' महात्मा गांधींच्या मुलाने डॉन ब्रॅडमन साठी अख्खी रात्र जेलमध्ये काढली होती!

महात्मा गांधींच्या मुलाने डॉन ब्रॅडमन साठी अख्खी रात्र जेलमध्ये काढली होती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना सामान्यतः महात्मा गांधी म्हणून ओळखले जातं, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि ते आपल्या भारताचे ‘राष्ट्रपिता’ आहेत. मोहनदास यांचा क्रिकेटशी थेट संबंध नसला तरी त्यांच्या चार मुलांपैकी एका मुलाचे या खेळाशी विचित्र नातं होत. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा देवदास गांधी हा क्रिकेटप्रेमी आणि औस्ट्रेलियाचे महान अष्टपैलू फलंदाज डॉनल्ड ब्रॅडमन याचा चाहता होता.

ब्रॅडमन यांच्या शेवटच्या कसोटीतील खेळ याची देही याची डोळा पहाण्यासाठी त्याने जगावेगळे धाडस केलं होत. एखादा सेलिब्रिटी आणि त्याचा फॅन यांचं नातं  असतं जसे सूर्य आणि एखाद्या फुलाचेअसतं. फुल उमलण्यासाठी सकाळची वाट पाहते, सकाळी सूर्यकिरणांचा स्पर्श झाला की उमलत.

फुलाने उमलण्याची गोष्ट सूर्याच्या गावी ही नसते. तो आपला आपल्यातच मश्गुल असतो. तशीच काहीशी देवदास गांधी यांची ही गोष्ट आहे. ज्यांच्यासाठी देवदास गांधींनी एक रात्र तुरुंगात काढली त्या ब्रॅडमन यांनाही कदाचित ही घडलेली गोष्ट माहिती नसावी. पण आम्ही तुम्हाला ही रोमांचक गोष्ट सांगणार आहोत.

 

don-bradman-inmarathi
essential.com

त्याचं झालंअसं की महात्मा गांधींना जरी फूटबॉलची आवड असली तरी त्यांच्या सर्वात धाकट्या मुलाला म्हणजे देवदास गांधी यांना मात्र क्रिकेटचे वेड होत. त्यात ही ते डॉन ब्रॅडमन यांचे चाहते होते.

इतिहास संशोधक रामचंद्र गुहा यांनी विस्डेनमध्ये देवदास यांचा मोठा मुलगा राजमोहन याने कथन केलेली ही मनोरंजक कथा लिहीली आहे. त्यांच्या वडिलांप्रमाणे देवदास गांधी देखील स्वातंत्र्यलढ्यांमध्ये सामील होते आणि १९३० मध्ये आयोजित सॉल्ट मार्चमध्ये ( मिठाचा सत्याग्रह ) सहभागी झाले होते. नंतर ते हिंदुस्तान टाइम्स वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक म्हणून रुजू झाले.

क्रिकेटचा चाहता असल्याने देवदास यांनी खेळाला, विशेषतः क्रिकेटला कव्हरेज दिले. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमच्या स्कोअर कार्डवर त्यांना त्यांचा पेपर प्रायोजक मिळाला होता. त्याच दरम्यान सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी ४० वर्षांचे होण्यापूर्वीच जाहीर केले की १९४८ चा इंग्लंड दौरा ( अॅशेज कसोटी ) हा ऑस्ट्रेलियन संघासाठी त्यांचा शेवटचा असाइनमेंट असेल.

ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीही भारतीय भूमीवर प्रथम श्रेणी सामना खेळला नाही आणि म्हणून देवदास गांधींना या महान व्यक्तीला शेवटच्या क्षणी खेळताना पहायचे होत. त्यामुळे रॉयटर्सच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते लंडनला पोहोचले आणि कसे तरी, १० जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपर्यंत ते नॉटिंगहॅमला पोहोचण्यात यशस्वी झाले.

