' AK47 च्या जमान्यात या गावात मात्र धनुर्विद्या शिकणाऱ्यांची भली मोठी फौज तयार होतीय

AK47 च्या जमान्यात या गावात मात्र धनुर्विद्या शिकणाऱ्यांची भली मोठी फौज तयार होतीय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

धनुष्य बाण म्हटलं की आपल्याला आठवतात ते म्हणजे प्रभू श्रीराम, अर्जुन आणि एकलव्य हे सर्वश्रेष्ठ धनुर्धर. पूर्वी युद्धात धनुष्य बाण, तलवार यांचा सर्रास वापर होत असे. आता काळ बदलला. युद्धात बंदुका, रणगाडे, मिसाईल्स यांचा वापर केला जातो.

धनुर्विद्या आता केवळ क्रिडास्पर्धात स्पर्धा प्रकार म्हणून घेतली जाते. पण ही विद्या जिवंत राहावी म्हणून एक गाव आजही धनुर्विद्या शिकवतंय. आज त्याच गावाची माहिती आपण सविस्तरपणे आजच्या लेखातून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया!

छत्तीसगड मधील बिलासपुर जिल्ह्यात असलेले असलेल्या या खेड्याचे नाव शिवतराई. हे गाव आदिवासी लोकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. केवळ दिड हजार लोकसंख्या असलेलं हे गाव. या गावाच्या चारही बाजूना घनदाट जंगल आहे.

 

shivtarai IM

 

अतिशय दुर्गम असलेला हा भाग लोकांना फरसा माहीतपण नाही. पण आजकाल हे गाव प्रसार माध्यमातील एक बातमी बनून राहिले आहे. काय आहे याचं कारण? याचं कारण म्हणजे तिथे दिले जाणारे धनुर्विद्येचे प्रशिक्षण.

गेल्या अनेक पिढ्या शिवतराई येथे तरूण मुले आणि मुलींना ही धनुर्विद्या शिकवतात. अगदी लहानपणापासूनच मुलांना तिरंदाजी शिकवली जाते. मुलगा आहे की मुलगी हा भेदभाव न करता हे प्रशिक्षण दिले जाते.

त्यांचे प्रशिक्षक इतवारी राज हे मुला-मुलीना प्रशिक्षण देतात. आणि त्यांनी नुसते प्रशिक्षण दिले नाही तर कितीतरी उत्तम धनुर्धारी विजेते तयार केले आहेत. ५०० पेक्षा अधिक मुलांना प्रशिक्षित करून त्यांनी जवळपास १८६ पदकं जिंकली आहेत, त्यापैकी ५० धनुर्धर देशपातळीवर ओळखले जातात.

या गोष्टीची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. आणि धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरु करायचा निर्णय घेतला आहे.याचा उपयोग करून अशा खेड्या पाड्यात असलेले तरूण केवळ योग्य प्रशिक्षणाच्या अभावी पुढे पोहोचू शकत नाहीत. पण या प्रशिक्षण केंद्रात असे तरुण तयार करून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा इरादा आहे.

शिवतराई येथील ग्रामस्थांची इच्छा आहे की, आपल्या गावातून आंतरराष्ट्रीय पातळीवर धनुर्धारी तयार व्हावेत. आणि ऑलिम्पिकसारखी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत आपल्या गावातील मुले मुली पोहचाव्यात. कारण ऑलिम्पिक म्हणजे जगातील उत्तमातील उत्तम असलेल्या लोकांमध्ये असलेली स्पर्धा होय.

 

archery 2 IM

 

त्यामुळे येथे मिळालेले पदक हे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे या गावात आजवर घरटी एक तिरंदाज तयार झाला आहे. हे प्रशिक्षण देणारे इतवारीराज हे स्वत: एक उत्तम खेळाडू आहेत. त्यांना स्वत:ला अनेक खेळत गती आहे.

कबड्डी, तिरंदाजी आणि धावणे या क्रिडाप्रकारात त्यांनी खूप कौशल्यपूर्ण कामगिरी केली आहे. ते स्वत: पोलिस दलात नोकरी करतात. आजवर त्यांनी जे शेकडो विद्यार्थी प्रशिक्षित केले ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. त्यामुळे शिवतराई या गावाला आजूबाजूचे लोक चँपियन लोकांचे गाव अशी ओळख मिळाली.

हा भाग आदिवासी बहुल आहे. पूर्वी या गावतील लोक शिकारीसाठी धनुष्यबाण वापरायचे. पुढे शिक्षणाचा प्रसार झाला तसे इतरत्र जे होते तेच इथेही झाले. लोक शिकतात आणि आपल्या परंपरा विसरतात. त्यासाठी ही धनुर्विद्या नामशेष होऊ नये यासाठी इतवारीराज यांनी पुढाकार घेऊन मुलांना प्रशिक्षण द्यायचा विडा उचलला.

२००४ साली इतवारीराज यांनी आपल्या पगारातून चार मुले आणि चार मुली यांना धनुर्विद्या शिकवायला सुरु केले. वास्तविक धनुर्विद्या शिकवण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य पण त्यांच्यकडे नव्हते. पण त्यावेळचे तेथील कलेक्टर त्यांच्या मदतीला आले. पण पुढे जशी विद्यार्थ्यांची संख्या वाढली तसे ते पण कमी पडू लागले.

मग कर्ज घेऊन त्यांनी ते प्रशिक्षण सुरु केले. हळूहळू इतर मुले पण ते पाहून त्यांच्याकडे धनुर्विद्या शिकायला येऊ लागली. इतवारीराज यांनी त्या मुलांना देखील प्रशिक्षित केले. त्या गावातील जवळपास २५० मुले मुले ही उत्तम धनुर्धर आहेत. आणि देशपातळीवर त्यांची तीच ओळख आहे.

 

archery 3 IM

 

ही गोष्ट हळूहळू सरकारला पण समजली. इतवारी राज यांची मेहनत आणि मुलांची तयारी पाहून सरकारने खेलो इंडिया लघु केंद्र हे ट्रेनिंग सेंटर सुरु केले. आणि खेळाशी संबंधीत सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या गेल्या.

या धनुर्धर मुलांना याच धनुर्विद्येने सैन्यात नोकरी मिळाली असून छत्तीसगडचा तिरंदाजीत दिला जाणारा सर्वात मोठा सन्मानसुद्धा यापैकी धनुर्धर मुलांना मिळाला आहे.

सध्या येथे ७० मीटर चा सामना खेळला जातो. पण यापेक्षा जास्त मोठे म्हणजे १०० मीटर चा सामना खेळण्यासाठी मैदान आवश्यक आहे. आणि लवकरच ते होऊन जाईल.

हे सारे पाहिले की एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे इच्छा तिथे मार्ग असतो, त्यासाठी तुम्ही कुठे राहता, कोणत्या जातीत जन्मला आहात, कोणत्या प्रदेशात आहात यातील एकही गोष्ट आडवी येत नाही.

तुम्ही आकाशाला गवसणी नक्की घालू शकता. शिवतराई येथील धनुर्धरांनी ही गोष्ट आपल्या उदाहरणाने सिद्ध करून दाखवली आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?