' मोठ्या हौसेने नर्सरीतून आणलेली रोपं कोमेजून जाऊ नयेत यासाठी हे उपाय आवर्जून करा! – InMarathi

मोठ्या हौसेने नर्सरीतून आणलेली रोपं कोमेजून जाऊ नयेत यासाठी हे उपाय आवर्जून करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या पैकी खूप जणांना झाडे लावण्याची हौस असते. त्यामुळे कधी नर्सरीत फेर फटका मारायला गेलेत की लगेच नवीन झाडांची खरेदी केली जाते. उत्साहाने आणलेली ही झाडे उत्साहाच्या भरात लावली पण जातात.

मग काही दिवसांनी काही झाडे पार मरून गेलेली दिसतात. तर काही मरगळून जातात. उत्साहाने लावलेल्या झाडांची ही अवस्था पाहिल्यावर पुन्हा कधी झाडे लावण्याचा विचार मनात येत नाही.

पण आता निराश होण्याचे काहीच कारण नाही. नर्सरीतून आणलेले झाड लावताना काय काय काळजी घ्यायची आणि त्याच बरोबरीने झाडांची कशी काळजी घ्यायची याविषयी जाणून घेऊया!

घराबाहेर लावण्याची व घराच्या आत लावण्याची झाडे असे झाडांचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात. तुम्ही आणलेले झाड हे कोणत्या पद्धतीचे आहे ते लक्षात घ्या. म्हणजे ते घराच्या आतले आहे की बाहेरचे ते पहा.

 

plants IM

 

नर्सरीतून झाड आणल्यावर ते लगेच कुंडीत लावू नका. आणलेल्या झाडाला तुमच्या इतर झाडांच्या मध्ये न ठेवता थोडेसे बाजूला ठेवा. हे झाड सावलीत राहिल याची काळजी घ्या.

ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या घरातून नवीन घरात गेल्यावर रुळायला वेळ लागतो. झाडांचेही अगदी तसेच असते. कारण त्यांना नर्सरीच्या विशिष्ट वातावरणाची सवय झालेली असते. तिथून एकदम नव्या जागी आल्यावर त्या झाडाला देखील एक प्रकारचा शॉक बसलेला असतो. त्यामुळे नवीन जागी रुळण्यासाठी त्याला थोडा वेळ द्यावा.

चार-पाच दिवसानंतर त्या झाडाचे रि- पॉटींग करावे. रि-पॉटींग करताना झाडाच्या उंचीनुसार कुंडीची निवड करावी. म्हणजे झाड छोटे असल्यास मध्यम आकारची तर मोठे असल्यास मोठ्या आकारची कुंडी निवडावी.

एका बादलीत बऱ्यापैकी पाणी घेऊन त्यात नर्सरीतून आणलेले झाड ,त्यावरील प्लास्टिकचे आवरण अलगदपणे काढून ,थोडावेळ तसेच त्या पाण्याने भरलेल्या बादलीत ठेवावे. या क्रियेमुळे झाडांच्या मुळांना धक्का न लागता, त्या भोवतालची माती अलगद बाजूला झालेली दिसते.

कुंडी तयार करण्याचीदेखील एक पद्धत असते. झाडाच्या उंची नुसार कुंडी निवडावी. त्यात तळाशी योग्य आकरात भोके असावी. आजकाल अशी भोके असलेली कुंडी सहजपणे बाजारात उपलब्ध होते.

 

Kundi IM

 

या कुंडीत अर्धी माती घेऊन त्यात गरजेनुसार कोकोपीट, शेणखत, अथवा गांडूळ खत यापैकी काहीही एक मिसळून घ्या. त्यात थोडा सुका पाला-पाचोळा, बुरशीनाशक थोडी पावडर मिसळा. मगच त्यात पाण्याच्या बादलीत ठेवलेले झाड हळूवारपणे लावा. हे झाड लावताना त्याला फार दाबून लावू नका.

झाड कुंडीत लावल्यानंतर माती कुंडीत काठोकाठ भरू नका. कमीत कमी एक ते दोन इंचाची जागा मोकळी ठेवा. एका मगमध्ये पाणी घेऊन त्यात इब्सम सॉल्ट मिसळा. हे पाणी कुंडीत टाका.यामुळे एका जागेतून नव्या जागेत येताना झाडाला जो शॉक बसतो,त्याची तीव्रता या मिठाच्या पाण्यामुळे कमी होते. आणि हळूहळू ते झाड या नव्या कुंडीत रुळायला लागते.

जसे झाड कुंडीत लावण्याचे एक शास्त्र आहे ,अगदी त्याच तऱ्हेने झाडाला पाणी घालण्याची देखील एक पद्धत आहे. झाडांना कधीही बदाबदा पाणी ओतू नये. झाडांना शक्यतो स्प्रे बाटलीचा वापर करून पाणी घालावे. मगाने पाणी घालावयाचे असल्यास ,पाणी हाताने शिंपडून घालावे.

झाडांना रोज पाणी घालणे हा एक गैरसमज आहे. ऋतू नुसार झाडांना पाण्याची गरज असते. जसे उन्हाळ्यात झाडांना दोनदा पाणी द्यावे लागते. तर हिवाळ्यामध्ये एकदाच पाणी पुरेसे ठरते. पावसाळ्यात मात्र पाण्याची तितकीशी गरज भासत नाही.

 

watering plants IM

 

पाणी घालण्या आगोदर नेहमी झाडा भोवतालची माती हाताने थोडीशी खरवडून घ्यावी. जर ती ओलसर जाणविल्यास पाण्याची गरज नसते. मात्र ती हाताला कोरडी, भुसभुशीत जाणविल्यास जरूर पाणी घालावे.

कुंडीतून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत आहे ना ,हे नेहमी तपासावे. अन्यथा अति ओलसरपणामुळे झाडाची मुळे खराब होऊन ते झाड मरून जाते. यामुळेच झाडांना पाणी नेहमी योग्य प्रमाणात घालावे.

झाडांच्या गरजे नुसार त्यांना १५ दिवसातून किंवा महिन्यातून एकदा खत द्यावे. शक्यतो ऑरगॅनिक खतांचा वापर करावा. त्याचबरोबर नियमित कीटकनाशक फवारणी करावी.

वेळोवेळी पानांवर बसलेली धूळ वेट टिश्यू किवा हळदीच्या पाण्यात कापूस भिजवून त्याने साफ करावी. यामुळे पाने तकतकीत तर होतात. शिवाय त्यांना श्वास घ्यायला चांगली जागा मिळते. यामुळे झाडांची वाढ चांगली होते.

 

dust on plant IM

 

नवीन आणलेले झाड हे लहान बाळासारखे असते.त्याची योग्य रीतीने कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता काळजी घेतली तर ती अधिक चांगल्या प्रकारे वाढतात. आणि आपल्या मनाला देखील आनंद देतात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?