, नेताजी सुभाषचंद्र बोस हे विमान अपघातात मृत्युमुखी पडले नव्हते.

 

netaji-bose-marathipizza01

 

पॅरीस स्थित भारतीय वंशाचे इतिहासकार जे. बी. पी. मोर यांनी फ्रेंच सिक्रेट सर्विसेसच्या रिपोर्टनुसार अहवालाने हा दावा केला आहे. मोर यांच्या म्हणण्यानुसार

नॅशनल अर्काइव्ज ऑफ फ्रांसमध्ये ११ डिसेंबर, १९४७ रोजी मिळालेल्या कागदपत्रांनुसार नेताजी जिवंत असल्याचे सांगितले गेले आहे.

मोर पुढे म्हणतात,

या कागदपत्रांमध्ये सांगितले गेले आहे की, ते तैवान मध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मारले गेले नव्हते, तर याउलट या कागदपत्रांमध्ये लिहिले गेले आहे की, सुभाषचंद्र बोस यांच्या पत्ता अजूनही लागलेला नाही.

“याचा अर्थ की फ्रेंच गुप्तहेर संघटना अजूनही या गोष्टीशी सहमत नाही की, बोस यांचा मृत्यू १८ ऑगस्ट,१९४५ ला झाला होता.” (स्रोत)

netaji-bose-marathipizza02

 

त्यांनी त्यांच्या बोलण्याचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, “या गुप्तहेर संघटनेच्या कागदपत्रांनुसार बोस भारत – चीनच्या सीमेवरून पळून जाण्यास यशस्वी झाले होते. तेथून ते नेमके कुठे गेले याबद्दल पूर्णपणे खात्री नाही आहे, परंतु या कागदपत्रांनुसार बोस १९४७ च्या डिसेंबरपर्यंत जिवंत होते.

बोस यांच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी भारत सरकारने तीन वेळा या प्रकरणाची चौकशी केली आहे.

अपघातानंतर जवळपास ११ वर्षानंतर १९५६ मध्ये ३ सदस्यांची ‘शाहनवाज कमिटी’ बनवली गेली होती. त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे विमान अपघातामध्ये मारले गेल्याचे सांगितले होते.

१९७० मध्ये इंदिरा गांधीच्या सरकारने पंजाब हायकोर्टाच्या माजी चीफ जस्टिस जी.डी.खोसला यांना हे प्रकरण सोडवण्याची जबाबदारी दिली. खोसला समितीने सुद्धा शाहनवाज कमिटीच्या निष्कर्षांची पुष्टी केली.

गेल्या वर्षी मे मध्ये सुद्धा सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युबद्दलच्या कारणांविषयी माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करत विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये गृहमंत्रालयाने त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे.

१९९९ मधील मुखर्जी कमिशनच्या रिपोर्टने सुद्धा नेताजी तायहोके विमानतळावर अपघातामध्ये मृत पावल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला होता. या रिपोर्टवरून त्या काळी बरेच वाद विवाद झाले होते.

 

netaji-bose-marathipizza03

 

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबद्दल अजून एक दावा केला जातो तो म्हणजे, सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू रशिया मध्ये झाला होता. सरकारने त्यांच्या मृत्यूशी निगडीत ३७ कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. या कागदपत्रांनुसार,

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास २० वर्षापर्यंत नेहरूंच्या सांगण्यावरून भारतीय गुप्तहेर संघटनेने बोस यांच्या कुटुंबावर पाळत ठेवली होती.

ही गोष्ट आश्चर्यात टाकणारी आहे.

कारण हे तेच नेहरू आहेत जे १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींच्या मृत्यूची बातमीऐकून जोरजोरात रडले होते.

हे तेच नेहरू आहेत ज्यांनी आझाद हिंद सेनेच्या बाजूने लाल किल्ल्यामध्ये खटला लढवला होता.

netaji-bose-marathipizza04

 

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूवर ‘इंडियाज बिगेस्ट कवरअप’ लिहिणारे अनुज धर यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, २००६ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयमध्ये असलेल्या नेताजींच्या मृत्यूशी निगडीत फाइल्स सार्वजनिक करण्याची मागणी जेव्हा त्यांनी केली होती तेव्हा या फाइल्स संवेदनशील असल्याचे सांगून त्यांच्याची मागणीला फेटाळण्यात आली होती.

आता या फ्रेंच इतिहासकाराच्या दाव्याने या रहस्याला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?