' या राजाच्या शिकारीच्या हौसेमुळे भारतात आफ्रिकन चित्ते आणावे लागलेत

या राजाच्या शिकारीच्या हौसेमुळे भारतात आफ्रिकन चित्ते आणावे लागलेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जुन्या सिनेमात प्रचंड मोठी हवेली, तिच्या दिवाणखान्यात पेंढा भरून ठेवलेली हरणांची, वाघांची मुंडकी, वाघाचे कातडे बाजूलाच बंदूक घेतलेला एखादा शिकारी वेशातील पूर्वजाचा फोटो हा जामानिमा सर्रास असायचा. ते बघताना काही क्षणापुरते तरी काळीज धडधडायचे. म्हणजे त्याकाळी राजेरजवाडे शिकार करत आणि त्याची खूण म्हणून मृगाजीन, व्याघ्रजीन टांगून ठेवत. पण या शिकारीच्या हौसेपायी किती प्राणी नामशेष केले गेले याकडे कुणीच पाहिलं नाही.

निसर्गाने माणसाला अनेक गोष्टींचे वरदान दिले आहे. जंगल संपत्ती, त्याने चालणारे जलचक्र आणि त्यावर अवलंबून असलेले एकंदरीत जीवन. पण माणूस निसर्गाच्या विरोधात उभा ठाकला आहे आणि त्याने प्रचंड जंगलतोड, शिकारी करून संपूर्ण नैसर्गिक अधिवास धोक्यात आणला आहे.

कितीतरी जंगली जनावरांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. वाघ मोजकेच राहिले आहेत, सिंह कमी झाले आहेत पण एक जात तर नामशेष झाली आहे ती म्हणजे चित्ता. जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन आणि पँथर अँड वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटी यांच्या अहवालानुसार जगातून ९१% चित्ते संपले आहेत. जगातील सर्वात वेगाने धावणारा चित्ता आता जगातून संपायच्या मार्गावर पोहोचला आहे.

 

cheetah im 1

 

नुकतीच सुप्रीम कोर्टाने भारतात आफ्रिकन चित्ते आणायची परवानगी दिली आहे. वास्तविक भारत हा अतिशय निसर्गसंपन्न भूभाग आहे. इथे असलेली जैव विविधता हा निसर्गाचा चमत्कारच आहे. आपण अशा परिस्थितीत पण जर एखादी प्रजाती विलुप्त होत असेल तर याचा सरळ सरळ अर्थ असाच होतो की मानवाने त्या आधिवासावर अतिक्रमण केले आहे.

बेसुमार जंगलतोड, केवळ हौसेसाठी जंगली प्राण्यांची कत्तल वाटावी अशी शिकार, डोंगरात घरांचे बांधकाम अशा कामाने माणसाने निसर्ग संपवत आणला आहे. यातच बऱ्याच जाती नाहीशा झाल्या आहेत.

जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन यांच्या अहवालानुसार संपूर्ण जगात फक्त ७१०० चित्ते शिल्लक राहिले आहेत.अब्जावधी माणसांच्या लोकसंख्येत केवळ ७१०० चित्ते? बघा किती मोठा फरकाचा आकडा आहे.

चित्त्याची ठिपक्या ठिपक्यांची कातडी लोकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. त्याच्या तस्करीसाठी लोकांनी चित्त्याची प्रचंड प्रमाणात शिकार केली आहे. आणि याचा परिणाम म्हणून आशियाई चित्त्यांची संख्या सर्वात जास्त घटली आहे. आशिया खंडात केवळ ईराणमध्येच ५० चित्ते आहेत. परंतु २० व्या शतकात अफगाणिस्तान, इस्रायल या देशात पण चित्ते अस्तित्वात होते.

 

cheetah im 2

 

चित्ता हा मार्जार कुलातील मांसभक्षक प्राणी. चित्ता आणि बिबट्या हे दोन्ही थोड्याशा फरकाने एकसारखेच वाटतात. पण चित्त्याच्या अंगावर असलेले ठिपके हे भरीव असतात तर बिबट्याच्या अंगावर असलेले ठिपके हे पोकळ असतात. चित्त्याची लांबी ४ फूट असते. साधारण ४५ ते ६० किलो वजनाचा चित्ता १० ते २० वर्षे जगतो. त्याचा पळण्याचा वेग हा तशी ११० ते १२० किमी असतो.

सन १९०० मध्ये संपूर्ण जगात १ लाख चित्ते जिवंत होते. भारतात मुघलकालात एक हजार चित्ते अस्तित्वात होते. इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांची बेसुमार शिकार केली. इतकी की भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत चित्ते भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आले होते.

१९४७ साली केवळ ३ चित्ते बाकी होते. त्यांचीही शिकार मध्यप्रदेशच्या रामानुज प्रताप सिंग यांनी शिकार करून भारतातून चित्ते संपवून टाकण्याचे पुण्यकर्म केले. मात्र तिकडच्या गावकऱ्यांच्या मते चित्ते तेव्हा माणसांची शिकार करत असे म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिकार करण्यात आली. आणि भारतातून आता चित्त्यांची जमात संपल्यात जमा झाली आहे.

