' बिहारच्या गावातून दिल्लीत पद्मश्री : व्हाया सायकल! किसान चाचीची अचाट प्रेरणादाई कथा!

बिहारच्या गावातून दिल्लीत पद्मश्री : व्हाया सायकल! किसान चाचीची अचाट प्रेरणादाई कथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है… मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है… आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती…

मित्रांनो ही कविता तुम्ही नक्कीच ऐकली असेल, शाळेत अभ्यासली असेल, पण जर ही कविता प्रत्यक्षात कोणी आपल्या आयुष्यात अवलंबून त्या कवितेतील शब्द सिद्ध करून दाखवले असतील तर? तर तुम्हाला नक्कीच त्याचे कौतुक वाटेल.

“अगर बुलंद इरादा और हौसला हो, तो हर इंसान अपने सपने पूरे कर सकता है” हे शब्दश: खरे करून दाखवणार्‍या लोकांची आपल्या आसपास कमी नाही. जर तुम्ही भूतकाळाची पाने उलटलीत तर तुम्हाला अशा अनेक लोकांचा उल्लेख सापडेल ज्यांनी कमी संसाधने असूनही आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

बिहारच्या दशरथ मांझी ज्याला लोक वेडा समजू लागले होते, त्यांनी डोंगर कापून मार्ग काढला. उत्तराखंडचा जगतसिंग जंगली, ज्याने ओसाड डोंगराच्या जमिनीवर घनदाट जंगल वाढवले. अशाच आहेत त्याच बिहारमधल्या किसान चाची!

बिहारच्या या किसान चाचीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. लाखो महिलांचे त्या आदर्श बनल्या आहेत.

 

kisan chachi im

 

चला तर मग आम्ही आज तुम्हाला या किसान चाचींची गोष्ट सांगतो. ही कथा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची प्रेरणा देईल. याशिवाय तुमच्यात एक आत्मविश्वासही भरून येईल.

किसान चाची यांचे खरे नाव राजकुमारी देवी आहे. पण आज संपूर्ण देश त्यांना किसान चाची या नावाने ओळखतो. किसान चाची मूळ मुझफ्फरपूरच्या सरैया ब्लॉकमधील आनंदपूर च्या आहेत.

किसान चाचीने महिलांमध्ये स्वावलंबनाचा एवढा प्रकाश जागवला की आज देशभरात तिची चर्चा आहे. मुझफ्फरपूर, बिहार येथील असलेल्या राजकुमारी देवी यांनी आपल्या उच्च आत्म्याच्या बळावर केवळ सामाजिक निर्बंधांचा प्रतिकार केला नाही तर तिने आपल्या कठोर परिश्रमाने मोठ्या संख्येने महिलांचे भाग्य बदलण्याचे काम केले.

मुझफ्फरपूरच्या सरैया ब्लॉकमधून प्रवास सुरू करणाऱ्या किसन चाची या नावाने प्रसिद्ध असलेल्या राजकुमारी देवी यांना त्यांच्या कामांसाठी सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले.

या प्रवासात ‘किसन चाची’ला अनेक सामाजिक आणि कौटुंबिक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले, जिथे दूरच्या नातेवाईकांनीही तिला काही काळासाठी एकटे सोडले होते. पण त्यांनी हार मानली नाही. सामाजिक बंधनाला विरोध करत त्यांनी आपल्या जमिनीवर शेती करण्याचा निर्णय घेतला आणि समाजातील, कुटुंबातील सर्वांच्या विरोधाला न जुमानता त्या पुढे जात राहिल्या.

कच्च्या पायवाटेवर मैल मैल सायकल चालवून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणाऱ्या या वास्तव जीवनातील राजकन्येने आजपर्यंत पुरुषांचे काम समजल्या जाणाऱ्या शेतीत नवीन क्रांती सुरू केली आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि मातीच्या गुणवत्तेची चांगली जाण असलेल्या किसान चाची आज यशस्वी शेतीचे दुसरे नाव आणि महिला सक्षमीकरणाचे उदाहरण बनले आहे.

 

kisan chachi 1 im

 

आयुष्याच्या संध्याकाळी शांत जीवन जगण्याच्या काळात चेहऱ्यावर वयाच्या खुणा, पण हातात धाडसाची काठी आणि मनात काहीतरी नवे करण्याचा भाव घेवून वाटचाल करणार्‍या चाची, आज जेव्हा मागे वळून पाहतात, तेव्हा त्यांना हजारो यशस्वी शेतकरी आणि स्वावलंबी महिलांचे हसरे चेहरे दिसतात. त्यांनी शेकडो महिलांना केवळ शेतीतच गुंतवून ठेवले नाही तर त्यांना शेती फायदेशीर कशी करता येईल याची माहिती दिली.

नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आणि ते इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करण्यासाठी त्या जिथे जावे लागेल तिथे जाण्यास तयार असतात. त्यांची समाजासाठीची कामगिरी पाहता बिहार सरकारने २००६ मध्ये त्यांना ‘किसान श्री’ पुरस्काराने सन्मानित केले आणि एक लाख रुपये दिले. त्या सरैया कृषी विज्ञान केंद्र आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या सल्लागार समितीच्या सदस्य आहेत.

किसन चाची यांना आतापर्यंत डझनभर पुरस्कार मिळाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी विभागाने त्यांच्यावर एक माहितीपटही बनवला आहे. त्यानंतरच त्यांना ‘किसन चाची’ हे नाव पडले.

