' मृत्युनंतर आधार कार्ड, पॅन कार्ड या कागदपत्रांचं काय करावं? दुरुपयोग टाळायचा असेल तर हे वाचाच

मृत्युनंतर आधार कार्ड, पॅन कार्ड या कागदपत्रांचं काय करावं? दुरुपयोग टाळायचा असेल तर हे वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पॅन कार्ड असो, इलेक्शन कार्ड की आधार कार्ड… ही सर्व कागदपत्रे सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे मानली जातात. ही सर्व कागदपत्रं सरकारी ओळख म्हणून आपल्या कामी येतातच, पण याचबरोबर आपली अनेक कामंही या कागदपत्रांशी जोडलेली आहेत.

 

pan card aadhar card inmarathi

 

परंतु आपण कधी विचार केला आहे का की, जर घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर या कागदपत्रांचं काय केलं जातं? ते आपोआप रद्द होतात की जो त्याचा नॉमिनी आहे त्याला तो रद्द करावा लागतो? तसे झाले नाही तर या कागदपत्रांचे काय होत?

जर आपण या गोष्टींवर विचार केला नसेल तर आजच्या लेखात आपण याचविषयी जाणून घेणार आहोत.

आधार कार्ड, पॅन कार्ड सारखी कागदपत्रं सरकारी ओळख म्हणून काम करतात, विशेषतः आधार कार्ड अनेक सरकारी योजनांशी जोडलं गेलेलं असतं.

अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या मृत व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर करून इतर दूसरा कोणी तर सरकारी योजनांचा लाभ तर नाही घेतोय ना हेही बघणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मृतांच्या कुटुंबीयांना त्यांच्या आधारचा गैरवापर होत आहे की नाही हे ही पाहावे लागेल.

 

death in man InMarathi

 

चला तर मग जाणून घेऊया एखाद्याच्या मरणानंतर त्याच्या कागदपत्रांचे काय करावे :-

● मतदार ओळखपत्र :-

देशात जवळपास प्रत्येकाकडे मतदार ओळखपत्र असतं आणि हे एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणून ओळखलं जातं. या कार्डच्या मदतीने कोणीही आपलं मत नोंदवू शकतं.

 

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आपण याला रद्द करु शकतो. परंतु जर आपण हे रद्द केले नाही आणि ते एखाद्या चुकीच्या हातात पडलं तर निवडणुकीत बनावट मतं येण्याची भिती असते.

 

voter id process inmarathi

 

हे कार्ड रद्द करण्यासाठी तुम्हाला निवडणूक कार्यालयात जाऊन फॉर्म-७ भरावा लागेल, त्यानंतर इलेक्शन कार्ड  रद्द होईल. यासाठी मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे.

● पॅन कार्ड :-

पॅन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचा कागदपत्रं आहे. याद्वारे डीमॅट खातं, बँक खातं आणि आयकर रिटर्न भरणं इत्यादी महत्त्वपूर्ण कामं केली जातात. त्यामुळे अशी सर्व खाती पूर्णपणे बंद होईपर्यंत मृत व्यक्तीचे पॅनकार्ड आपल्या सोबत ठेवा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयटीआर भरताना, आयकर रिटर्न भरण्यापासून ते आयटी विभागाची सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पॅन कार्ड बंद करु नका.

 

pan-card-inmarathi

 

मृत व्यक्तीचा जर कोणताही कर परतावा देय यायचा असल्यास, परतावा त्याच्या खात्यात जमा होईपर्यंत वाट बघावी. बॅंक खाती बंद करण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि आयकर रिटर्नशी संबंधित सर्व बाबी हाताळल्यानंतर मृत व्यक्तीचा पॅन आयटी विभागाकडे सुपूर्द करता येऊ शकतो.

पॅन कार्ड कसं रद्द करावं?

मृताच्या वारसदाराला पॅन कार्डच्या अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. या अर्जात पॅनकार्ड रद्द करण्याचं कारण नमूद करणं गरजेचं असतं. मात्र, पॅन कार्ड रद्द करणं बंधनकारक नाही.

जर आपल्याला वाटत असेल की भविष्यात याची गरज भासू शकते तर आपण हे आपल्याजवळ ठेवू शकतो.

● आधार कार्ड

जर एखाद्याचा मृत्यू झाला तर मृत्यूनंतर आधार कार्ड रद्द करण्याची व्यवस्था सध्या तरी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत त्यांचं आधार कार्ड सुरक्षित ठेवणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे जेणेकरून त्याचा गैरवापर होणार नाही.

मृत्यूपूर्वी ती व्यक्ती आधारद्वारे कोणत्याही योजनेचा किंवा सबसिडीचा लाभ घेत असेल, तर संबंधित विभागांना त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी मृत्यूची माहिती द्यावी. त्यानंतर संबंधित योजनेतून त्या व्यक्तीचं नाव काढून टाकण्यात येतं.

 

Aadhar card Data unsafe.Inmarathi1

 

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीचं आधार लॉक केले जाऊ शकते. यासाठी, mAadhaar अॅप किंवा UIDAI वेबसाइटवर जाऊन मृत व्यक्तीचं आधार कार्ड लॉक करावं लागेल. यामुळे मृत व्यक्तीच्या मोबाईल नंबरचा गैरवापर रोखण्यास मदत होईल.

● पासपोर्ट

आधारकार्डाप्रमाणेच एखाद्या व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रियाही सध्या उपलब्ध नाही.

पासपोर्ट कालबाह्य झाल्यावर तो आपोआप डिफॉल्टर म्हणून अवैध ठरतो. यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना पासपोर्ट जवळ सांभाळून ठेवावा लागेल जेणेकरून तो कोणत्याही चुकीच्या हाती लागू नये.

 

passport 2 im

 

तर या आहे काही खबरदारी ज्या आपण घ्यायला हव्या. आपल्या घरातील व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करताना त्या व्यक्तीची महत्वाची कागदपत्र सांभाळा अन्यथा मोठ्या घोटाळ्याला विनाकारण सामोरं जावं लागेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?