' "महाराष्ट्रातील राजकारणातली सर्वांची आवडती जोडी"

“महाराष्ट्रातील राजकारणातली सर्वांची आवडती जोडी”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – ॲड. अंजली झरकर

===

श्री अजित अनंतराव पवार
जन्म:- २२ जुलै १९५९

श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस
जन्म:- २२ जुलै १९७०

एकाच जन्मतारखेला साधारणपणे अकरा वर्षाच्या अंतराने जन्मलेले महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते. आता बघायला गेलं तर दोघेही नेपोटिक फॅमिलीमधून आलेले परंतु इतरांच्या बाबतीत होणारा नेपोटिझमचा शिक्का त्यांच्यावर बसलेला नाही. कदाचित याचं कारण त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आणि कर्तुत्वामध्ये सापडू शकते.

आता भले जरी राजघराण्यात जन्म झाला असेल परंतु जर सत्तेची धुरा समर्थपणे व्हायची असेल तर तो वारस देखील तितकाच खंबीर आणि दृढ निश्चय लागतो. अजित पवारांचा फटकळपणा, अंमलबजावणीची क्षमता आणि देवेंद्र फडणवीस यांचा पक्षावरचा होल्ड आणि राजकारणात अत्यंत आवश्यक असणारी उपद्रव क्षमता (nuisance value) हे गुण ज्या पद्धतीने झळाळून उठतात त्याच्यामुळे त्यांच्या मागे असलेल्या जनाधाराचे आश्चर्य वाटत नाही.

 

ajit pawar and devendra fadanvis IM

 

आता दादांना मी लहानपणापासून बघितलेले आहे मी विद्या प्रतिष्ठानची विद्यार्थिनी ६ वी पासून ते बी.ए. विथ इंग्लिश लिटरेचर चा प्रवास मी विद्या प्रतिष्ठान मध्ये पूर्ण केलेला आहे विद्या प्रतिष्ठान म्हणजे बारामतीचा पर्यायाने पवार घराण्याचा मानबिंदू असल्यासारखा आहे पण फार कमी लोकांना माहिती असेल ही जी वास्तू उभी राहिली त्या पाठीमागे व्हिजन जरी मोठ्या साहेबांची असली तरी त्याची ज्या पद्धतीने मांडणी किंवा उभारणी झालेली आहे त्याच्या पाठीमागे अजित पवारांचा दृष्टिकोन किंवा दृष्टी आहे.

एखाद्या माणसाची एक व्हिजन असते त्याला काहीतरी भव्य दिव्य उभ करायचं असतं त्यासाठी तो प्रयत्न करतो जेव्हा ती व्हिजन प्रत्यक्षात अस्तित्वात येते तेव्हा ती ज्या पद्धतीने अस्तित्वात येते किंवा ज्या कलापूर्ण पद्धतीने त्याची मांडणी होते त्यासाठी देखील साथ देणारी किंवा तशी कलात्मक दृष्टी असणारी माणसे लागतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

विद्या प्रतिष्ठानची वास्तू त्या वास्तूतील अनेक इमारती प्रशस्त बांधणी त्याचं देखणेपण, त्या इमारतीचे प्रत्येक खांब इमारती समोरचा परिसर कसा असला पाहिजे वास्तूचा प्रत्येक चिरा कसा बसला पाहिजे कसा दिसला पाहिजे याच्या पाठीमागे फक्त अजितदादांची दृष्टी आहे आणि हे मी आज फेसबुकवर सांगत नाही. जेव्हा मी शाळेमध्ये होते तेव्हा देखील हीच गोष्ट आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलेली होती.

अनेक वेळा एखाद्या रविवारी आम्हाला दादा विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेच्या गेटसमोर दिसायचे बरं फक्त दिसायचे नाहीत तर मी स्वतः त्यांना एका वेळेला स्वतः गेट समोरचा कचरा हाताने उचलून बाजूला फेकत बाजूच्या लोकांना स्वच्छतेच्या सूचना देताना ऐकलेले बघितलेले आहेत.