त्यांना व्हायब्रंट गुजरात-२०१३ साठी आमंत्रित करण्यात आले होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने त्यांचे अन्न प्रक्रिया मॉडेल सरकारी वेबसाइटवर टाकण्यात आले होते. २०१५ आणि २०१६ मध्ये अमिताभ बच्चन यांनीही त्यांना केबीसीमध्ये बोलावले होते.

 

kbc im

 

शिक्षक वडिलांच्या घरी किसान चाचीचा जन्म झाला. त्यावेळी लहान वयात लग्न करण्याची प्रथा होती, त्यामुळे त्यांचे ही लग्न लहान वयात झाले होते, मॅट्रिक पास होताच १९७४ मध्ये त्यांचा विवाह शेतकरी कुटुंबातील अवधेशकुमार चौधरी यांच्याशी झाला. लग्नानंतर त्या आपल्या कुटुंबासोबत आनंदपूर-सरैया गावात राहू लागली.

राजकुमारीला शिक्षिका व्हायचे होते, १९८० मध्ये तिने त्यासाठी प्रशिक्षणही घेतले, परंतु कुटुंब आणि समाजाच्या विरोधामुळे ती नोकरी करू शकली नाही.

लग्नाला नऊ वर्षे मुले न झाल्याने आणि पतीच्या बेरोजगारीमुळे घराच्या उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणारी राजकुमारी कुटुंब आणि समाजापासून बहिष्कृत झाली. त्यांच्या माहेरच्या बरोबर विरूद्ध परिस्थिती सासरी होती.

१९८३ मध्ये मुलीचा जन्म झाला तेव्हाही टोमणे मारले जात होते. १९९० मध्ये चौधरी यांच्या चार भावांमध्ये वाटणी झाली आणि त्यांना अडीच बिघे ( गुंठे ) जमीन मिळाली. कुटुंबात तंबाखू लागवडीची परंपरा होती, ती मोडून काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला.

सन १९९० मध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करताना शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून शेतीत सुधारणा केली. त्यानंतर लोणची बनवण्यास सुरुवात केली. साल २००० पासून ही लोणची बनायला सुरुवात केली, जी आज ‘किसान चाची की आचार’ या नावाने संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत.

 

kisan chachi 2 im

 

स्वत:ला सिद्ध केल्यानंतर त्यांनी इतर महिलांना मदतीचा हात पुढे केला आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास तयार केले. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी जवळच्या महिलांशी हातमिळवणी करून आंबा, बेल, लिंबू, आवळा आदी लोणची बाजारात विकायला सुरुवात केली. यानंतर हळूहळू गटातील महिलांची संख्या वाढत गेली आणि त्यांचे क्षेत्र वाढत गेले.

आतापर्यंत त्यांनी ४० बचत गट स्थापन केले आहेत.त्यांच्या या क्षेत्रातील पुढाकार आणि योगदानाबद्दल त्यांना सामाजिक संस्था, राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेकदा सन्मानित देखील करण्यात आले आहे. २०१९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता.

सुरुवातीच्या काळात त्या सायकलवरून गावाबाहेर जायच्या तेव्हा लोक आपापसात कुजबुजायचे आणि त्यांना वेडी म्हणायचे. लग्नानंतर अनेक वर्षे मुले न झाल्यामुळे त्यांना आधीच तिरस्काराचा सामना करावा लागत होता, त्यावर शेती करू लागल्यानंतर कुटुंब आणि समाजाने त्यांना बहिष्कृत केले, परंतु त्यांची पावले थांबली नाहीत.

शेतीसोबतच त्यांनी लहान शेती उत्पादने बनवण्यास सुरुवात केली. सायकलीवरुन प्रवास करत जत्रा-बाजारात आणि घरोघरी विकायला सुरुवात केली. उपाशी असताना न विचारणारा समाज दोन रोट्या कमावण्याच्या या धडपडीला देखील नावे ठेवू लागला.

आज परिस्थिती खूप बदलली आहे. गावाशिवाय जिल्ह्यातील आणि बाहेरूनही लोक त्यांना शेतीच्या युक्त्या शिकण्यासाठी बोलावतात. २००३ च्या किसान मेळ्यात त्यांच्या उत्पादनाला पुरस्कार मिळाला होता.

किसान चाचीकडे हॉक, लिची, मनुका, लिंबू, आंबा, लसूण, कोबी आणि गाजर करी, हॉक वर्मीसेली, बटाटा चिप्स, गुलाब सरबत, ऑरेंज सिरप, पपई जाम आणि गुजबेरी जाम अशी अनेक उत्पादने आहेत.

किसान चाचीने देशातील अनेक राज्यांमध्ये किसान महोत्सवांमध्ये त्यांचे स्टॉल लावले. त्यांच्या यशाची कहाणी आता संपूर्ण देशाला माहीत आहे आणि त्यामुळेच आज बिहारच्या सीएमपासून ते देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींपर्यंत सारेजण किसान चाची चे कौतुक करतात.

 

kisan chachi 3 im

 

किसान चाचीने वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून बिहारसह देशातील मुली आणि महिलांना एक मार्ग दिला आहे, जो तुम्हाला सर्व अडचणीतून बाहेर काढून यशाच्या मार्गावर नेऊ शकतो. महिलाना स्वयंपूर्ण बनवणार्‍या किसान चाची यांच्या कार्यासाठी एक सलाम तो बनता है!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?