' राष्ट्रपती ज्या शाही बग्गीतून आल्या ती खरी तर टॉस जिंकून मिळाली आहे – InMarathi

राष्ट्रपती ज्या शाही बग्गीतून आल्या ती खरी तर टॉस जिंकून मिळाली आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी पार पाडला. राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा म्हणजे एक वेगळा प्रकारचा थाट असतो. एका बग्गीतून राष्ट्रपती भवनात त्या शपथविधीसाठी गेल्या होत्या. याच बग्गीमागे एक किस्सा आहे जो आजच्या लेखात जाणून घेणार आहोत..

हा किस्सा आहे १९४७ सालातला, जेव्हा अखंड भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन देश स्वतंत्र झाले होते, मग जमीन आणि सैन्यापासून प्रत्येक गोष्टीच्या वाटणीबाबत दोन्ही देशांमध्ये नियम ठरवले गेले. यामध्ये भारताचे प्रतिनिधी एच. एम. पटेल होते आणि पाकिस्तानचे चौधरी मुहम्मद अली होते.

या दोघांना आपआपल्या देशाची बाजू घेऊन ही फाळणी सोपी करण्याचे अधिकार देण्यात आले होते. ठरलेल्या करारानुसार अनेक वाटण्या केल्या गेल्या पण जेव्हा वॉइसरॉय वापरत असलेल्या शाही बग्गीचा विषय आला तेव्हा दोन्ही देश ती बग्गी आपल्यालाच हवी यासाठी हटून बसले. असे काय महत्व होते त्या बग्गीला? काय आहे या बग्गीचा इतिहास की भारताचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींसाठी ही बग्गी खास राखीव आहे.

 

buggy im

 

ब्रिटिश भारतावर राज्य करत होते तेव्हा अतिशय मौल्यवान टिकवूड वापरुन भारताच्या त्या काळच्या वॉइसरॉय यांच्या प्रवासासाठी खास ही बग्गी बनवण्यात आली होती. अतिशय नाजुक कलाकुसरीने सजलेल्या या बग्गीच्या काही भागावर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. या सोन्याची किम्मत एवढी आहे की त्यामध्ये आजच्या काळातील एखादी महागडी सुपर कार विकत घेता येईल.

या बग्गिच्या दोन्ही बाजूला भारताची राष्ट्रीय चिन्हे कोरलेली आहेत. तर किस्सा असा आहे की जेव्हा या बग्गीच्या वाटणीचा प्रश्न आला तेव्हा दोन्ही देशांची इच्छा होती की ही शाही सवारी आपल्याकडे असावी. पण चर्चेअंती देखील काहीच तोडगा निघाला नाही.

तेव्हा प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड रेजिमेंटचे पहिले कमांडंट लेफ्टनंट कर्नल ठाकूर गोविंद सिंग ( जे प्रेसिडेंट बोडीगार्ड चे कमांडर होते आणि या बग्गीच्या रक्षण व देखभालीची जबाबदारी या रेजिमेंटकडे असते. ) आणि पाकिस्तान आर्मीचे साहबजादा याकूब खान यांच्यात टॉस करण्याचे ठरले आणि तसा टॉस करण्यात आला.

 

buggy im 1

 

यामध्ये भारताने नाणेफेक जिंकली आणि ही वॅगन भारताची झाली. बग्गीच्या वाटणीची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि अनेकांनी बग्गी कोणाला मिळेल या उत्सुकतेने टॉस चा निकाल पाहण्यास गर्दी केली. निकाल भारताच्या बाजूने लागताच एकच जल्लोष झाला आणि जयहिंद, भारत माता की जय असे नारे लगावले गेले. ही भारताच्या अस्मितेची जीत होती म्हणून राष्ट्रपतींची ही खास सवारी सुदधा भारताच्या अस्मितेचे प्रतीक ठरली.

स्वातंत्र्यानंतर देशाच्या राष्ट्रपतींनीही विशेष प्रसंगी या वॅगनचा वापर करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात भारताचे राष्ट्रपती या वॅगनमध्ये सर्व समारंभांना जात असत आणि ३३० एकरांवर पसरलेल्या राष्ट्रपती भवनातही ते फिरत असत. १९५० मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र डॉ. प्रसाद यांनी पहिल्यांदा या वॅगनचा वापर केला होता. तेव्हापासून त्याचा ट्रेंड सुरू झाला.

ही वॅगन ओढण्यासाठी खास विशिष्ट उंची असलेले घोडे निवडले जातात. त्यावेळी ६ ऑस्ट्रेलियन घोडे ते खेचत असत, पण आता त्यात फक्त औस्ट्रेलिया आणि भारत यांच्या मिश्र वंशाचे चार घोडे वापरले जातात. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर मात्र सुरक्षेच्या कारणावरून ही बग्गी वापरणे बंद झाले आणि त्याऐवजी राष्ट्रपती बुलेटप्रूफ गाडी वापरू लागले. त्यानंतर सुमारे ३० वर्षे या वॅगनचा वापर बंद होता. ही बग्गी राष्ट्रपती भवनात ठेवण्यात आली होती आणि त्याची काळजी घेण्यात येत होती.

२०१४  मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा एकदा वॅगनचा वापर केला. बीटिंग रिट्रीट कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते २५ जुलै २०१७ रोजी, या गाडीतून आले होते. एका आलिशान कारऐवजी, राम नाथ कोविंद यांनी देखील या ऐतिहासिक वॅगनमधून शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवन ते संसद असा प्रवास केला होता.

 

buggy im 9

भाजपचा विरोध पत्करून बाळासाहेब प्रतिभा पाटीलांच्या पाठीशी उभे राहिले होते

देशाच्या पहिल्या मुस्लिम राष्ट्रपतीची घोषणा जामा मशिदीतून केली होती!

प्रणव मुखर्जी यांच्या आधी २००२ ते २००७या काळात देशाचे ११ वे राष्ट्रपती असलेले डॉ. एपीजे अब्दुल कलाम देखील राष्ट्रपती भवनात फिरण्यासाठी अधूनमधून वॅगनचा वापर करत होते. मात्र २०१४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा एकदा वॅगनचा वापर सुरू केला. पुन्हा एकदा वॅगन वापरण्याची परंपरा सुरू झाली. बीटिंग रिट्रीट कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रणव मुखर्जी या वॅगनमध्ये आले होते. तेव्हापासून ही प्रक्रिया सातत्याने सुरू आहे.

राष्ट्रपती पदाच्या २०२२ च्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी मोठा विजय मिळवला आहे. सुमारे ६५ टक्के मतांसह त्या देशाच्या पुढील राष्ट्रपती बनल्या आहेत. हा विजय भारतासाठीही महत्त्वाचा आहे कारण द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.

२५ जुलै रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि यादरम्यान त्या रॉयल वॅगनमध्ये बसून शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या. तर मित्रांनो ही होती राष्ट्र्पतींच्या कमाल बग्गीची धमाल कथा!! तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?