' गणेशोत्सव होणार जोरात! मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही धावणारा मोदी एक्स्प्रेस…! – InMarathi

गणेशोत्सव होणार जोरात! मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही धावणारा मोदी एक्स्प्रेस…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो गणेशोत्सव म्हटलं की सर्वांच्या उत्साह आनंदाला अगदी अरबी सागरासारखी भरती येते हो ना? त्यात मुंबईतल्या चाकरमान्यांच्या लगबगीला तर अक्षरश: उधाण येत. सुटयांची जमवाजमव, सामानाची तयारी असे काय करू आणि किती करू असं त्यांना होऊन जात.

गणेशोत्सव ही या सगळ्यांना पुढच्या वर्षभरासाठी ऊर्जा गोळा करण्याची सुवर्णसंधी असते. कोकणात मागे सोडून आलेल्या आपल्या बालपणाला, आपल्या म्हातार्‍या आई-बापसाला, आपल्या पांगलेल्या मित्रमंडळींना पुन्हा भेटण्याची संधी! आणि म्हणूनच गणेशोत्सवासाठी मुंबईतून शेकडो चाकरमानी कोकणात जातात.

या भाविकांसाठी रेल्वेकडून विशेष ट्रेनही चालविण्यात येत आहेत. पण या ट्रेन आणि एसटी बसही फुल्ल झाल्या आहेत. यावर मुंबई भाजप ने एक नामी उपाय शोधला आहे. हा उपाय आहे ‘मोदी एक्सप्रेस’. काय आहे हा फंडा? चला जाणून घेवू.

 

express modi im

 

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकारमाने कोकणात जात असतात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वे गाड्या फूल्ल असतात. रेल्वे गाड्यांच्या आणि बसच्या रिजरवेशन ला देखील दोन महिने आधीच सुरुवात होते. या काळात रेल्वे प्रशासन आणि राज्य परिवहन विभागामार्फत काही स्पेशल गाड्या देखील मुंबईतून कोकणासाठी सोडण्यात येतात.

मोदी एक्स्प्रेसची सुरवात कधी झाली?

गेल्या वर्षी पहिल्यांदाच कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई भाजपाच्या वतीने ‘मोदी एक्स्प्रेस’ चालवण्यात आली होती. मोदी एक्स्प्रेसच्या माध्यमातून मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. या एक्स्प्रेसचा गेल्या वर्षी अनेक प्रवाशांनी लाभ घेतला.

दरम्यान या वर्षी देखील मुंबई भाजपाच्या वतीने ‘मोदी एक्स्प्रेस’ चालवण्यात येणार आहे. ही एक्स्प्रेस २८ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दादर रेल्वे स्थानकातून सुटणार आहे. या ट्रेनचा मार्ग दादर ते सावंतवाडी असा असणार आहे.

गेल्या वर्षीही गणेशोत्सवात ‘मोदी एक्सप्रेस’ नावाने कोकणसाठी विशेष गाडी सोडण्यात आली होती. कोकणचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदी निवड झाल्यावर नारायण राणे यांनी दादर येथून ‘मोदी एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला होता. यावेळी मुंबई भाजपकडून ही गाडी सोडण्यात येणार आहे.

 

narayan rane inmarathi

 

केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे आपल्या कामातून जनतेचे आशीर्वाद मिळविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत.मोदी एक्सप्रेस ट्रेनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे तिकीट काढावे लागणार नाही. त्यांचा प्रवास पूर्णपणे मोफत असेल. या ट्रेनमधील सर्व प्रवाशांचा खर्च भाजप आमदार नितेश राणे उचलत आहेत. मात्र ही सेवा केवळ एका दिवसापुरती मर्यादित आहे.

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. ही यात्रा यशस्वी झाल्याचे सांगताना राणे म्हणाले होते की, मला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. कोकण, महाराष्ट्र आणि देशाच्या प्रगतीसाठी मी काम करेन. जनआशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या दिवशी नारायण राणे यांनी शहरवासीयांना आश्वासने दिली होती. मोदी एक्स्प्रेस ट्रेनची सुरुवात ही फक्त त्याची ओळख आहे.

ट्रेन फुकटात?

गेल्या वर्षी देखील ही ट्रेन चालवण्यात आली होती. प्रवासासोबतच प्रवाशांच्या एक वेळच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. यंदा देखील दादर ते सावंतवाडी दरम्यान मोदी एक्स्प्रेस धावणार असून, अधिकाधिक संख्येने प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

dadar inmarathi

मुंबईतील प्रत्येक मंडलमधून ५० प्रवाशांची नावे नोंदवण्यात येतील. जिल्हाध्यक्षांची चर्चा करून ही ही नावे नोंदवली जातील. नोंदणीसाठी प्रत्येकी १०० रुपये शुल्क द्यावे लागेल. कोकणातील चाकरमान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गेली दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे संकट होते. त्यामुळे प्रवासावर देखील मर्यादा आल्या, अनेकांना इच्छा असूनही कोकणात गणेशोत्सवासाठी जाता आले नाही. मात्र आता कोरोना संकट कमी झाले असून, सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मोदी एक्स्प्रेस म्हणजे गणपतीसाठी कोकणात घरी जाणार्‍या चाकरमान्यांना मिळालेली मोठी संधी आहे, असे म्हणायला हरकत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?