' गरोदरपणात ही लक्षणं दिसत असली तर वेळीच व्हा सावध अन्यथा…. – InMarathi

गरोदरपणात ही लक्षणं दिसत असली तर वेळीच व्हा सावध अन्यथा….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मातृत्व हे स्त्रीला मिळालेलं वरदान आहे. मुलाला जन्म देणं ही सृजनाची प्रक्रिया आहे. जेव्हढी ती वेदनादायक तेवढीच आनंदीही आहे. पण आपला अंश किंवा नवीन जीव जन्माला घालणं खरंच खूप जबाबदारीचं काम आहे.

गरोदरपणात शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. हे बदल ज्या प्रमाणे शारीरिक असतात त्याचप्रमाणे मानसिकही असतात.

गर्भाशयातील गर्भाची वाढ व तुमच्या शरीरातील मेटॉबॉलिजम व हॉर्मोन्सच्या पातळीतील वाढ ही एकाच वेळी होत असते. रक्तातील हॉर्मोन्सची पातळी वाढते ज्याला (human chorionic gonadotropin HCG) असं म्हणतात. मात्र गरोदरपणातील प्रत्येक महिलेची लक्षणं ही वेगवेगळी असू शकतात.

 

pregnant inmarathi

 

काही महिलांना गरोदरपणात खूप त्रास होतो तर काहींना होत नाही. बरेचदा काही कारणांमुळे गर्भपाताचा धोका निर्माण होवू शकतो.

जर काही विशिष्ट लक्षणं दिसू किंवा जाणवू लागली तर लगेच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. कोणती आहेत ही लक्षणे?

गर्भारपणात खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, ताबडतोब रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात गेले पाहिजे.

योनीतून रक्तस्त्राव, अस्पष्ट दृष्टीसह तीव्र डोकेदुखी, ताप आणि अंथरुणातून उठताना खूप अशक्तपणा, ओटीपोटात तीव्र वेदना, ताप, बोटं, चेहरा आणि पाय सुजणं
असेही काही त्रास जाणवू लागले तरी आधी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण या लक्षणांचा प्रवास कधीकधी गर्भपातापर्यंत जातो.

 

vomating im

 

स्त्री शरीरात पेशींचे विभाजन होवून नवीन जीव जन्माला येत असतो. अशावेळी शरीरात होणार्‍या ब्दालामुळे शरीर त्या परकीय पेशींना शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते. त्यातून चक्कर येणं, ताप येणं, उलट्या होणं या सोबतच ब्लीडिंग होणे यासारखे त्रास सुरू होतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जर हे त्रास कमी प्रमाणात असतील तर कालांतराने ते नाहीसे होतात पण जर असे झाले नाही तर मात्र कोंप्लीकेशन्स वाढू स्शकतात. तेव्हा जर गर्भधारणेदरम्यान खाली दिलेली लक्षणे आढळलीतर वेळ न घालवता लगेच वैद्यकीय मदत घ्यावी. ही आहेत ती लक्षणे :

१. रक्तस्त्राव :

गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव म्हणजे वेगवेगळ्या समस्या! तुम्हाला खूप रक्तस्त्राव होत असेल आणि तुम्हाला ओटीपोटात तीव्र वेदना होत असेल आणि गर्भधारणेच्या सुरवातीच्या तीन महिन्यात सतत चक्कर येत असेल तर ते एक्टोपिक गर्भधारणेचे लक्षण असू शकतं.

एक्टोपिक गर्भधारणा, जी गर्भाशया व्यतिरिक्त कुठेतरी फलित बीज रोपण केल्यावर उद्भवते, जी जीवघेणी असू शकते.

 

tortured Pregnant InMarathi

 

क्रॅम्पिंगसह रक्तस्त्राव हे देखील पहिल्या किंवा दुसऱ्या तिमाहीत गर्भपाताचे लक्षण असू शकते.

२. तीव्र मळमळ आणि उलट्या :

जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा होणारी मळमळ खूप सामान्य आहे . मात्र तुम्ही काहीही खाऊ किंवा पिऊ शकत नसाल तर मात्र ते धोकादायक असू शकते कारण यात डिहायड्रेशन होण्याचा धोका निर्माण होतो.

कुपोषण आणि निर्जलीकरणामुळे तुमच्या बाळाला हानी पोहोचू शकते. तेव्हा जर तुम्हाला गंभीर मळमळ आणि उलट्या होत असतील तर, तुमच्या डॉक्टरांशी बोला म्हणजे ते काही औषधे लिहून देऊ शकतात किंवा तुमचा आहार बदलण्याचा सल्ला देऊ शकतात.

