' जपान तयार करतोय थेट चंद्रापर्यंत नेणारी बुलेट ट्रेन! – InMarathi

जपान तयार करतोय थेट चंद्रापर्यंत नेणारी बुलेट ट्रेन!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून ज्या ज्या प्रकल्पांना ठाकरे सरकारने स्थगिती दिली होती त्याच प्रकल्पांना शिंदे सरकारने परवानगी दिली आहे. मेट्रो कारशेड हा त्यातील एक वादग्रस्त प्रकल्प तर दुसरा म्हणजे बुलेट ट्रेन. आज भारतासारख्या विकसनशील देशाने आंतरळात प्रगती केली आहे मात्र आपले प्रवास वेगवान झालेले नाहीत.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला पहिल्यापासूनच मोठया प्रमाणावर विरोध होताना दिसून आला आहे. बुलेट ट्रेनची गरज काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहेच. मात्र एका देशाने थेट अंतराळात जाण्यासाठी बुलेट ट्रेनची योजना आखली आहे.

आज आर माधवनच्या रॉकेट्ररी सिनेमाचं कौतुक होत आहे. नाम्बी नारायण सारख्या शास्त्रज्ञानाने जेव्हा ईसरो सारखी संस्था अगदी पाळण्यात होती तेव्हा परदेशात जाऊन रॉकेट सायन्सचा अभ्यास केला जेणेकरून भारतसारखा देश देखील मंगळावर जाऊ शकतो. इतर देश तर अंतराळात एक नवं विश्व तयार करण्याच्या इराद्यात आहे.

 

rocketry IM

 

जपानसारखा देश आज तंत्रज्ञान क्षेत्रात जगाच्या पुढे गेलाय हे आपण बघत आलोच आहोत. आता याच देशाने थेट चंद्र, मंगळ आणि पृथ्वी यांना जोडणारी एक ट्रेन तयार करण्याच्या मार्गावर आहेत. काय आहे नेमकी त्यांची योजना जाणून घेऊयात…

क्योटो विद्यापीठातील संशोधक काजिमा कंस्ट्रक्शनच्या मदतीने एक कृत्रिम अंतराळ तयार करणार आहेत तसेच पृथ्वी आणि चंद्रामध्ये एक ट्रेनरुपी क्यूब धावेल. या टीमने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अंतराळात शहर वसवण्यासाठी एक काचेचं स्ट्रक्चर विकसित करण्यात येणार आहे. कमी गुरुत्वाकर्षणात मानवी शरीर सुस्थित कस राहू शकेल आणि त्याचबरोबरीने मानवी शक्ती कमी होणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

 

bullet train im

 

या काचेच्या क्यूबमध्ये पृथ्वीवर जसे गुरुत्वाकर्षण आणि वातावरण असतं तसंच या क्यूबमध्ये असणार आहे. या काचेमध्ये सार्वजनिक वाहुतक, हिरवे गवत पाणी यासारख्या सुविधा देखील असणार आहेत. तसंच शास्त्रद्यांचं असं म्हणणं आहे कि २०५० पर्यत हा प्रकल्प पूर्ण होईल.

हे झालं कृत्रिम अंतराळच पृथ्वी आणि चंद्रामध्ये जी ट्रेन धावणार आहे त्याबद्दल माहिती देताना ते असं म्हणाले की, षट्कोनी आकाराची ही छोटी कॅप्सूल असेल. तर मंगळ आणि चंद्रामध्ये जी ट्रेन धावेल ती यापेक्षा मोठी असेल. सहा डब्यांच्या गेजवर चालणाऱ्या या ट्रेनला स्पेस एक्स्प्रेस म्हंटल जाईल. पृथ्वीवर जे स्टेशन असेल त्याला टेरा स्टेशन असं म्हणता येईल.

 

bullet im 1

जहाज बुडाल्यास….! : बर्मुडा ट्रॅंगल सफारीसाठी दिली जातीय ही विचित्र ऑफर…!

त्यांनी अंतराळात पाठवले कबाब, त्याचं पुढे काय झालं ते एकदा बघाच…

आज एकीकडे चर्चा आहे तिसऱ्या महायुद्धाची तर दुसरीकडे प्रत्येक देश अंतराळात सुद्धा आपलं प्रस्थ निर्माण करत आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून प्रत्येक देश आपल्या क्षत्रू राष्ट्रावर लक्ष ठेवत आहे. वैज्ञानिक मात्र अंतराळात आता नवं जग निर्माण करण्याच्या मार्गावर आहेत. जपान प्रमाणेच भारत देखील काही दिवसात अशाच अचाट पद्धतीचा शोध लावेल अशी अपेक्षा करूयात…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?