' आधुनिक सावित्री - ज्यांनी पतीच्या मृत्यूपश्चात अब्जावधींचा बिझनेस ३ वर्षांत दुप्पट केलाय!

आधुनिक सावित्री – ज्यांनी पतीच्या मृत्यूपश्चात अब्जावधींचा बिझनेस ३ वर्षांत दुप्पट केलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पतीच्या निधनांतर वयाच्या पन्नाशीत सावित्री जिंदाल यांनी अवाढव्य अशा जिंदाल समुहाची जबाबदारी स्विकारली आणि त्यानंतर सातत्यानं यशाचा आलेख चढता राखला. याचं फळ म्हणजे यंदाच्या फ़ोर्ब्जच्या सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत सावित्री जिंदाल या नावाचा समावेश झालेला आहे.

सावित्री जिंदाल हे नाव दोन चार वर्षांपूर्वी कोणाला फारसं माहित असण्याचं कारण नव्हतं. मात्र आज हेच नाव जगभरातल्या माध्यमांनी दखल घेण्यासारखं बनलं आहे.

एकत्र कुटुंबातील, घर संसार सांभाळणारी एक स्त्री पतीच्या निधनानंतर त्याचा अवाढव्य व्यवसाय हाती घेते काय आणि अवघ्या तीन वर्षात उलाढाल दुप्पट करते काय.

तिच्या या कर्तुत्वामुळे जगात प्रसिध्द अशा  फोर्ब्ज मासिकालाही तिची दखल घ्यावी लागली. यंदाच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गर्वाने, अभिमानाने जे भारतीय नाव मिरवलं जात आहे ते आहे, सावित्री जिंदाल.

 

savitri jindal IM

 

त्यांचं कर्तुत्व केवळ इतकंच नाही की पतीच्या माघारी त्यांनी त्यांचा व्यवसाय शिखरावर नेला, त्यांच्या कर्तुत्वाला सोन्याची झालर यासाठी आहे की अशा प्रकारे अल्पावधीत व्यवसायात आर्थिक शिखर गाठणार्‍या सावित्री जिंदाल या शाळेची पायरिही चढलेल्या नाहीत.

जगप्रसिध्द बिझनेस स्कूलमधून शिकून आलेल्या भल्या भल्यांना जे जमत नाही ते सावित्री यांनी करुन दाखविलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या या कामगिरीला, यशाला मानाचा मुजरा आहे.

फोर्ब्जच्या यंदाच्या म्हणजेच २०२२ च्या अब्जाधिशांच्या यादीत एक भारतीय नाव दिमाखात झळकलं आणि सर्वांच्या तोंडी एकच नाव झालं, श्रीमती सावित्री जिंदाल. फ़ोर्ब्जच्या यादीनुसार त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत.

त्यांची आजच्या घडीला एकूण संपत्ती, १७.७ अब्ज डॉलर्स इतकी आहे. नवी दिल्ली स्थित त्यांची कंपनी पोलाद उत्पादक, जेएसडब्ल्यू स्टील, तसेच खाणकाम, वीज निर्मिती, औद्योगिक वायू आणि बंदर सुविधा अशा विविध व्यवसाय क्षेत्रात भागिदार म्हणून कार्यरत आहे.

 

forbes IM

 

सबंध जगाला करोना नावाच्या महामारीनं विळख घालून कंबरडं मोडलेलं असताना याच काळात जिंदाल समुहाची देखिल खाली आलेली आर्थिक गाडी सावित्रीनी कौशल्यानं पुन्हा केवळ पटरीवर आणली असं नव्हे तर त्यात तब्बल १२० करोडनी वृध्दी केली केलेली आहे.

त्यांच्या या कर्तुत्वामुळेच आज जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश झालेला आहे. अब्जाधिशांच्या यादीत जिंदाल समुहाचं नाव ९१ व्या स्थानावर आहे.

त्यांच्या वयातील इतर महिला या वयात नातवंडं, सूना यांच्यात सेवानिवृत्तीचं आयुष्य जगत असताना आज सत्तरीत असणार्‍या सावित्री मात्र तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात प्रचंड व्याप असणारा व्यवसाय कुशलतेने सांभाळत आहेत.

२० मार्च १९५० रोजी आसामच्या तिनसुकिया शहरात त्यांचा जन्म झाला आणि इथेच बालपण व्यतीत झालं. त्या काळात एकूणच मुलींच्या शिक्षणापेक्षाही लहान वयातच लग्न करून त्यांना संसाराला लावण्याकडे कल होता.

फारसं शिक्षण न घेतलेल्या सावित्रींना १९७० च्या दशकात व्यावसायिक ओम जिंदाल यांचं स्थळ आलं आणि नकार देण्यासारखं काहीच नसल्यानं हे लग्न पार पडून सावित्री इतर महिलांप्रमाणेच संसारात रमल्या. नऊ मुलांची आई असणार्‍या सावित्रींचा दिनक्रम मुलं, पती आणि सासरघरची जबाबदारीत याच्याशीच बांधला गेला होता.

जिंदाल कुटुंबातील स्त्रीया प्रामुख्यानं घरच सांभाळत असत. ओपी जिंदाल यांनी स्टिल ग्रुपची स्थापना केली होती आणि त्याचा व्याप दिवसेंदिवस वाढतच चालला होता. ओपी जिंदाल हरियाणा सरकारमधे मंत्री होते आणि हिस्सार मतदारसंघातून हरियाणा विधानसभेचे सदस्य होते. त्यामुळे त्यांचं सामाजिक जीवन धावपळीचं आणि व्यस्त होतं.

 

o p jindal IM

२००५ साली हेलिकॉप्टरच्या दुर्दैवी अपघातात ओपी जिंदाल यांचा आकस्मात मृतू झाला आणि सावित्रिंचं आयुष्य बदलू गेलं. खांच्यावर कुटुंब आणि व्यवसाय अशी दुहेरी जबाबदारी आली. संकटानं खचून न जाता सावित्रींनी या दोन्ही जबाबदार्‍या लिलया पेलल्या.

जिंदाल समुहाची जबाबदारी त्यांच्यावर आली तेंव्हा त्या ५५ वर्षाच्या प्रौढा होत्या. ज्या वयात साधारणपणे निवृत्तिचे वेध लागतात त्या वयात सावित्रींनी जगण्याची दुसरी आणि नविन इनिंग चालू केली होती. मुलं हाताशी आली तशी जिंदाल समुहाची चार विभागात वाटणी होऊन मुलं स्वतंत्रपणे ही जबाबदारी सांभाळू लागली.

पतीच्या पावलावर पाऊल ठेवत सावित्रींनी केवळ त्यांचा व्यवसायच नव्हे तर राजकीय कार्यही पुढे चालू ठेवलं. २००५ आणि २००९ अशा दोन वेळा त्यांनी हिसार मतदारसंघातून निवडणूक जिंकली.

भूपिंदर सिंग हुड्डा सरकारमधे त्या दोनवेळा मंत्रीही झाल्या. एक दीड दशकापूर्वींपर्यंत केवळ घरसंसार सांभाळणार्‍या सावित्रींनी व्यावसायिक यशाचा आलेख सतत चढता ठेवला.

 

sumitra jindal IM

 

गेल्या दोन वर्षांत तर त्यांच्या एकूण संपत्तीत तिपटीने वाढ झालेली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत किरण मुझ्मदार आणि कृष्णा गोदरेज यांच्यानंतर सावित्रींचा क्रमांक आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?