' पाऊस कितीही पडो, दरवर्षी हमखास पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातल्या भिडे पुलाची गोष्ट...

पाऊस कितीही पडो, दरवर्षी हमखास पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातल्या भिडे पुलाची गोष्ट…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावसाळ्यामध्ये पूल पाण्याखाली गेला की प्रचंड पाऊस झाला असं मानलं जातं. पण याला ‘भिडे पूल ‘ अपवाद आहे. जेव्हा खडकवासला धरणातून पाणी सोडलं जातं तेव्हा नाल्याच्या रूपातली नदी आपल्या मूळ रूपात येते आणि नदीपात्रात साधारण १०-१२ फुट उंचावर असणारा हा भिडे पूल पाण्याखाली जातो. अशा या जगात भारी आणि पुणेकरांच्या अस्मितेचा विषय बनलेल्या भिडे पूलाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

पूर्वी एका गावाहून दुसर्‍या गावी जायचे असेल आणि वाटेत नदी लागत असेल तर ती पार करण्यासाठी होडी, नाव अथवा पोहून जाणे हेच पर्याय असायचे. नंतर पूल बांधणीचा शोध लागला आणि वाहतूक किंवा प्रवास करण्यामध्ये वाढ झाली.

पूर्वी बांबू, फळ्या किंवा दोरखंड यांच्या सहाय्याने हे पूल तयार केले जात असत नंतर मात्र ते कायमस्वरूपी बांधण्यात येऊ लागले. आता तुम्ही म्हणाल हे पूलपुराण कशासाठी ? तर ते ही एका पूलासाठीच बर…ते ही जगप्रसिद्ध पुण्याच्या जगात भारी अशा पूलासाठी!

हा पूल म्हणजे आख्या पुण्याच्या आणि जातिवंत पुणेकराच्या अभिमानाचा विषय असलेला ‘भिडे पूल’ होय. आता तुम्हाला समजलं असेलच की काय विषय आहे तो!!

 

bhide 1

 

तर मित्रांनो काही पूल नदीवर, काही ओढे, नाले यांच्यावर बांधले जातात तर काही नातीही जोडतात. काही पूल संस्कृती जोडतात तर काही दोन विषम वर्गातील अंतर मिटवतात.

जिमखाना परिसरातून पेठांमध्ये जाण्यासाठी पूर्वी नदी परिसरात चार कॉजवे होते. हे कॉजवे पूर्वी लकडी पूल आणि आता संभाजी पूल म्हणून ओळखल्या जाणार्‍या पूलाच्या दुतर्फा होते. एका बाजूला गरवारे कॉलेज आणि पांचळेश्वर तर दुसरीकडे पूलाची वाडी आणि आताचा भिडे पूल असे ते कॉजवे होते. पण हळुहळू लोकसंख्या वाढत गेली तसतसा पुण्याचा आकार देखील वाढत गेला.

वर्दळ वाढली तशी वाहतूक वाढली आणि कॉजवेना पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं होऊ लागलं. यासाठी संभाजी पूलाच्या एका बाजूला पूना हॉस्पिटलकडे जाणारा नवीन पूल बांधला गेला आणि दुसर्‍या बाजूला इंग्रजी ‘Z’ आकाराचा पूल बांधण्यात आला, जो केवळ दुचाकीस्वारांसाठी होता.

पण झालं असं की या पूलावरून प्रवास करताना पेठांना वळसा घालावा लागत असल्यानं त्याऐवजी भिडे पूलाच्या जागी असणार्‍या कॉजवेचा लोक मोठ्या प्रमाणात वापर करू लागले. त्याने त्या कॉजवे वरील वर्दळ वाढली.

 

bhide pool 1 im

 

मग कॉजवे च्या जागी एक छोटा पूल बांधला जावा ही मागणी जोर धरू लागली. नारायण पेठेचे तत्कालीन नगरसेवक विकास मठकरी यांनी ही मागणी लावून धरली. अखेर १९९६ मध्ये कॉजवे पाडून त्याजागी एक छोटा पूल बांधण्यात आला. तोच आत्ताचा ‘भिडे पूल’!

१४ जून २००० रोजी त्यावेळचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते नितिन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आलं होतं. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व जनसंघाचे नेते बाबा भिडे यांचं नाव या पूलाला देण्यात आलं.

पाणी आणि  भिडे पूल

पुण्यात फारसा पाऊस पडत नाही ही मुंबईकरांची टिका गेल्या काही वर्षांपासून खोटी ठरत आहे. मुंबई इतकीच पुण्यातही पावसाची दमदार बॅॅटिंग हल्ली पहायला मिळते.

मात्र नेमका पाऊस किती पडला याचं उत्तर म्हणजे भिडे पूल! हा पूल पाण्याखाली गेला की पुणेकर भरपूर पाऊस पडल्याचं जाहीर करतात. मग शहरातील तरुणाई, हौशी मंडळी पाण्याखाली गेलेला भिडे पुल पहायला गर्दी करतात.

अर्थात पुण्यात नविन असलेल्या मंडळींना ”अख्खा पूल पाण्याखाली गेला” ही बाब पहिल्यांदा ऐकताना भितीदायक वाटू शकते, मात्र एकदा तुम्ही हा पूल प्रत्यक्ष पाहिलात की तुमची सगळी भिती दूर होईल, कारण अत्यंत लहान उंचीचा पूल पाण्याखाली जाणं ही बाब मुंबईकर, नाशिककर यांना नवी नाही,

 

bhide brigde im

 

शॉर्टकट ची हौस सगळ्यांनाच असते. आजच्या वाहत्या पुण्यात तर सेकंदा-सेकंदाचा वेळ वाचवायचा प्रयत्न होतो. त्यामुळे भिडे पूलासारखा एखादा शॉर्टकट धावणार्‍या पुणेकरांमध्ये प्रसिद्ध झाला नाही तर नवलच नाही का?

तुमच्या शहरातील असाच एखादा प्रसिद्ध रस्ता, पूल, चौक आहे का? ज्याला स्वतःचा इतिहास आहे. असेल, तर आम्हाला त्याचं नाव नक्की कळवा. त्याचा इतिहास जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?