 

devdas gandhi im 1

 

ट्रेंट ब्रिज चाचणीची सगळी तिकिटं विकली गेली होती परंतु फ्लीट स्ट्रीटच्या ग्रे एमिनन्स च्या मदतीने देवदास यांनी एक प्रशंसात्मक पास मिळवला होता. पास तर मिळाला पण राहायची व्यवस्था कुठे आणि कशी करायची हा देखील खूप मोठा प्रश्न होता कारण ब्रॅडमनला पाहण्यासाठी अवघ्या जगातील क्रिकेट रसिक जमा झाले होते.

सारी हॉटेल्स पण बूक होती. त्यामुळे पहिल्या दिवसानंतर रात्र घालवणे हे धाकट्या गांधींसाठी मोठं आव्हान होत. त्यामुळे ब्रॅडमनची फलंदाजी लाइव्ह पाहण्यासाठी देवदासना पुढे राहण्याची जागा मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार होती. त्यांना ‘महाराजा हॉटेल’ ची आठवण झाली.

यातला गमतीशीर भाग हा की इंग्रजांच्या जेलला महात्मा गांधी यांनी ‘महाराजा हॉटेल’ असे नाव दिलं होत. तर देवदास सरळ नॉटिंगहॅम काउंटी जेल मध्ये पोहोचले आणि त्यांनी तेथील जेलरला आपल्या स्टाईलने पटवून आपली एक रात्र राहण्याची व्यवस्था करावी लागली.

नॉटिंगहॅम काउंटी जेलमध्ये पोहोचण्यासाठी देवदास गांधींनी आपल्या पत्रकारितेच्या प्रभावाचा वापर केला. त्यांनी तुरुंगाच्या वॉर्डनची समजूत काढली आणि ब्रॅडमन दुसऱ्या दिवशी फलंदाजीला येणार होता म्हणून ती रात्र तुरुंगामध्ये काढली. दुसर्‍या दिवशी तुरुंगातील कैद्यांसोबत ब्रेकफास्ट करून देवदास गॅलरीत मोठ्या संख्येने असलेल्या प्रेक्षकांमध्ये सामील होण्यासाठी ट्रेंट ब्रिजवर चालत गेले.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव १६५ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिला दिवस १७/०च्या स्कोअरवर संपवला. ३२ षटकांत झालेल्या ७३ धावांच्या सलामीनंतर ब्रॅडमन फलंदाजीला आला. डॉन ब्रॅडमनने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद १३० धावांची खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाने २९३/४ पर्यंत मजल मारली आणि मोठी आघाडी घेतली.

 

jail inamrathi

क्रिकेटविश्वातल्या या ७ गैरसमजुती प्रत्येक भारतीयांच्या मनात खोलवर रुजवल्या गेल्या आहेत!

विश्वचषक गाजवणारा क्रिकेटर धडपडतोय पोट भरण्यासाठी, वाचा संघर्ष-कथा…

ब्रॅडमन यांना प्रत्यक्ष खेळताना बघण्याची इच्छा पूर्ण करणारे देवदास गांधी लंडनला परतले. अखेरीस ब्रॅडमन १३८ धावा करून बाद झाला तर लिंडसे हॅसेटने १३७ धावा करून ऑसीजला ५०९ धावांपर्यंत नेले . डेनिस कॉम्प्टन च्या १८४ धावांच्या खेळीनंतरही इंग्लंडला दुसऱ्या डावात ४४१ पर्यंतच मजल मारता आली.

ऑस्ट्रेलियाने ९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रॅडमनच्या शून्यासह दोन विकेट्स गमावल्या. खरं तर, ब्रॅडमनची विकेट पडल्यामुळे, दुस-या दिवसाचा खेळ संपल्यानंतर देवदास ट्रेनने लंडनला परतले, आणि बाकीची कसोटी त्यांना बघायला मिळाली नाही. ते काही नेत्रदीपक कामगिरीला मुकले, पण त्यांना आता काही फरक पडणार नव्हता कारण त्यांना जे हवे होते ते त्यांनी पाहिले होते.

मित्रांनो क्रिकेटचे वेड आपल्या देशाच्या नसानसांत कसे भिनलेले आहे याचे हे एक युनिक उदाहरण आहे. आजही जेव्हा क्रिकेट फिव्हर चढतो तेव्हा लहानांपासून थोरांपर्यंत सारे जन क्रिकेट पंढरीचे वारकरी होतात खरे ना???

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?