' चेहऱ्यावर साबण वापरताय? यामुळे होणारे दुष्परिणाम ठाऊक आहेत का? – InMarathi

चेहऱ्यावर साबण वापरताय? यामुळे होणारे दुष्परिणाम ठाऊक आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अमुक एक साबण वापरा आणि नितळ त्वचा मिळवा किंवा माझ्या ग्लोईग त्वचेचं रहस्य म्हणजे हा साबण. अशा साबणाच्या मारा करणाऱ्या जाहिराती सतत आपल्यावर आदळत असतात, पण चेहऱ्यासाठी साबण वापरण हे खरोखरीच योग्य आहे का? याचा कधी तुम्ही विचार केला आहेत का? जर नसेल तर आता ती वेळ आली आहे.

साबण हा अंगाला लावण्यासाठी योग्य असतो, पण तोच चेहऱ्यासाठी कधी कधी नुकसानदायी ठरू शकतो. कारण बऱ्याचदा आपण साबणाची निवड आंधळेपणाने करीत असतो. कधी वास आवडतो म्हणून तर कधी जाहिरातीवर विश्वास ठेवून तर कधी रंग आवडतो म्हणून. अशी एक ना अनेक कारणे असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण साबणामध्ये ph लेव्हलचे प्रमाण किती आहे, हे मात्र कधीच तपासत नसतो. साबणात कोणते घटक किती प्रमाणात वापरले आहे, त्याची ph लेव्हल किती आहे, या सर्व गोष्टी त्या त्या साबणाच्या रॅपरवर नमुद केलेल्या असतात.

आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. इतकी वर्षे वापरत आलोय तेव्हा काही नाही झाले, मग आताच का? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल.

तसं पाहिलं तर साबण हा चेहऱ्यासाठी चांगला नसतो. त्या ऐवजी फेस वॉश, क्लीन्जर किंवा आयुर्वेदीक उटणी ही खऱ्या अर्थाने तुमचा चेहरा स्वच्छ आणि नितळ करण्यास मदत करीत असतात. रोजच्या वापरातला साबण हा चेहऱ्यासाठी का चांगला नसतो ,जाणून घेऊ या –

 

washing face inmarathi

 

साबणाचा थेट चेहऱ्यावर वापर म्हणजे कोरडेपणाला आमंत्रण – कित्येकदा आपण साबण थेट चेहऱ्यावर घासून-घासून लावत असतो. त्यात असलेल्या केमिकल्समुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी आणि खरखरीत होण्याची शक्यता अधिक असते.

साबण हे डाय आणि सेण्टेड स्वरूपाचे असतात –

साबणाचा खप वाढवावा म्हणून बऱ्याचदा त्यामध्ये डाय आणि कृत्रिम सेण्ट मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. चेहऱ्यावरील त्वचा ही नाजूक असल्याने, अशा साबणाच्या वापराने चेहरा लाल होणं, त्यावर खाज निर्माण होणे असे काही दोष निर्माण होऊ शकतात.

साबण चेहऱ्याची योग्य प्रकारे स्वच्छता करण्यास असमर्थ ठरतात–

मुळात साबणाचा आकार हा बहुतेक वेळा आयताकृती असतो. त्यामुळे तो चेहऱ्यावर लावताना सर्वत्र पसरेलच असे नाही. यामुळे चेहऱ्याची पूर्णपणे स्वच्छता होत नाही.

बऱ्याचदा साबणाची ph लेव्हल जास्त असल्यामुळे चेहऱ्यावर चिकटलेली घाण साफ होण्याऐवजी चिकटून रहाते. अशावेळी साबणाने तोंड धुतल्यानंतर फ्रेश वाटण्याऐवजी चेहरा अधिक चिपचीप वाटू लागतो.

साबणाची लेव्हल ही ४ ते ६.५ च्या दरम्यान असावी. या पातळीत बिघाड झाला तर चेहऱ्यावर डाग किंवा काळपटपणा निर्माण होतो.

चेहऱ्यावरील त्वचेच्या रचनेत बिघाड करण्यास कारणीभूत ठरतो –

 

oily face featured inmarathi

 

आपल्या चेहऱ्यावरील त्वचा ही इतर त्वचे प्रमाणे काही थरांनी बनलेली असते. साबणाच्या थेट वापरामुळे, त्वचेवरील असलेले हे थरांचे आवरण तकलादू बनते.

हे थर एकप्रकारे चेहऱ्यांचे संरक्षण करीत असतात, परंतु साबणाच्या वापरामुळे या थरांवर परिणाम होऊन ते शुष्क बनतात. त्यामुळेच चेहऱ्याची त्वचा कोरडी व निस्तेज दिसू लागते.

साबण हा चांगल्या विषाणूंना नष्ट करतात –

चेहऱ्यावरील त्वचेमध्ये सूक्ष्म स्वरूपाचे असे चांगले विषाणू असतात. जे त्वचेला आरोग्यदायी राहण्यासाठी मदत करीत असतात. साबणामध्ये असलेल्या केमिकल्स मुळे हे चांगले विषाणू मरून जातात, त्यामुळे त्वचा एकदम निस्तेज व खरखरीत दिसू लागते.

साबणाचा वापर म्हणजे अॅलर्जीला आमंत्रण –

बऱ्याचदा असं आढळून येतं, की एखादा साबण वापरल्यानंतर खाज येणं, पुरळ उठणं किंवा चेहऱ्याबरोबर हातावरील त्वचेची देखील सालपटे निघतात. जर या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर त्या साबणाची अॅलर्जी निर्माण होण्याची दाट शक्यता असते.अशावेळी साबण वापरणे हे अधिक त्रासदायक ठरते.

 

soap tax inmarathi

 

यावरून तुमच्या लक्षात आले असेल, की चेहऱ्यासाठी साबणाची योग्य निवड केली नाही तर तो किती नुकसानदायी ठरू शकतो. चेहरा स्वच्छ करण्याची एक पद्धत आहे, त्यानुसार – प्रथम चेहरा नुसत्या पाण्याने धुवून घ्यावा. मग हातावर चांगल्या दर्जाचे फेसवॉश थोडासा घ्यावा. हातावरच थोडे पाणी टाकून फेस तयार करावा.

हा तयार फेस चेहऱ्यावर सर्व बाजूनी मसाज करीत चोळावा. कमीत कमी एक ते दोन मिनिटे तरी चोळावा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.

धुतलेला चेहरा मुलायम टॉवेलने अलगद टिपून कोरडा करावा आणि त्यानंतर चेहऱ्यावर तुमच्या आवडीचे मॉश्चरायझर लावावे. या पद्धतीने चेहरा धुतल्यास निश्चितपणे चेहरा तजेलदार होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?