' “ओह माय गॉड” प्रत्यक्षात – हवालदिल शेतकऱ्याने थेट देवा विरोधात केली आहे केस… – InMarathi

“ओह माय गॉड” प्रत्यक्षात – हवालदिल शेतकऱ्याने थेट देवा विरोधात केली आहे केस…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अभिनेता अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा ‘ओह माय गॉड’ जवळपास प्रत्येकाचा आवडता सिनेमा होता. २०१२ च्या या सिनेमात परेश रावल नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये त्यांचं दुकान गमावतात. त्यामुळे ते देवावर गुन्हा दाखल करतात. तसेच संपूर्ण चित्रपटात ते आपलं  नुकसान भरून काढण्यासाठी देव आणि पुजाऱ्याशी लढत असतात.

परंतु ही तर झाली चित्रपटामधील गोष्ट, पण जर एखाद्या व्यक्तीने खऱ्या आयुष्यात असं केलं तर त्याला कितीतरी अडचणींचा सामना करावा लागेल. असंच एक प्रकरण सध्या वायरल होतआहे. पाऊस न झाल्यामुळे त्रासलेल्या एका व्यक्तीने थेट इंद्रदेवा वर गुन्हा दाखल केला आहे.

ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव केवळ मानवावरच नाही तर मान्सूनवरही होतांना दिसत आहे. या कारणामुळे काही राज्यात इतका पाऊस पडत आहे की पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर काही राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे.

 

omg inmarathi

 

उत्तराखंड, आसाम, महाराष्ट्र यांसारखी राज्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे त्रस्त आहेत. तर उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये सामान्यपेक्षा ही कमी पाऊस होत असल्याने लोक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. उत्तरप्रदेश मधील शेतकरी यामुळे तर खुप त्रस्त आहेत.

यूपीमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे जवळपास प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे, मात्र गोंडाच्या करनैलगंजचे सुमित कुमार यादव इतके नाराज झाले की त्यांनी थेट पावसाचे देव इंद्रदेव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात विशेष म्हणजे तहसीलदाराने सुद्धा ही तक्रार मंजूर करून पुढील कारवाईसाठी पाठवून दिली होती. यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देणाऱ्या तहसीलदारांच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.

ही घटना गोंडा जिल्ह्यातील कर्नेलगंज तहसीलमधील आहे, जेथे शनिवारी मध्यरात्री संपूर्ण समाधान दिवसाचे आयोजन करण्यात आलं होत. येथील कटरा बाजार मधील कौडिया पोलीस स्टेशन परिसरातील झाला येथील रहिवासी सुमित यादव यांनी हे पत्र लिहीले होते. त्यात त्यांनी लिहलं होत की, ‘गेल्या कित्येक महिने पाऊस पडलेला नाहीये.

यामुळे लोक प्रचंड तणावात आहे. जनावरे व शेतीवर याचा वाईट परिणाम होत आहे. तसेच महिला आणि लहान मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे . त्यामुळे आपण पावसाच्या देवावर आवश्यक ती कार्यवाही करावी ही विनंती.

 

sumit im

 

यानंतर हे पत्र कुठलीही शाहनिशा न करता पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले. मात्र यानंतर हे तक्रार पत्र व्हायरल झाल्यामुळे हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. हे पत्र न पाहताच पुढे कसे पाठवण्यात आले, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

परंतु देवांवर केस केल्या जाऊ शकते का?

सुमित कुमार यांनी देवावर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला, पण देवावर खरच गुन्हा दाखल होऊ शकतो का? याबाबत सुप्रीम कोर्टातील वकिलांचे म्हणणं आहे की, कायद्यानुसार अशा तक्रारी करता येतात, मात्र त्यासाठी सिव्हिल प्रोसिजर संहितेशी संबंधित नियमांचे पालन करावं लागतं, तरच गुन्हा दाखल होतो अन्यथा तो रद्द ठरतो.

 

court inmarathi

शेतीत “असाही” प्रयोग?! गुजरातचा हा शेतकरी शेतीची भाषाच बदलून भारत घडवतोय!

१२ लाखांची नोकरी सोडून त्याने “गाय” पाळली आहे, पण का?

वकिलांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकरणांमध्ये मंदिर किंवा ट्रस्टला पक्षकार बनवावे लागते. जर आपण दूसरे पक्षकार बनवलं नाही तर केस टिकत नाही. अनेकवेळा दिसून आलं की प्रसिद्धी मिळवण्यासाठी अश्या गोष्टी केली जातात. मात्र, असे करणे चुकीचे आहे. कारण अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया जातो. अशी प्रकरणे न्यायालयात आणणाऱ्यांविरुद्ध न्यायालय दंडही करू शकते. यासोबतच काही दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षादेखील होऊ शकते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?