' कंगवे स्वच्छ करण्याच्या या ३ युक्त्या तुमचे कष्ट हमखास वाचवतील

कंगवे स्वच्छ करण्याच्या या ३ युक्त्या तुमचे कष्ट हमखास वाचवतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दैनंदिन जीवनात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर आपल्याला उत्तम आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर स्वच्छता असणे खुप गरजेचे आहे. याच कारणामुळे अनेक लोक घराची तर नियमित साफसफाई करतात, परंतु त्याचवेळी अनेक लोक घरातील अन्य दैनंदिन वापरातील महत्त्वपूर्ण वस्तु साफ करायला विसरतात. त्यातील एक वस्तु म्हणजे कंगवा.

केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी आपण अनेक प्रकारची महागडी ब्युटी प्रोडक्ट्स वापरतो, पण अनेकदा आपण आपल्या कंगव्याकडे दुर्लक्ष करतो. अनेक वेळा याचा परिणाम आपल्या केसांवर होऊ लागतो आणि केसासंबंधी रोग व्हायला सुरुवात होते. त्यामुळे कंगवा हा स्वच्छ असणे खुप गरजेचे आहे. घाणेरडा कंगवा वापरल्याने केसांमध्ये घाण आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. तसेच कंगव्यातील घाण केसांपर्यंत पोहोचल्यास केसांमध्ये कोंडा आणि खाज येऊ शकते.

 

inmarathi
hindi.indiatvnews.com

त्यामुळे जर तुमचे ही कंगव्याच्या स्वच्छतेकडे लक्ष नसेल तर आता त्याकडे लक्ष देणे सुरू करा. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कंगवा सहज स्वच्छ करू शकाल :-

पहिला उपाय :-

यासाठी आपल्याला पुढील तीन सामग्री लागणार आहेत :-”
१) आवश्यकतेनुसार गरम पाणी.
२) दोन चमचे डिटर्जेंट पावडर
३) एक चमचा बेकिंग पावडर.

 

baking soda inmarathi

 

१) सर्वप्रथम एखाद्या भांड्यामध्ये गरम पाणी घ्या.
२) यामध्ये २ चमचे डिटर्जंट आणि १ चमचा बेकिंग सोडा घाला, आता याला मिसळून घ्या.
३) यानंतर या पाण्यात कंगवा टाका. आपण एकाच वेळी अनेक कंघी देखील धुवू शकता.
४) १० मिनिटांनंतर, ते टूथब्रश किंवा कपडे धुण्याच्या ब्रशने स्वच्छ करा.
५) तसे तर या पाण्यात टाकल्याबरोबरच कंगवे एकदम नवीन असल्यासारखे चमकू लागतील आणि यावर असलेला मळ ही लगेच निघून जाईल.
६) यानंतर कंगव्याला थंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

दूसरा उपाय :-

चिमट्याने स्वच्छ करा :-
केसांमध्ये वापरल्या जाणार्‍या चिमट्याच्या आणि पिनच्या मदतीने देखील तुम्ही तुमचे कंगवे स्वच्छ करू शकता. याद्वारे कंगव्याच्या दातांच्या आत साचलेली घाण काढून टाकता येते.

 

pin 11 im

 

तिसरा उपाय :-

एखाद्या भांड्यात शैम्पू किंवा साबणाचे द्रावण तयार करा आणि नंतर त्यात कंगवा बुडवा आणि त्यानंतर काही वेळाने याला टूथब्रशने स्वच्छ करा. गरम पाण्यामुळे कंगव्यातील घाण सहज साफ होईल.

 

toothbrush in bathroom inmarathi

डायबेटिस, बीपी, हृदयविकार : औषधांच्या गोळ्यांपेक्षा कितीतरी गुणकारी ५ घरगुती गोष्टी

किचनमध्ये वापरात असलेली हळद भेसळयुक्त नाही ना? या टेस्टनी लगेच करा खात्री

तर हे आहेत काही सोपे उपाय, ज्यांच्या मदतीने आपण आपला कंगवा सहज साफ करु शकतो. याचबरोबर आपण अजुन एक काळजी घ्यायला हवी. ते म्हणजे प्रत्येकाने स्वतःच कंगवा वेगळा ठेवावा. जेणेकरून कोणाच्या डोक्यात उवा किंवा इतर काही समस्या असतील तर ते इतरांपर्यंत पोहोचणार नाही. तसेच कंगव्याच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष द्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?