' झोपताना या गोष्टी तुमच्या उशीपाशी असतील तर वेळीच सावध व्हा!

झोपताना या गोष्टी तुमच्या उशीपाशी असतील तर वेळीच सावध व्हा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संपूर्ण दिवस एनर्जेटीक जावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी महत्वाचं काय असेल, तर रात्रीची शांत आणि गाढ झोप. हो, अगदी बरोबर वाचलंत. रात्रीची झोप छान झाली, की दिवसभर अगदी ताजंतवान वाटतं आणि काम करायला देखील उत्साह वाटतो.

परंतु नेमक्या याच गोष्टीकडे बहुतांश मंडळी दुर्लक्ष करतात. झोपताना आपला बेड कसा असावा? तिथले वातावरण कसे असावे? याबाबतीत फारसा विचार केला जात नाही. खूप जणांना रात्री उशिरापर्यंत जागून झोपायची सवय असते.

त्यातही दिवसभर हातात असलेला मोबाईल अगदी उशाशी ठेवून झोपतात. वरवर ही साधी गोष्ट भासत असली तरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ती किती घातक आहे, याचा जरादेखील विचार केला जात नाही. तेव्हा झोपताना उशाशी काय ठेवू नये, यावर थोडक्यात टाकलेला प्रकाश –

प्राणाहून प्रिय असलेला तुमचा मोबाईल उशीपाशी ठेवून झोपू नये – आपल्यापैकी बहुतांश मंडळींना मोबाईल उशीजवळ ठेवून झोपयची सवय असते, पण ही सवय तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकते.

 

mobile 2 inmarathi

 

मोबाईल हा सतत मोबाईल टॉवरच्या संपर्कात असतो. आणि त्यातून सतत विशिष्ट स्वरूपाच्या लहरी वाहत असतात. ज्या तुमच्या मेंदूवर नकळतपणे परिणाम करीत असतात.

त्यातही जर मोबाईल तुम्ही तुमच्या बेडजवळच चार्जिंगला लावून झोपत असाल, तर ते अजूनही वाईट आहे. कारण या काळात मोबाईल मधून अत्यंत तीव्र स्वरूपाच्या लहरी वाहत असतात. आणि नेमक्या याच गोष्टी तुमच्या झोपेत बाधा आणण्यास कारणीभूत ठरतात.

म्हणून झोपताना मोबाईल तुमच्या उशीपासून कमीतकमी चार ते पाच फुट लांब ठेवावा. आणि चार्जिंग करावयाचे असल्यास तो स्वीच ऑफ मोड वर ठेवून चार्जिंग करावा.

इलेक्ट्रोनिक वस्तूपासून मुक्त असा बेड –

झोपताना सर्व इलेक्ट्रिकल वस्तू, जसे विविध प्रकारचे चार्जर्स, लॅपटॉप, वायफाय राउटर या सर्व गोष्टी बंद करून ठेवाव्यात. दुसरे असे, की या सर्व गोष्टी तुमच्या बेडपासून लांब ठेवाव्यात.

 

charger with phone inmarathi

 

सतत या गोष्टींच्या सान्निध्यात राहून तुमचाही मेंदू शिणत असतो. त्यामुळे त्याला देखील आराम व शांतता लाभणे तितकेच गरजेचे असते. कारण या सर्वांमधून विशिष्ट प्रकारच्या विद्युत लहरी वाहत असतात.

सतत या लहरींच्या सान्निध्यात राहिल्याने कालांतराने विस्मरण, एखादी गोष्ट चटकन न आठवणे अशा व्याधी जडायला सुरुवात होते. ज्यापुढे जाऊन नक्कीच गंभीर रूप धारण करू शकतात.

गडद रंगाचे पेंटींग्ज –

बऱ्याचदा खोलीला एक प्रशस्त फिल यावा म्हणून बेडवर मोठ्या स्वरूपाचे पेंटींग्ज लावलेले असते. आणि ते देखील गडद रंगाचे असते. या गडद रंगामुळे शांत झोप लागण्या ऐवजी मनांमध्ये नकळतपणे दाबून ठेवलेल्या गडद आठवणी उफाळून वर येतात.

ही क्रिया इतक्या स्वाभाविकपणे घडते, की ते आपल्याला देखील कळत नाही आणि मग मनांत नको नको त्या विचारांची मालिका सुरु होते नि झोपेची पार वाट लागून जाते. त्यामुळेच बेडवरील भिंतीवर कोणत्याही प्रकारचे चित्र लावू नये.अथवा त्यावरील भिंतीचा रंग देखील सौम्य स्वरूपाचा असावा.

बेडसमोर आरसा, चप्पला, पर्स सारख्या गोष्टी असू नये –

 

late night sleeping girl InMarathi

 

झोपताना पर्स ,चपला या गोष्टी जवळ ठेवू नये. तसेच बेडच्या समोर कधीही आरसा लावू नये. कारण यामुळे नकारात्मक उर्जा त्या खोलीत वाहू लागते. परिणामी, भीतीदायक स्वप्ने पडू शकतात. जी झोप न लागण्यासाठी पुरेशी ठरतात.

त्याचबरोबर पर्स जवळ बाळगणे म्हणजे आपण नकळतपणे पैशांचा विचार करू लागतो. सतत पैशांचा विचार केल्याने मनावर एक प्रकारचा ताण तर निर्माण होतो. मग अमुक एक गोष्ट आपल्याकडून होणार नाही असे नकरात्मक विचार येऊ लागतात.

स्वत:च्या सोयीसाठी जरी आपण घरात चप्पल वापरीत असलो तरीही त्या बेडच्या खाली नसाव्यात. थोड्याश्या दूरवरच असाव्यात. कारण वास्तूशास्त्रानुसार चप्पलामधून एकप्रकारची नकरात्मक उर्जा वहात असते. जी आपल्या झोपेत बाधा आणण्यास पुरेशी ठरते.

थोडक्यात काय तर झोपताना बेड आणि त्या सभोवतालचे वातावरण जितके अधिक सुटसुटीत व सौम्य रंगाच्या प्रकाश छायेतील असेल, तितकी शांत झोप लागते.

उत्तम आरोग्य राखायचे असेल, तर इतर आवश्यक गोष्टीबरोबर शांत झोप लागणे हे ही अलीकडच्या काळात तितकेच गरजेचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?