' तर ईलॉन मस्क बरोबर भारतीय अंतराळ वीर अवकाशात गेले असते…! – InMarathi

तर ईलॉन मस्क बरोबर भारतीय अंतराळ वीर अवकाशात गेले असते…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय वैज्ञानिक नंबी नारायण यांच्या जीवनावर बेतलेला ‘rocketry : the nambi effect’ नावाचा सिनेमा माधवन प्रेक्षकांसाठी घेऊन आला. भारताच्या अंतराळ विश्वात मोठं योगदान देऊनही कित्येक यातना झेलणाऱ्या या वैज्ञानिकावर हा सिनेमा बेतलेला असून माधवन यात खुद्द मुख्य भूमिकेत दिसला. शिवाय या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील त्याच्याच खांद्यावर होती.

या सिनेमामुळे खरे नाम्बी नारायण पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेत. गेली कित्येक वर्ष त्यांनी अन्याय सहन करून सुद्धा जिद्देने ते ठाम होते अखेर कोर्टला देखील हे मान्य करावं लागलं. नुकतंच त्यांनी रिपब्लिक वर्ल्ड माध्यमाला  मुलाखतीत रॉकेट सायन्स या विषयाबद्दल आपलं मत मांडलं आहे, ते नेमकं काय म्हणले आहेत ते जाणून घेऊयात…

 

rocketry IM

रिपब्लिकचे फायरबॅन्ड संपादक अर्णब गोस्वामी यांनी नाम्बी नारायण यांची मुलाखत घेतली. नाम्बी नारायण यांनी यात विस्तृतपणे उत्तर दिली आहेत,

त्या वादात अडकले नसते तर…

कुठल्या ही मुलाखतीत असा एक मुद्दा असतो जो सर्वात जास्त रंगतो, नाम्बीच्या सरळ वाटेवर चालणाऱ्या आयुष्यात जेव्हा तो क्षण आला त्याबद्दल त्यांनी मनमोकळपणाने सांगितलं की क्रायोजेनिक इंजिन डेव्हलपमेंट प्रकल्प जर विना अडथळा राहिला असता तर आज तर आमच्यकडे खूप आधीच शक्तिशाली अशी प्रक्षेपण क्षमता असती.

आमच्या बनवलेल्या वेळापत्रकानुसार आणि अंदाजानुसार १९९९ ते २००० पर्यंत क्रायोजेनिक तंत्रज्ञान पूर्ण केलं असतं. जर १९९४ मध्ये ही समस्या झाली नसती आणि रशियन करार झाला असता तर आम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय क्रायोजेनिक तंत्रज्ञान मिळाले असते.

सिनेमा ज्यांनी बघितला आहे अथवा ज्यांनी नाम्बी नारायण यांच्याबद्दल वाचलं असेल तर त्यांना कळलं असेल त्या वादाबद्दल, १९९४  साली नाम्बी यांच्यावर पाकिस्तानला रॉकेट सायन्सबद्दलची काही सिक्रेट्स सांगितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

 

nambi narayan inmarathi

 

क्रायोजेनिक तंत्रज्ञान उशिरा येण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं कि अमेरिकेने भारत आणि रशिया मध्ये जो १९९१ मध्ये दोन क्रायोजेनिक इंजिन आणि तंत्रज्ञान खरेदीचा जो करार झाला होता त्यात हस्तक्षेप केला. अमेरिकेचा असा विश्वास होता की इसरो या तंत्रज्ञानाच वापर आण्विक शस्त्रास्त्र बनवण्यासाठी करत आहे.

१५ वर्षानंतर म्हणजे २०१४ साली भारताचं स्वप्न पूर्ण झालं. २००३ साली याची पहिली चाचणी करण्यात आली होती मात्र ११ वर्षांनंतर संपूर्ण स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिनसह रॉकेट उडवण्यात आले. ते पुढे असंही म्हणाले की सॅटेलाइट इंडस्ट्रीला तेव्हा ३०० अब्ज डॉलर इतकी मोठी बाजारपेठ होती. २००० दशकाच्या सुरवातीलाच इसरोने उच्च पेलोड वाहून नेण्याची क्षमता विकसित केली असती तर संपूर्ण बाजाराचा मोठा भाग भांडवलावर ठेवता आला असता.

चांद्रयान मिशन मंगळ टाईपास प्रोजेक्ट्स होते?

भारताच्या आंतरग्रहीय महत्वाकांक्षेबद्दल बोलताना नाम्बी असं म्हणले की इसरोचे माजी अध्यक्ष सतीश धवन यांनी केवळ उपग्रहांवर लक्ष केंद्रित केलं, ग्रहांवरील मोहीम पुढच्या पिढीकडे सोपवल्या. त्यांच्या मते चांद्रयान आणि मिशन मंगलच हे टाईमपास प्रोजेक्ट्स म्हणून होते कारण या प्रकल्पांसाठी मोजलेली रक्कम अगदीच तुटुपुंजी होती.

चांद्रयान आणि मिशन जरी टाईपास प्रोजेक्ट म्हणून बघितलं असलं तरी आम्ही ते नेटाने पार पाडले. तसेच गगनयन मिशनद्वारे इसरो एका भारतीय अंतराळवीराला अवकाशात पाठवणार होतो, हे मिशन आतापर्यंत पूर्ण झालं असत आणि आम्ही एलोन मस्क आणि अवकाश पर्यटनात ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी स्पर्धा करू शकलो असतो.

 

Saraswati-astronomers InMarathi

“ISRO ने देखील हिंदू पंचांग वापरलं होतं” : आर माधवनच्या वक्तव्यामागचं वास्तव!

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या अंतराळातील सफरीविषयी…!

 

नाम्बी नारायण यांच्या या मुलाखतीवरून स्वदेस सिनेमातली शाहरुखचा मोनोलॉग आठवल्याशिवाय राहत नाही. ज्यात तो असं म्हणतो अमेरिका आपल्या बळावर पुढे गेली आहे आणि आपण मात्र जातीपातीवरून एकमेकांशी भांडत बसतो. आज भारताने अवकाश संशोधनात जी काही कामगिरी केली आहे ती कौतुकास्पद आहेच मात्र हीच कामगिरी काही वर्षांपूर्वी झाली असती मात्र विकसित देशांचा वरचढपणा, स्वकीयांची हतबलता यामुळे मागे पडलो हे नक्की…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?