२००० साली भरत सरकारने चित्त्यांचे क्लोन करायचे ठरवले. पण त्यासाठी चित्ते होतेच कुठे? त्यासाठी हैदराबाद मधील सेंटर फॉर सेलूलर अँड मॉलिकुलर बायोलॉजी येथील वैज्ञानिकांनी ही योजना आखली. भारत सरकारने ईराण सरकारला चित्त्याच्या नर मादीची एक जोडी पाठवायची विनंती केली. पण ईराणने त्याला दाद दिली नाही. मग दुसरा प्रयत्न म्हणून निदान त्यांच्या कोशिका तरी पाठवाव्यात असा दुसरा पर्याय सुचवला पण ईराण त्यालाही तयार झाला नाही.

एक भयंकर गोष्ट म्हणजे कितीतरी वन्य प्राण्यांची शिकार अंधश्रद्धेपोटी किंवा शोबाजीसाठी केली गेली. जसे कासव, खवले मांजर,घोरपड, एकशिंगी गेंडा, हस्तिदंत वगैरेसारख्या वस्तू मिळवण्यासाठी सर्रास या प्राण्यांना मारून टाकले जाते. तसेच चित्ता वाघ यांच्या कातडीसाठी त्यांची शिकार होत गेली. त्यापासून कोट वगैरे बनवले जातात. आणि त्या कातड्याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यात प्रचंड पैसा मिळवला जातो.

 

maharajah im

 

काही प्राण्यांचे अवयव सहसा औषधापेक्षा काळी जादू करण्यासाठी वापरले जातात. तर काही अवयव दागिने बनवण्यासाठी वापरले जातात. जसे प्राण्यांचे दात, पंख, कवच, कातडे यांचा वापर करून बऱ्याच गोष्टी बनवल्या जातात. बुद्धिबळाचे सेट, कोट अशा वस्तू तयार केल्या जातात.

श्रीमंत लोकांचे दिवाणखाने सजवण्यासाठी या वन्य प्राण्यांचे डोके, कातडी ठेवली जाते. चित्ता अशाच करणातून झालेल्या शिकारीतून नामशेष झाला आहे. जगभरात चित्त्यांची संख्या विलक्षण प्रमाणात घटली आहे. याची आकडेवारी पहिली तर खरोखर माणूस माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे का असा प्रश्न पडतो.

गेल्या १६ वर्षात झिम्बाब्वे मध्ये चित्त्यांची संख्या १२०० वरून १७० झाली आहे. जंगलावर अतिक्रमण करून माणसाने जंगलात घरे बांधली. मग कित्येकदा चित्ता मानवी वस्तीत आला आणि लोक त्यालाच आमच्या अधिवासात आला म्हणून मारून टाकतात.

एका सर्व्हेत असं आढळून आलं आहे की, बहुतेक चित्ते हे जैव संरक्षण अधिवासाच्या बाहेर असल्यामुळे तस्कर आणि शिकारी यांच्या तडाख्यात सहजी सापडून मारले गेले आहेत. शिकारीच्या शोधात चित्ते जवळपासच्या खेड्यात गेले असता तेथील शेतकरी, त्यांचे कुत्रे मिळून सहजी त्याला मारू शकतात.

खूपदा आपला अधिवास सोडून बाहेर आलेले चित्ते रस्त्यावर वाहनाखाली सापडून मेले आहेत. मागे ९० च्या दशकात जेव्हा इराक ईराण युद्ध झालं तेव्हा सीमेवरील खुपसे जंगली प्राणी मारले गेले त्यात चित्तेही होते. त्याचाही परिणाम चित्त्यांच्या संख्येवर झाला.

 

cheetah im 4

होय! या वनस्पती नॉनव्हेज खातात… अशी करतात शिकार आणि खातात मांस!

एका Python मुळे आपल्या NH66 चं काम तब्बल ५४ दिवस थांबवलं गेलं होतं!

आता जागतिक पातळीवर या सर्व गोष्टींची दखल घेऊन चित्ता वाचवण्यासाठी त्याच्या संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम सुरु केले गेले आहेत. तेहरानमध्ये एक प्रकल्प राबवला जात आहे. तेहरानमध्ये एका पार्कमध्ये त्यांचे प्रजनन केंद्र उभारले आहे. भारतातही २००१ पासून यावर अंमलबजावणी सुरु आहे. पण अजून तरी त्याचे म्हणावे असे यश दिसत नाही.

हे सारे बघताना बहिणाबाई चौधरींच्या त्या ओळी आजही तितक्याच खऱ्या आहेत हे पटतं-

अरे मानसा मानसा कधी होशील मानूस?

लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस!

आपल्यासारखाच त्या प्राण्यांना पण जगायचा हक्क आहे. त्यांना जगू द्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?