' पावसाळ्यात बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून या टिप्स नक्की वापरा – InMarathi

पावसाळ्यात बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून या टिप्स नक्की वापरा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावसाळा आला की प्रत्येकाच्या वेगवगळ्या प्रतिक्रिया असतात. कुणाला पाऊस आवडतो तर कुणाला आवडत नाही. ग्रामीण भागात असं म्हणतात, कपडा बघावा उन्हाळ्यात, भांडी बघावीत हिवाळ्यात आणि माणूस बघावा पावसाळ्यात.

म्हणजे धुतलेला कपडा उन्हाळ्यात लगेच सुकतो. हिवाळ्यात भांडीकुंडी स्वच्छ रहतात. तर माणूस पावसाळ्यात स्वच्छ राहतो. म्हणजे बघा उन्हाळ्यात असलेली घामाची चिकचिक नसते, हिवाळ्यात असलेले त्वचेचे फुटणे नसते. एकंदर हवामान छान असते त्यामुळे माणूस छान दिसतो असा त्याचा मतितार्थ.

पण पावसाळ्यात खूप जणांना न आवडणारी गोष्ट होते ती म्हणजे बटाट्याना मोड येतात. ते मोड आलेले बटाटे बघून पण कसंतरी होतं. ते मोड येऊ नयेत यासाठी काय करता येते? आज आपण तेच पाहणार आहोत.

 

Potato komb IM

 

बटाट्याची भाजी, बटाटेवडे पॅटीस, दाबेली या आणि अनेक पदार्थामध्ये अविभाज्य असलेला भाग म्हणजे बटाटा.हे पदार्थ बटाट्याशिवाय कल्पनेत येणं अशक्य आहे. अबालवृद्धांचा आवडता बटाटा. बटाटा हे कंदमूळ वर्गातील फळभाजी आहे. उपवास आणि इतर वेळी गृहिणीना आयत्यावेळी कोणती भाजी करू?

या प्रश्नाचा करारा जवाब असलेला बटाटा बहुतेक सर्व घरात मुबलक प्रमाणात आणला जातो, वापरला जातो. उन्हाळ्यात बटाट्याचे चिप्स करून, खिसून वळवून तो खिस उपवासाला टाळून खाल्ला जातो.

आठवड्याच्या बाजारात बटाटे न चुकता आणले जातात. कधी ते जास्त झाले म्हणून पालेभाज्यांसारखे खराब झाले म्हणून फेकून द्या असं करावं लागत नाही. ते टिकतात. लवकर कुजत नाहीत. पण एका ठराविक काळाने त्यावर मोड येतात. आणि मोड आले की मात्र ते आवडत नाहीत. कारण एकतर ते चवदार नसतात आणि दुसरे म्हणजे ते निरोगी किंवा पौष्टिक पण नसतात.

 

potato-plantation-inmarathi

 

बटाट्यातील एन्झाइम्स त्यात असलेल्या स्टार्चचे साखरेत रुपांतर करतात. आणि ही तयार झालेली साखर बटाट्याच्या डोळ्यातून बाहेत पडायला सुरु होते. आणि तेच येतात मोड. एक गमतीची गोष्ट म्हणजे असे मोड आलेले बटाटे जर तुम्ही जमिनीत पुरले तर त्यातून बटाट्याची लावण होते, आणि नंतर त्याच मुळाला बटाटे येऊ लागतात. पण हे सारे डोळ्याआड होते म्हणून आपल्याला फारसे काही जाणवत नाही. परंतु बटाट्यांना आलेले मोड मात्र आवडत नाहीत.

बटाट्यांना आलेले हे मोड खाण्याच्या योग्यतेचे नसतात. कारण त्यामध्ये ग्लायकोआल्कलॉईड्स हा घटक असतो. आणि त्याचे अतिरिक्त प्रमाणात केलेले सेवन हे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. यावर उपाय काय? बटाट्यांना मोड येऊ न देणे..

काय करता येईल ज्यामुळे बटाट्यांना लवकर मोड येणार नाहीत?

१) अंधाऱ्या जागी साठवणूक करा –

तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल, बटाटे विकणारे व्यापारी तर कितीतरी किलो बटाटे विकत घेतात. मग त्यांना का मोड येत नाहीत? तर त्याचं कारण त्यांनी केलेली साठवणूक.

जेवढे विकायला काढलेले बटाटे असतात तेवढेच बाहेर ठेवलेले असतात. पण जे जास्तीचे बटाटे असतात ते मात्र त्यानी गोणीत किंवा पोत्यात भरून ठेवलेले असतात.

जितके बटाटे सूर्यप्रकाशापासून दूर राहतील तितके ते चांगले राहतात. त्यामुळे तुम्ही बटाटे आणल्यानंतर ते खाकी कागदाने झाकून ठेवा किंवा उजेडापासून बाजूला ठेवा. त्यांना मोड येणार नाहीत.

२) एखाद्या हिरव्या वनस्पतीची फांदी ठेवा –

 

many plant InMarathi

 

बटाटे ठेवताना त्यामध्ये एखादी औषधी वनस्पती जसे दुर्वा, दर्भ, सदाफुली, माका किंवा मेंदीची पाने यांची फांदी ठेवा. पण ती ठेवताना एखादी मलमलची, सुती पिशवी घ्या. त्यात ती फांदी टाका. पिशवीचे तोंड बंद करा आणि बटाट्यामध्ये ती पिशवी टाकून ठेवा. मोड येण्याची प्रक्रिया याने थांबते.

३) फक्त बटाटेच ठेवा –

बटाटे साठवत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, त्यामध्ये कोणतेही फळ ठेवू नका. कांदा, टोमॅटो, सफरचंद, संत्री हे अजिबात त्यात ठेवू नका. कारण फळात असलेली आर्द्रता बटाट्यांना लवकर मोड आणते. सफरचंद जास्त प्रमाणात इथिलीन नावाचा वायू तयार करते. त्यामुळे बटाटे मोड येऊन खराब होऊ शकतात.

४) रेफ्रिजरेटरमध्ये बटाटे ठेवू नका –

 

potato in fridge IM

 

वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टीमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे बटाटे आर्द्रता धरु नयेत याची घेतलेली काळजी. खुपदा काहीजणी बटाटे करकरीत ताजे राहवेत म्हणून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. पण त्याने होते काय तर तिथे असलेली आर्द्रता बटाट्याच्या भोवती साठून त्यावर पण पाण्याचे थेंब येतात आणि त्यामुळे मोड येण्याची शक्यता जास्त वाढते.

याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, बटाटे बेसिनजवळ, फ्रीजजवळ ठेवू नका. फ्रीज चालू असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला हवेत गरमपणा आलेला असतो. त्या उष्णतेने बटाटे खराब होऊन त्यांना लवकर मोड येतात.

आता पावसाळा सुरु झाला आहेच. तर या टिप्स लक्षात ठेवून बटाटे साठवा आणि मोड येणार नाहीत ना? या प्रश्नाला टाटा करा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?