' अमरनाथ यात्रेतील हा हृदयद्रावक प्रसंग हिंदू-मुस्लिम नात्याचा हळुवार पदर दाखवून देतो – InMarathi

अमरनाथ यात्रेतील हा हृदयद्रावक प्रसंग हिंदू-मुस्लिम नात्याचा हळुवार पदर दाखवून देतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सगळं जग वाईट माणसानी भरलेलं नाही याचा पडताळा जागोजागी येतो आणि चांगुलपणा. माणुसकी यांना कोणत्याही जाती धर्माची मिरासदारी बनवून आजवर कुणीही ठेवू शकलेलं नाही. सगळ्या जातीत चांगले आणि वाईट लोक भरलेले आहेत.

नुकतीच अमरनाथ यात्रेतील एका तरुणाने अमरनाथ यात्रेकरूचा जीव वाचवताना स्वत:चा जीव गमावल्याची घटना घडली आहे. आणि विशेष म्हणजे हा प्राणाला मुकलेला मुस्लीम युवक आहे. काय आहे ही घटना?

अमरनाथ हे भारतातील पवित्र तीर्थस्थळ आहे. त्याला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. अमरनाथचे वैशिष्ट्य म्हणजे हे बर्फाचे स्वयंभू शिवलिंग आहे.

 

amarnath yatra inmarathi

 

हवामानानुसार चंद्रकलेप्रमाणे या शिवलिंगाचा आकार कमी जास्त होतो. आठ ते दहा फूट उंचीचे हे शिवलिंग जम्मू काश्मीर राज्यात आहे. समुद्रसपाटीपासून १३,६०० फूट उंचीवर आहे. तेथे ऑक्सिजन अतिशय विरळ आहे.

भयंकर थंडी, दुर्गम रस्ते आणि अतिशय जिकिरीचा प्रवास म्हणजे अमरनाथ यात्रा. पण तरीही भक्तिभावाने पिढ्यानपिढ्या ही यात्रा सुरूच आहे.

आजही या यात्रेला हिंदू भाविकांचे जत्थेच्या जत्थे जातात. कोविड काळात या यात्रेवर बंदी आणली होती. पण यावर्षी ही यात्रा परत सुरु झाली आहे.

या गुहेबाबत अशी दंतकथा सांगितली जाते याच ठिकाणी महादेवांनी पार्वतीला अमरत्वाचे तत्व सांगितले होते. ते सांगताना कुणीही मनुष्यप्राणी तिथे नव्हता. पण दोन कबुतरांनी ते ऐकले होते आणि ती कबुतरे अमर झाली. आजही खूप जणांना तिथे दोन कबुतरे दिसतात.

ही यात्रा चालत करावी लागते. अतिशय अवघड असलेली ही यात्रा लोक खूप श्रद्धेने करतात. पेहलगामपर्यंत रस्ता सोपा आहे. बसेस तिथे पर्यंत जातात. पण तेथून पुढे अतिशय कठीण असलेली ही यात्रा लोक पायी किंवा घोड्यावरून करतात.

 

amarnath inmarathi
tirthyatri

 

साधारणपणे ३० जून ला ही यात्रा सुरु होते ती ऑगस्ट महिन्यात संपते. या यात्रेला जाणे म्हणजे खरोखर जीव मुठीत घेऊन जाणे आहे. कारण हिमवर्षाव, दरड कोसळणे, अतिशय उंचावर असल्यामुळे ऑक्सिजन कमी पडणे, भयंकर थंडीमुळे आजारी पडणे या गोष्टी होतातच.

आजवरच्या इतिहासात आपण मुस्लीम हिंदुना मारतात हे बघितले आहे. पण हिंसेला आणि प्रेमाला पण जात धर्म नसते हे इथे येऊन समजते.

केदारनाथ सिनेमात आपण जी कथा पाहिली होती, सुशांतसिंग राजपूत असाच एक मुस्लिम तरुण दाखवला आहे जो यात्रेकरूना डोली, पालखी किंवा घोड्यावरून केदारनाथला घेऊन जात असतो.

सारा अली खान या हिंदू मुलीबरोबर मैत्री होता होता त्याच्याही पलिकडे जाऊन त्यांचे एकमेकांवर प्रेम बसते आणि तिला वाचवताना तो मरतो.

 

kedarnath im

 

या सिनेमाच्या कथानकाशी मिळतीजुळती घटना नुकतीच या यात्रेत घडली. म्हणजे एका महिला प्रवाशाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एक मुस्लीम युवक मृत्युमुखी पडला.

इम्तियाज अहमद खान हा २२ वर्षाचा तरुण एका महिला यात्रेकरूला घोड्यावरून पडताना वाचवायला गेला आणि स्वत:चा जीव गमावला.

 

horseman im

 

काश्मीर हे मुस्लिमबहुल राज्य आहे. आणि अमरनाथ हिंदूंचे आराध्यदैवत. हजारो भाविकांना कित्येक मुस्लीम तरुण डोलीतून, खेचरावरून अमरनाथ पर्यंत घेऊन जातात.

नेमकं काय घडलं?

पेहेलगाम ते अमरनाथ या रस्त्यावरून इम्तियाज पहाटे ३ वाजता तो प्रवासी घेऊन निघाला. आधीच खडतर असलेला हा मार्ग निसरडा झाला होता. इम्तियाज त्याच्या घोड्याला घेऊन निघाला होता.

पहाटे सुटलेला गार वारा घोड्याची दुडकी चाल याचा परिणाम म्हणून त्याच्या सोबत असलेल्या घोड्यावर बसलेली महिला यात्रेकरू पेंगायला लागली. ही गोष्ट इम्तियाजच्या लक्षात आली.

त्याने बोलण्याच्या ओघात तिला जागं ठेवण्याचा बराच प्रयत्न केला. काही काळ ती जागीही राहिली, मात्र त्यानंतर पुन्हा तिला झोप लागली आणि नेमका त्याच वेळी काळाने घात केला.

ती पडेल म्हणून त्याने धावत जाऊन तिला जागं करायचा प्रयत्न केला आणि त्याचाच तोल जाऊन तो ३०० फूट खोल दरीत कोसळला.

जम्मू काश्मिर पोलिस दल आणि रेस्क्यू टीमकडून त्याला खूप मुश्किलीने दरीतून बाहेर काढलं. त्याला दवाखान्यात नेलं पण तो आधीच त्याने प्राण गमावले होते.

 

death im

 

काश्मीर मध्ये अतिशय कठीण परिस्थिती आहे. वर्षातील फक्त चार महिने प्रवासी येतात आणि उरलेले आठ महिने काही काम नसते. अशा परिस्थितीत इम्तियाज आपलं कुटुंब चालवत होता. त्याची पत्नी, त्याचे आठ महिन्याचे बाळ, आई वडील यांच्यासह चार भाऊ बहीण यांचा तो एकमेव पालनकर्ता होता.

त्याचे वडील अंशत: अंध आहेत. बहिणी लग्नाच्या आहेत. अशा परिस्थितीत इम्तियाज आपलं घर चालवत होता. त्याच्या मृत्यूने त्याच्या घराचा आधार गेला आहे. पण जाताना देखील इम्तियाज जगात चांगुलपणा आहे हे उदाहरण ठेवून गेला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?