' स्वस्तात मस्त विमान प्रवास करायचाय? मग या खास ८ टिप्स तुमच्याचसाठी – InMarathi

स्वस्तात मस्त विमान प्रवास करायचाय? मग या खास ८ टिप्स तुमच्याचसाठी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

या जगामध्ये असा कोणीच नसेल ज्याला प्रवास करायला आणि फिरायला आवडत नाही. प्रवास ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे कितीही टेंशन असू द्या, ते झटक्यात दूर होऊन जातं….! त्यामुळे अनेक लोक सतत सहलीवर जात असतात.

 

travel inmarathi

 

तुम्हालाही अनेकदा नवीन लोकांना भेटावे आणि नवीन ठिकाणे एक्सप्लोर करावेसे वाटत असेल, परंतु काहीवेळा बजेट आपल्याला साथ देत नाही आणि या कारणामुळे आपले फिरण्याचे प्लॅन अर्धवट राहून जातात.

त्यामुळे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की प्रवासाचे तिकीट कमीत कमी दरात कसे मिळवता येईल.

तुम्ही बघितले असेल की अनेक लोकांसाठी फ्लाइट तिकीट बुक करणे हे खूप कठीण काम असते, यामागचे कारण म्हणजे फ्लाइट तिकीटच्या किंमती बजट मध्ये न बसणे.

अनेकवेळा तर आपण बुकिंगच्या प्रक्रियेमध्ये असतो आणि मधातच तिकीट मिळणे बंद होऊन जाते. एक प्रकारे, प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छित स्थळी लवकर पोहोचण्यासाठी विमानाने प्रवास करते, परंतु बहुतेक वेळी यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.

 

plane im

 

त्यामुळे चला तर मग जाणून घेऊया विमानाचे तिकीट स्वस्त दरात मिळवण्याच्या काही टिप्स :-

● वेळेचं नियोजन

जर तुम्ही विमानाने नियमित प्रवास करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की जसजशी आपल्या प्रवासाची तारीख जवळ येते, तसे विमानाच्या तिकीटीचे रेट वाढत जातात. म्हणून, शक्यतो तिकीट लवकर बुक करा.

 

booking im

 

विमानाच्या तिकीटीच्या किंमती वर-खाली कशा जातात, यांवर जर आपण योग्यरित्या लक्ष ठेवले तर आपल्याला नक्कीच स्वस्त तिकीट मिळेल. साधारण दोन-तीन महिन्यांआधी विमानाची तिकीट काढावी.

● सण, सुट्ट्या हे दिवस टाळा

तुम्ही विमानाने कधी प्रवास करत आहात, यांवर देखील किंमती ठरलेल्या असतात. होळी, नवरात्री किंवा ख्रिसमस सारख्या सुट्ट्या असल्यास, किंमती खुप जास्त असतात.

 

travel im

 

त्याचप्रमाणे, आठवड्याच्या वीकेंडला देखील तिकीटीचे दर जास्त असतात. यामुळे जर आपल्याला स्वस्त तिकीट हवे असेल तर तुमचे प्लॅन एखाद्या अश्या दिवशी ठेवा, जेव्हा काहीच विशेष नसेल, जसे की वीकेंड किंवा सण!

● विविध पर्यायांचा वापर

फ्लाइट बुक करण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या सर्च इंजिन वर तिकीटीचे दर बघा. कारण प्रत्येक सर्च इंजिन वर वेगवेगळे दर असतात.

 

search im

 

अनेकवेळा तर काही सर्च इंजिन आपल्याला काही मोजक्याच एयरलाइन्सच्या तिकीट दाखवतात. त्यामुळे कमीत कमी ३-४ सर्च इंजिन वर तिकीटांची तुलना करा.

● स्वस्तात मस्त पर्याय शोधा

काही एयरलाइन्स खुप महागड्या असतात. त्यामुळे आजकल यांना स्पर्धा म्हणून अनेक एअरलाईन्स स्वस्त बजेट मध्ये तिकीट उपलब्ध करून देत आहेत. या एअरलाइन्स तुम्हाला कमी किंवा मध्यम-स्तरीय बजेटमध्ये प्रवास करण्याची मुभा देतात.

 

 

online 1 im

 

त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या खिशाला ठेच न लागता स्वस्तात उड्डाण करायचे असेल तर स्वस्त तिकीट देणाऱ्या एयरलाइन एक उत्तम पर्याय आहे.

● इन्गॉनिटो मोड वापरा

जर तुम्ही तिकीट बुक करण्यासाठी एखाद्या वेबसाइटला वारंवार भेट देत असाल तर विमान कंपन्यांकडून तुम्हाला जास्त दर दाखवले जातात आणि यासाठी ते आपल्या सर्चिंग हिस्ट्री आणि कूकीजचा वापर करतात.

त्यामुळे कुठलीही तिकीट बुक करायची असेल तर नेहमी incognito मोड वर जाऊन सर्चिंग करा. याच्यावर आपली सर्चिंग हिस्ट्री आणि कुकीज़ सेव होत नाही. त्यामुळे आपोआप कमी दरांचे तिकीट उप्लब्ध होतात.

● ग्रूप बुकिंग करताना काळजी घ्या

जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसोबत ग्रुपमध्ये तिकीट बुक करत असाल तर हे शक्यतो टाळा, कारण विमान कंपन्या अशावेळी सर्वाधिक तिकीट दर दर्शवतात. यामागचे कारण म्हणजे त्यांना त्यांचे तिकीट अधिकाधिक दरात विकायच्या असतात.

 

group im

 

त्यामुळे एका- एकाच व्यक्तीसाठी तिकीटचे काय दर येत आहेत, हे तपासून घ्या. यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत बसायला मिळत नाही, तरीही तुमची यात मोठी बचत होऊ शकते.

● सोशल मिडीयाचा आधार घ्या

जेव्हा तुम्ही एअरलाइन्सचे तिकीट बुक करण्यासाठी एखाद्या वेबसाईटला भेट देता, तेव्हा त्यांच्या नोटिफिकेशन ला नेहमी ‘Allow’. असे केल्याने तुम्हाला त्वरीत विशेष ऑफर्सची माहिती मिळेल, त्यामुळे त्यांची विक्री होण्यापूर्वीच तुम्ही तिकीट बुक करु शकाल.

तुम्ही GoAir, Air Asia, Jetstar, Indigo आणि SpiceJet सारख्या एअरलाइन्सच्या पेजेसना Facebook आणि Twitter वर फॉलो करू शकता आणि याद्वारे विविध डील आणि ऑफर्सबद्दल माहिती मिळवू शकता.

 

booking 1 im

 

स्वस्त तिकीट मिळवणे हे काही खुप कठीण काम नाही, तुम्हाला फक्त या युक्त्या ठाऊक असायला हव्यात. त्यामुळे जर तुम्ही आम्ही सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच स्वस्त तिकीट मिळवता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?