३. बाळाची हालचाल बंद होते :

जर तुम्ही २८ आठवड्यांपेक्षा कमी काळात गरोदर असाल, तर तुमच्या बाळाच्या हालचाली अनियमित असण्याची शक्यता आहे परंतु २८ आठवड्यांनंतर, बहुतेक बाळं, त्यांच्या आईला जाणवेल अशी वारंवार हालचाल करत असतात. या टप्प्यावर, तुमच्या बाळाच्या सर्व हालचाली पहाता जर तुमच्या लक्षात आले की तुमचे बाळ नेहमीपेक्षा कमी हालचाल करत आहे किंवा अजिबात नाही; तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

pregnant woman inmarathi

 

अशावेळी डॉक्टरांकडून तुम्हाला काही सूचना दिल्या जाऊ शकतात किंवा तुम्हाला निरीक्षणासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

४. जर तुमच्या रक्तातील साखर खूप जास्त किंवा खूप कमी असेल :

गर्भधारणेदरम्यान अनेक स्त्रियांना गर्भावस्थेतील मधुमेहाचे निदान होतं. तुमच्या रक्तातील साखरेचे निरीक्षण करणे आणि तुमच्या इन्सुलिनचा वापर सांगितल्याप्रमाणे करणं फार महत्वाचं आहे.

सर्व प्रकारचा मधुमेह असलेल्या महिलांसाठी गर्भधारणेदरम्यान गंभीर धोके असतात. गर्भावस्थेतील मधुमेह ओळखणं आणि त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे कारण यामुळे आई आणि बाळासाठी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

 

blood test InMarathi

 

तुमच्या रक्तातील साखर अपेक्षित मर्यादेच्या बाहेर पडल्यास तुमच्या डॉक्टरांशी लगेच बोला.

५. जर तुम्हाला अचानक ओटीपोटात तीव्र दुखत असेल :

जरी गरोदरपणात ओटीपोटात दुखणं, आकुंचन, स्नायू दुखणं किंवा अगदी बद्धकोष्ठतेमुळे तुमचे पोट दुखत असले तरी तुम्हाला अचानक तीव्र वेदना होत असतील तर ते बाळाची नाळ तुटण्याचं किंवा गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड वेळेआधीच उघडले जाण्याचं लक्षण असू शकतं.

 

stomach inmarathi
thehealthsite.com

 

ज्यामुळे आई आणि बाळ दोघांचाही जीव धोक्यात येवू शकतो.

६. व्हाईट डिस्चार्ज :

अम्नीओटिक द्रवपदार्थ ज्यामध्ये तुमचे बाळ गुंडाळलेले असतं ते तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. जर गर्भाशयातील पाणी खूप लवकर फुटलं तर तुम्ही आणि तुमचे बाळ दोघांनाही धोका असतो. मातांसाठी, धोकादायक संसर्ग होण्याचा धोका असतो.

बाळांसाठी, वाढ आणि विकास, अकाली जन्म आणि मृत्यूचा धोका असतो.

जर तुम्हाला तुमच्या योनीतून अचानक पाणी वाहू लागल्याचे जाणवले तर, पुढील प्रक्रियेसाठी तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

७. सतत तीव्र डोकेदुखी, ओटीपोटात दुखणे, व्हिज्युअल अडथळे आणि सूज :

सतत तीव्र डोकेदुखी, ओटीपोटात दुखणं, व्हिज्युअल अडथळे आणि सूज हे ‘प्रीक्लेम्पसिया’ चं लक्षण असू शकतं. ही एक गंभीर स्थिती आहे जी गर्भधारणेदरम्यान विकसित होते आणि संभाव्य प्राणघातक असते.

 

headache inmarathi

 

हा विकार उच्च रक्तदाब आणि तुमच्या लघवीतून बाहेर पडणार्‍या अतिरिक्त प्रथिनाद्वारे समजतो, जो सामान्यत: गर्भधारणेच्या २० व्या आठवड्यानंतर होतो.

तुमच्या डॉक्टरांना लगेच संपर्क करा आणि तुमचा रक्तदाब तपासा. चांगली प्रसूतीपूर्व काळजी प्रीक्लॅम्पसिया लवकर शोधण्यास मदत करू शकते.

८. फ्लूची लक्षणे

तज्ञांचं असं म्हणणे आहे की गर्भवती महिलांनी फ्लूची लस घेणं महत्त्वाचे आहे कारण फ्लूच्या हंगामात इतर स्त्रियांपेक्षा गर्भवती महिलांना आजारी पडण्याची आणि फ्लूमुळे गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. तापामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होवू शकतो.

 

pregnant lady corona inmarathi 1

 

त्यामुळे जर गर्भवती स्त्रीमध्ये वरील काही लक्षणे आढळली तर लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?