' टाईमपास कितीही येऊ द्या पण त्यातल्या पहिल्या पार्टचे डायलॉग प्रेक्षक आजही विसरले नाहीत…. – InMarathi

टाईमपास कितीही येऊ द्या पण त्यातल्या पहिल्या पार्टचे डायलॉग प्रेक्षक आजही विसरले नाहीत….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज मेरे पास गाडी हैं बंगला है बँक बॅलन्स हैं तुम्हारे पास क्या हैं? बच्चनजींच्या या तडफदार डायलॉगवर शशीजी काकुळतीने म्हणतात मेरे पास माँ है… आज जवळपास ४ दशकं लोटली असतील तरीही बॉलीवूडला यापेक्षा भारी डायलॉग लिहता आला नाही. सलीम जावेद या जोडगळीने जे काही अजरामर डायलॉग लिहून ठेवले आहेत जे आजही लोकांच्या लक्षात आहेत.

आज सिनेमाची परिभाषा शिकवणारी मंडळी जिवाच्या आकांताने सांगत असतात सिनेमा हे फक्त दृश्य माध्यम आहे. संवाद हे नाटकाचं माध्यम आहे. मात्र आपल्याकडील शब्दबंबाळ सिनेमाची सुरवात बोलपटापासून झाली. आज साऊथ सिनेमा लोकांना आवडतो ते त्यातील लार्जर दॅन लाईफ गोष्टींमुळे आणि त्यातील संवादनामुळे…

सिनेमातील तज्ज्ञ मंडळी कितीही म्हणो पण भारतीय मानसिकतेला संवाद हा लागतोच, मग तो हिरो व्हिलनमधला असो किंवा हिरो हेरॉईनमधला..लोकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या संवादाला प्रेक्षकांची पसंती असतेच. बॉलीवूडमध्ये तर गाजलेले संवाद आहेतच मात्र आपला मराठी सिनेमा देखील मागे नाही..

मराठी सिनेमाची ओळख म्हणजे ग्रामीण सिनेमा, मात्र गेल्या काही वर्षात मराठी सिनेमात केवळ कथेत नव्हे तर तंत्रज्ञानात देखील प्रगती केली आहे. नुकताच धर्मवीर सिनेमा येऊन गेला त्यातील संवाद प्रत्येक शिवसैनिकाच्या तोंडी आहेत. टाईमपास ३ नावाचा सिनेमा येऊ घातलाय. पुन्हा एकदा प्रेक्षकांना हा टाईमपास अनुभवणार आहेत मात्र आजही पटकन लक्षात राहतो तो पहिला टाईमपास आणि त्यातील संवाद….यातीलच काही संवाद आपण बघुयात…

 

tp im 2

 

नया हैं वह :

टाईमपास सिनेमात पहिलाच सीन आजही लोक पून्हा पून्हा बघतात. सिनेमाचा हिरो दगडू आणि शाकाल यांच्यातला पहिलाच सीन. कडक शिस्तीचे माधव लेले दगडूला त्याच्या राहणीमानावरून भाषेवरून सुनावतो तेव्हाच दगडूसोबत असणारं पात्र दगडूची बाजून घेऊन त्यांची समजूत काढतो मात्र ते माधव लेले काही ऐकत नाहीत. तेव्हा नया है वह वरून त्यांच्यात वाद रंगतो.

आई बाबा आणि साई बाबांची शपथ अशीच पाहिजे आपल्याला :

दगडू सिनेमात जरी खोडकर असला तरी तो साईभक्त दाखवला आहे. साईबाबांवर त्याची प्रचंड श्रद्धा असते. म्हणूनच तो एका सीनमधून वरील संवाद बोलून जातो.

चला हवा येऊ द्या :

दगडू अशुद्ध मराठी बोलणारा दाखवला आहे तर प्राजक्ता त्याउलट, दगडू एका सीनमध्ये जो मोठ्याने संवाद म्हणतो तोच संवाद अगदी प्रमाण भाषेत प्राजक्ता बोलून दाखवते, आणि त्यातला शेवटचा शब्द आहे चला हवा येऊ द्या. हा शब्द इतका हिट झाला की त्यावर एक शोचं तयार झाला.

 

chala hava yeu dya inmarathi

 

याला म्हणतात MM मॅरेज मटेरियल :

दगडू जरी कॉलेजात जाऊ शकत नसला तरी तो त्याच्या मित्रांसोबत कॉलेजमध्ये टाईमपास करत असतो. आणि त्याच वेळी दगडूचे मित्र दगडूला कॉलेजमधल्या वेगवेगळ्या मुलींबद्दल सांगत असतात. तेव्हाच प्राजक्ताची एंट्री होते तेव्हा तिची ओळख करताना त्यांच्यातला एक मित्र प्राजक्ताला MM म्हणतो..

तुझ्याकडे बघून तुझा आणि बुद्धीचा संबंध वाटत नाही :

दगडू प्राजक्ताच्या घरच्याना इम्प्रेस करण्यासाठी तिच्याच भावाच्या वाढदिवसाला घरी जातो. आधीच माधव लेलेंना न आवडणारा दगडू घरात आल्यावर ते त्याची परीक्षा घेतात.

 

tp im 1

इम्रान हाश्मीला आवरा! म्हणतोय “दीपिका बरोबर “तसे” सीन्स करायचे आहेत”!

कोण म्हणतं राजकारणी रोमँटिक नसतात? वाचा राजकारण्यांच्या ८ सदाबहार प्रेमकहाण्या

दगडू लाईफमध्ये लव्ह नावाचा टाईमपास पाहिजे :

खरं तर मित्र कॉलेजला गेलेले असतात मात्र दगडूला ते प्रेमाचं महत्व समजावून सांगत असतात. त्यांच्यातील एक मित्र दगडूला लव्ह आणि टाईमपासबद्दल सांगतो.

टाईमपास नव्हता तो आपल्या आयुष्यातला बेस्ट टाईम होता…

सिनेमाच्या शेवटाकडे आल्यानंतर हा बॅकग्राउंडला दगडूच्या आवाजात हा संवाद आहे. सिनेमाचा शेवटी दोघांच्यात ताटातूट होते.

टाईमपास २ सुद्धा काही वर्षांपूर्वी आला होता आता ३ येतोय. मात्र पाहिल्याची सर कोणालाच नाही. पहिल्या सिनेमातील संवाद, गाणी, हळुवार प्रेमकथा अशा सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या.  याचं श्रेय जात ते दिग्दर्शक रवी जाधव यांना आणि संवाद लेखक प्रियदर्शन जाधव याला. पहिल्या भागात केतकी माटेगावकर होती आताच्या भागात ऋता दुर्गुळे हिरॉइन आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?