' काल-परवाचे रस्ते वाहून गेले, मात्र शिवरायांनी बांधलेला हा पूल आजही अभेद्य आहे – InMarathi

काल-परवाचे रस्ते वाहून गेले, मात्र शिवरायांनी बांधलेला हा पूल आजही अभेद्य आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावसाळा आणि रस्त्यातील खड्डे यांचं नातं अबाधित आहे. रस्त्यांची उडालेली चाळण आणि जीव मुठीत धरून, हाडं खिळखिळी झालेले प्रवासी या चित्राला कोणतंही शहर अपवाद नाही.

 

roads inmarathi

 

नुकतचं काम पूर्ण झालेल्या रस्त्यांनाही पावसाळ्यात खड्डे पडतात, तर कधी नव्याने बांधलेला ब्रीज भर पावसात कोसळतो, अर्थात शासनाकडून या सर्वांचं खापर बिचाऱ्या पावसावर फोडलं जातं, मात्र शिवरायांच्या स्वराज्यात उभारलेल्या एका पुलाच्या बाबतीत हे सारे नियम फिके पडतात. ३५० वर्षांपेक्षाही अधिक काळ उभ्या राहिलेल्या या पुलाने आजवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती झेलल्या तरिही या पुलाचं स्थान अढळ आहे…अगदी आपल्या मनातील शिवरायांच्या स्थानासारखंच!

प्रतापगडच्या पायथ्याशी कोयना नदीवर आजही दिमाखाने उभा राहिलेला हा पूल म्हणजे आजकालच्या तंत्रज्ञांसाठी एक कोडंच आहे.

राज्यांची दूरदृष्टी

सुमारे ३५० वर्षांपुर्वीचा काळ! प्रतापगडाचं बांधकाम करण्याचा शिवरायांचा मानस होता. मात्र त्याच्याभोवती असलेलं जावळीचं खोरं म्हणजे अशक्यवाट!

अत्यंत गुंतागुंतीच्या या खोऱ्यात कधी वन्यप्राण्यांचा धोका होता, तर कधी वादळी वारे, पाऊस आणि त्यामुळे कोयनेस येणाऱ्या पुराचा. एकदा कोयना नदीे रौद्ररूप धरण केलं की प्रवासाला विश्रांती द्यावी लागायची. पाऊस थांबून पाणी ओसरेपर्यंत वाट पहावी लागायची. मात्र स्वराज्याच्या कार्यात एक क्षणही वाया घालवणं महाराजांना मान्य नव्हतं.

 

shivaji maharaj inmarathi

 

कोणत्या वेळी शत्रु आक्रमण करेल याची शाश्वती नसल्याने वेल न दवडता प्रतापगडाचं काम पूर्ण करण्याचा महाराजांचा विचार होता. मात्र जावळीच्या खोऱ्यापासून प्रतापगडाकडे जाणारा वेगळा मार्ग असावा अशी कल्पना त्यांना सुचली.

ही कामगिरी त्यांनी विश्वासातील स्थापत्यकलेतील कुशल कामगार अर्जोजी यादव यांच्या खांद्यावर सोपवली.

पुलाचं काम सुरु झालं, पण…

महाराजांच्या आदेशाप्रमाणे सेतू बांधणीचं काम वेगात सुरु झालं, मात्र ही खबर आदिलशहाला समजली. हा सेतू बांधला गेला तर मराठ्यांचा प्रतापगडापर्यंतचा प्रवास सुकर होईल ही बाब त्यांनी जाणली.

हे काम पूर्ण होऊ नये यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले. फितूर स्थानिकांना हाताशी धरून त्यांनी बांधकाम प्रमुख अर्जोजी यादव याला त्रास देण्यास सुरुवात केली. यादव कुटुंबाला पकडून नेण्याचा बेतही त्याने आखला, मात्र महाराजांच्या हूशार हेरखात्याला याची चाहूल लागल्याने त्यांनी यादव कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी नेलं, आणि धोका टळला.

स्थापत्य शास्त्राचा अप्रतिम नमुना

आपल्याकडे काल – परवा बांधलेल्या रस्त्यांची चाळण होते, पुल कोसळतात, तर कधी इमारती जमिनदोस्त होतात. मात्र शिवरायांच्या स्वराज्यात बांधला गेलेला हा पूल आजही भक्कमपणे उभा आहे.

 

brigde im

 

सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर हा पूल उभा असून ३५० वर्षाहून अधिक काळापुर्वी बांधलेल्या या पुलाला आजपर्यंत एकही तडा गेलेला नाही. आजर्यंत या पुलाचं कधीही बांधकाम किंवा डागडुजीही केली गेलेली नसल्याचं इतिहासतज्ञ सांगतात.

या पुलाची एकूण लांबी ५२ मीटर असून रुंदी ८ मीटर आहे. महत्वाची बाब म्हणजे हा संपूर्ण पुल केवळ चुन्याचा वापर करून उभारण्यात आला आहे. मात्र तरिही या पुलाने आजपर्यंत कधीही धोका दिलेला नाही.

सुरुवातीला घोड्यांच्या टापा झेलणारा हा पुल आज अमेक गाड्यांचे घाव सहन करतोय, मात्र तरिही त्याची साथ कायम आहे.

त्यानंतर ब्रिटीशांनीही आपल्या कार्यकाळात पुल, रस्ते बांधले, मात्र काळाच्या ओघात त्यातील काहींचीही दुरावस्था झाली. सध्याच्या बांधकामांची तर बिकट अवस्था आपण ‘याची देही याची डोळा’ अनुभवतोय, मात्र अशा परिस्थितीत महाराजांची दुरदृष्टी, कुशल कलाकारांची निवड आणि कोणतंही साधन नसताना महाराजांच्या कल्पनेतील सेतू साकारणारे कर्तबगार तंत्रज्ञ यांचं महत्व अधिक अधोरेखित होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?