आता एखाद्याचं सुदैव आणि दुर्दैव कदाचित या गोष्टीमध्ये असू शकेल जेव्हा तुम्ही भल्या थोरल्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये वाढता त्यावेळी तुम्हाला त्या वटवृक्षाचा आधार, प्रेम, छत्रछाया तर मिळते परंतु त्याच्या सावली बाहेर तुम्हाला कधी पडता येत नाही.

 

ajit pawar IM

 

बाकी शिस्त, करारीपणा, फटकळपणा रागीटपणा असलेले दादा प्रत्येकालाच माहित आहेत मात्र स्वच्छता, टापटीत, सौंदर्यदृष्टी, कलात्मकता हे देखील दादांचे गुण कदाचित लोकांना अभावाने माहीत असतील.

बारामतीच्या मातीतला रांगडा अस्सल मराठी माणूस तोंडावर येईल ते फटकळपणे बोलून टाकणारा एखादी व्हिजन प्रत्यक्षात आणण्यासाठी मनापासून झटणारा आणि बाकी राजकारणात कितीही आरोप प्रत्यारोप झाले तरी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आवडणारा हा एकमेव नेता. दादा म्हणजे आमच्या सर्वांच काळीज!

देवेंद्र फडणवीस! अजित दादा पवार यांची जशी जडणघडण किंवा प्रतिमा आहे त्याच्या थोडंफार उलट असलेल्या व्यक्तिमत्व. दादांनी फक्त बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर वडील गेल्यामुळे त्यांनी कुटुंबाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ते राजकारणात आले. देवेंद्र फडणवीसांच वेगळं आहे घराण्याला राजकीय पार्श्वभूमी होतीच. उत्तम पद्धतीने त्यांनी शिक्षण पुर्ण केलं. वकील आहेत.

संघाचे हेडक्वार्टर असलेल्या नागपूर मध्ये संघाच्या माध्यमातून उत्तम जडणघडण झाली. २०१४ ला अचानकपणे त्यांचं नाव पुढे आलं ते गोपीनाथ मुंडे गेल्याच्या नंतर.

राजकारणामध्ये ब्राह्मण नेतृत्व रुजत नाही पचत नाही असा समज असताना पहिली मुख्यमंत्री पदाची टर्म त्यांनी पूर्ण केली. शरद पवारानंतर अत्यंत कमी वयामध्ये मुख्यमंत्री झालेला व्यक्ती या महाराष्ट्राने पाहिला.

आता देवेंद्र फडणवीस यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतः ब्राह्मण असले तरी मी कधीही फडणवीसांना ब्राह्मणांसाठी काही विशेष केल्याचं पाहिलेलं नाही. ते ब्राह्मणांच्या कुठल्या खास सभांना उपस्थित राहतात, किंवा ब्राह्मण समाजाला फार मोठे पॅकेजेस जाहीर केलेत, किंवा ब्राह्मण समाजाची तळी उचललेली आहे, काही बोललेले आहेत असं तुम्हाला कुठेही वाचायला बघायला किंवा ऐकायला मिळणार नाही.

 

devendra fadnavis inmarathi

 

आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाबद्दल बहुजन लोकांच्या मनात प्रचंड राग आहे परंतु जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एखाद्या राज्याचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा आपली प्रतिमा ही अभिजन किंवा सवर्ण किंवा ब्राह्मण नेता कधीच नसली पाहिजे ही गोष्ट जाणीवपूर्वक जोपासणारा देवेंद्र फडणवीस हा एकमेव नेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे.

त्यामुळे जरा आज गुगलवर महाराष्ट्र ओबीसी आरक्षण महाराष्ट्र मराठा आरक्षण धनगर आरक्षण असे शब्द टाकले तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव आपसूक येते.

२०१९ ला ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली मग त्याच्यामध्ये भाजप मधल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना पक्षात घेऊन त्यांना पदे देणे, पक्षांतर्गत स्पर्धा संपवून टाकण्यासाठी प्रयत्न करणे, अजित दादा बरोबर पहाटे शपथविधी घेणे अशा गोष्टींमुळे बऱ्याच कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता सोशल मीडियावर भाजपच्या बाजूने हिरीरीने लिहिणारे माझ्यासारखे अनेक लोक त्याच्यामुळे बाजूला निघून गेले होते पण परिस्थिती आता पुन्हा बदलली आहे.

