' मिठी मारण्याचे ७००० रुपये! असाही 'मुन्नाभाई' अन् असाही एक बिझनेस!

मिठी मारण्याचे ७००० रुपये! असाही ‘मुन्नाभाई’ अन् असाही एक बिझनेस!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो रस, रंग, गंध यांचं मानवी जीवनात जितकं महत्व आहे तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्त स्पर्शाचं आहे. हजार शब्दांनी जो परिणाम साधला जाईल तोच परिणाम एका अव्यक्त स्पर्शाने साधला जातो.

एखाद्याच्या मिठीत जाण्याने किंवा एखाद्याला मिठीत घेण्याने साधला जातो. आता बघा ना रडणार्‍या बाळाला आईने मिठीत घेतलं, की ते शांत होतं किंवा हॉस्पिटल लॉबीमध्ये ऑपरेशनसाठी जाणार्‍या आई किंवा बाबांचा हात हातात घेऊन आपण जेव्हा हलके थोपटतो तेव्हा त्या परिस्थितीत त्यांच्या डोळ्यात आपल्याला समाधान दिसतं.

हीच तर स्पर्शाची जादू आहे मित्रांनो. जेव्हा केव्हा आपण तणावात असतो, एकटेपणाची फीलिंग आपल्याला उदास करते नाहीतर आपण कुणालातरी ‘मिस’ करतो तेव्हा एक मायेची मिठी आपल्याला ऊब देऊन जाते.

 

hug featured IM

 

ही अशी जादूची झप्पी देण्याची कुणी जर चक्क व्यवसाय म्हणून निवड केली तर? अभिनेता संजय सूरी याचा असाच एक लघुचित्रपट आहे ‘कॉल हिम एडी’ ज्यामध्ये तो व्यावसायीक ‘कडलर’ दाखवला आहे, ज्याचा आपल्या क्लायन्टस ना मिठीत घेवून मायेची ऊब देण्याचा व्यवसाय असतो.

चित्रपटात संजय सूरी सांगतो की तणावात असलेल्या एखाद्याला मिठीत घेतले तर आपल्या शरीरातील ओक्सिटोजीन्स किंवा लव्ह हार्मोन्स कार्यरत होतात आणि आपले मन, शरीर रिल्याक्स होत जातात. हे काही कोणते रॉकेट सायन्स नाही तर आपल्या शरीराची आणि मनाची गरज असते.

अशाच ‘जादूच्या झप्पी’चा उल्लेख संजय दत्त याच्या ‘मुन्नाभाई एम बी बी एस’ या चित्रपटात आहे, ज्यातील मुन्ना सर्वांना जादूची झप्पी देत असतो. तर मित्रांनो हे सगळे सांगण्यामागे एक कारण आहे, ट्रेव्हर हुटोन हा ३० वर्षीय माणूस जो पेशाने यशस्वी ‘कडलर’ आहे. काय आहे ना वेगळेच काहीतरी!

ट्रेव्हर हुटोन जरी मुळचा कॅनडाचा असला, तरी आता टो ब्रिस्टल, इंग्लंड मध्ये स्थायीक झाला असून टो ‘कडलिंग’ चा व्यवसाय करतो. एखाद्याला मिठी मारण्यासाठी किंवा मिठीत घेवून थोपटण्यासाठी टो तासाला ७००० रुपये चार्जेस म्हणून आकारतो.

 

hug im

 

आपल्या ‘एम्ब्रेस कनेक्शन’ या संस्थेच्या माध्यमातून तो लोकांना ‘कडल थेरपी’ देतो. त्याच्याकडे या थेरपीचा अनुभव घेण्यासाठी येणार्‍यांची मोठी रांग असते. अनेकजण या मिठीच्या अनुभवानंतर सुरक्षित आणि शांत वाटल्याचे सांगतात.

ट्रेव्हर आशा लोकांना मदत करतो जे नातेसंबंध निर्माण करण्यात कमी पडतात किंवा त्यांना नात्यांसाठी संघर्ष करावा लागतो. काहीजण नैराश्य, चिंता, एकाकीपणा यांमुळे कंटाळलेले असतात, अशा लोकांना कडलिंग द्वारे प्रेम, काळजी, माया यांचा अनुभव करून दिला जातो, जेणेकरून लोक मोकळे होतात, कधी हसतात कधी रडतात, पण सरतेशेवटी रिलॅक्स होतात.

त्याच्या कामाचे स्वरूप नीटसे न समजल्याने काहीजण त्याला सेक्स-वर्कर समजतात जे की पूर्णत: चुकीचे आहे.

आपल्या व्यवसायाबद्दल बोलताना हुटन सांगतो, की त्याने हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मानवी नातेसंबंधावर जवळपास १० वर्षे संशोधन केले आणि मगच हा व्यवसाय सुरू केला फक्त मिठीच नाही तर थोपटणे, हात हातात घेणे, चेहर्‍यावरून मायेने हात फिरवणे अशा छोट्या छोट्या गोष्टी देखील खूप मोठा मानसिक परिणाम साधतात. शेवटी या सगळ्या गोष्टी आपल्या मनाशीच तर संबंधित आहेत.

अनोळखी लोकांना मिठीत घेताना सुरवातीला ते लोक संकोचतात, पण जसजसा त्यांना अनुभव येतो तसतसे ते आरामदायी भावना अनुभवतात.

 

hug im1

 

हुटोन सांगतो, त्याच्यात आणि त्याच्या क्लायंटमध्ये कोणतेही लैंगिक संबंध नसतात. तो आधी त्यांच्याशी सविस्तर बोलून त्यांची अडचण समजून घेतो त्यानुसार त्या क्लायंटला थेरपी दिली जाते.

मित्रांनो ‘कडलिंग’ करणे चूक नाही तर समोरच्याची भावना समजून घेवून त्याला आधार देण्यासाठी केलेली कृती आहे. एखाद्या रडणार्‍या मुलाच्या पाठीवरून हात फिरवून किंवा चेहर्‍यावर हात फिरवून पहा काय अनुभव येतो. मग तुम्हीच म्हणाल ‘कडलिंग’ करा अच्छा लगता है…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?