' वडिलांचं छत्र हरपलं, पक्षानं जेलमध्ये टाकलं, हिंमत न हारता जगमोहन यांनी करुन दाखवलं

वडिलांचं छत्र हरपलं, पक्षानं जेलमध्ये टाकलं, हिंमत न हारता जगमोहन यांनी करुन दाखवलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताच्या राजकारणात घराणेशाहीचा प्रवेश अशा प्रमाणात झाला आहे की आता असा एकही राज्य आणि पक्ष नाहीये, जिथे घराणेशाही दिसणार नाही. लोकशाही प्रमाणेच या अप्रत्यक्ष राजेशाहीची झलकही प्रत्येक पक्षात दिसून येत आहे.

आपल्या देशाला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर, नेहरू-गांधी कुटुंबावर सर्वप्रथम घराणेशाही वाढवल्याचा आरोप करण्यात आला होता, यामागचे कारण म्हणजे त्यांच्या एकूण तीन पीढी म्हणजेच जवाहरलाल नेहरू त्यांची कन्या इंदिरा गांधी आणि इंदिरा यांचे पुत्र राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले होते.

आज राजीव गांधी यांचा मुलगा राहुल गांधी देखील काँग्रेसची ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यामध्ये त्यांना त्यांची बहिण प्रियांका वड्रा ही मदत करत आहेत. परंतु जरी घराणेशाही सुरु केल्याचा आरोप काँग्रेस वर होत असला तरी, हल्ली काही पक्ष सोडले तर जवळपास प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही अस्तित्वात आहे. यापैकीच एक पक्ष म्हणजे वाईएसआरसीपी, ज्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत जगनमोहन रेड्डी.

 

gandhi family im

 

जगनमोहन रेड्डी यांचे जीवन हे खुप रोमांचकारी आहे. त्यांचे वडील राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूपासुन ते बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात तुरुंगवास भोगण्यापासून ते वायएसआर काँग्रेसच्या नव्या पक्षाच्या स्थापनेपर्यंत त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहे. परंतु स्वतःच्या संघर्षाच्या जोरावर आज ते आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान आहेत.

वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी त्यांच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत एक छोटे व्यापारी ते शक्तिशाली नेते असे चांगले आणि वाईट दोन्ही दिवस पाहिले आहेत.

रेड्डी यांची एक व्यावसायिक म्हणून दशकभराची कारकीर्द कोणत्याही अडचणीविना होती, परंतु जसे त्यांनी राजकारणात प्रवेश केले तसेच त्यांच्या जीवनातील संकटांचे दिवस सुरु झाले, याकाळात त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. परंतु अशा या सर्व संकटांवर मात करून ते आंध्रप्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री झाले.

 

ysr reddy im

 

२०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांसोबतच झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत या पक्षाला १७५ पैकी १५१ जागा मिळाल्या होत्या. याचबरोबर त्यांच्या पक्षाने राज्यातील लोकसभेच्या निवडणूकीत २५ पैकी २२ जागा जिंकल्या होत्या.

अविभाजीत आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या एकुलता एक मुलाने म्हणजेच जगनमोहन रेड्डीने १९९९-२००० मध्ये शेजारच्या कर्नाटक राज्यात संदूर नावाची वीज कंपनी स्थापन करून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर या कंपनीचा व्याप त्यांनी ईशान्य भारतापर्यंत नेले. २००४ मध्ये जेव्हा त्यांचे वडील राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला आणि त्यांनी सिमेंट प्लांट सुरू केले.

यानंतर काहीच वर्षानंतर म्हणजेच २००४ मध्ये जगनच्या राजकीय महत्त्वाकांक्षा समोर आल्या. त्यांनी आंध्रप्रदेश येथील कडप्पा येथून खासदार होण्यासाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण काँग्रेस हायकमांडने त्यांची इच्छा पूर्ण केली नाही. परंतु यानंतर २००९ मध्ये त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि ते जिंकले सुद्धा.

परंतु हेच २००९ वर्ष त्यांचे जीवन संपूर्णपणे बदलून टाकणार होते. काहीच दिवसांनी जगनमोहन यांच्या वडिलांच्या हेलीकॉप्टरचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

 

ysr reddy im 1

 

 वडिलांच्या अकाली निधनानंतर, रेड्डी यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी तत्कालीन काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांची भेट घेतली पण त्यांनी जगनमोहन यांचा अपमान केला आणि मुख्यमंत्री बनवण्यास ही नकार दिला. वडिलांच्या निधनानंतर त्यांना राज्यात श्रद्धांजली मोर्चा काढायचा होता, परंतु त्यांना मोर्चा काढण्याची परवानगी नाकारली गेली होती.

परिस्थिती अशी तयार झाली की एकूण १७७ आमदारांपैकी १७० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. असं असतानाही काँग्रेस हायकमांडने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होत आणि रोसैया यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री नेमण्यात आलं होत. या निर्णयामुळे जगनमोहन रेड्डी प्रचंड संतप्त झाले होतेआणि त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दिली आणि स्वतःच नवीन पक्ष स्थापन केला.

रेड्डी यांनी २०११ मध्ये आपल्या वडिलांच्या नावावर वायएसआर काँग्रेस या पक्षाची स्थापना केली आणि स्वबळावरच राजकीय संघर्ष सुरू केला. यानंतर २०१२ मध्ये काँग्रेसचे १८ आमदार काँग्रेस सोडून वायएसआरमध्ये सामील झाले आणि त्यामुळे या जागांवर पोटनिवडणूक झाली.

या पोटनिवडणुकीत जगहमोहन रेड्डी यांच्या पक्षाने एकूण सर्वांना चकित करून टाकले, या निवडणुकीत त्यांनी १८ पैकी १५ जागा जिंकल्या होत्या. यानंतर त्यांना सतत काँग्रेस आणि चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपी यांच्याशी लढत घ्यावी लागली, यादरम्यान त्यांना तुरुंगात ही जावे लागलं होत. परंतु २०१४ मध्ये निवडणुकीत ते टीडीपीकडून पराभूत झाले. या पराभवानंतर त्यांनी संपूर्ण आंध्रप्रदेश मध्ये ३४१ दिवसांची पदयात्रा काढली होती.

 

ysr im 2

 

२०१४ च्या पराभवानंतर, रेड्डी यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी नोव्हेंबर २०१७ पासून कडप्पा जिल्ह्यातील एडुपुलापाया येथून पदयात्रा सुरू केली. यादरम्यान त्यांनी राज्यातील १३४ विधानसभा मतदारसंघात जाऊन सुमारे २ कोटी लोकांच्या भेटी घेतल्या.

या पदयात्रेमुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले. यानंतर अखेर जानेवारी २०१९ मध्ये त्यांची पदयात्रा संपली आणि त्यांनी तेथील निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.

आज महाराष्ट्रातही पक्षाची अवस्था अशीच काहीशी झाली आहे. आज शिवसेना दुभंगली आहे. कित्येक निष्ठावंत कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात सामील होत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा काळ परीक्षेचा आहे. ते पुढे आता नेमकी काय योजना आहे हे काही दिवसात कळेलच…

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?