कोविड काळात ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडून गोष्टी हाताळल्या गेल्या विशेष करून पालघर मधील साधूच्या हत्याकांडानंतर ज्या पद्धतीने सरकारने काम केलं सोशल मीडियावर त्याविषयी लिहिणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीने धमक्या देण्यात आल्या कारवाई झाली आणि एकंदरीत जो निष्क्रिय कारभार गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्राने पाहिला. त्याच्यामुळे अनुकूलतेचे वारे आता फडणवीस आणि त्यांच्या टीमकडे आहे.

नवीन सरकार ने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर सभागृहामध्ये जेव्हा शिंदे गटाने भाषण केले तेव्हा प्रत्येक नेत्याने अजित दादांचे नाव काढलेले आपण सगळ्यांनी बघितले पण फक्त एकटे अजित पवार सकाळी सहाला उठून टेबलावर काम करत बसले म्हणून राज्याचा गाडा कसा काय पुढे चालवायचा? त्यासाठी सक्षम प्रशासन तर हवं.

 

eknath shinde im

 

मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा चेहरा असतो राज्यातल्या करोडो लोकांचा तो प्रतिनिधी असतो. किमान घराबाहेर पडून कार्यालयात काम करणाऱ्या माणसाची तर जनता पेक्षा ठेवू शकतेच ना. तिला तेवढा हक्क आहेच आता देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनावे लागले.

वरिष्ठ पातळीचा आदेश त्यांनी मानला आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनात एक सहानुभूतीची लाट देखील निर्माण झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घेण्याचा आदेश आला तेव्हा ते ढसाढसा रडले अशा बातम्या छापून आल्या. मला त्यात काही वावगे वाटले नाही.

इतक्या मोठ्या पातळीवर, इतकं मोठं प्रेशर हँडल करताना आपल्या मनाविरुद्ध गोष्ट झाली, अत्यंत अपमानास्पद वागणूक अचानक मिळाली तर एखाद्याने दगडासारखं राहिलं पाहिजे हा अट्टाहास कशासाठी? शेवटी माणूसच आहे तो.रडला असेल!आलं असेल त्याच्या डोळ्यात पाणी! Crying is not a weakness!

दिल्लीतून महाराष्ट्रातील नेत्यांना दाबण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून नाहीतर अनेक शतकांपासून सुरू आहेतच त्यामुळे देवेंद्र फडणवीसबद्दल खरोखर एक सहानुभूतीचे जनमत तयार झाले किंवा करण्यात आले.

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना आव्हान देणारा नेता कधीही कोणी बघितलेला नव्हता पण देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने तो पर्याय किमान दृश्य स्वरूपात भाजपच्या कार्यकर्त्यांना सध्या दिसत आहे. पाठीमागे मोदी शहांची ताकद तर उभी आहेच परंतु यांची स्वतःची उपद्रव क्षमता प्रचंड आहे.

 

modi shah inmarathi

 

जसं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं “कधी काय करतील कधी काय करतील याचा नेम नाही” हे वाक्य अनेक वर्षांनी शरद पवार यांच्या नंतर आता फडणविसांबद्दल बोलले गेले. फडणवीस यांचा आत्ता दिसलेला विशेष नेतृत्व गुण म्हणजे म्हणजे सगळ्या पक्षातून लोक फुटले परंतु गेले अडीच वर्षे सत्ता नसताना भारतीय जनता पार्टी मधून एकही आमदार फुटला नाही. पक्षावर आणि प्रशासनावर वचक असणे म्हणजे काय हे या निमित्ताने फडणवीस यांनी सिद्ध केले असे म्हणायला हरकत नाही.

शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणातली ही माझी आवडती जोडी माझीच काय सगळ्यांची आवडती जोडी. चलो एकत्र कधी येऊ शकणार नाही परंतु त्यांचे वाढदिवस एकाच तारखेला येतात हेही नसे थोडके!

माजी उपमुख्यमंत्री अजित दादा आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!\

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Adv. Anjali Zarkar

Lawyer by profession. belletrist by heart!

anjali-zarkar has 12 posts and counting.See all posts by anjali-zarkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?