' भावनाशून्य जोडीदार: अनेकांच्या या समस्येवरील हे उपाय संसार वाचवू शकतात

भावनाशून्य जोडीदार: अनेकांच्या या समस्येवरील हे उपाय संसार वाचवू शकतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अनेक स्त्रियांच्यामते त्यांचा पती हा घुम्या, त्यांच्याकडे अजिबात लक्ष न देणारा, त्यांच्या भावनांची, मनाची कदर न करणारा असतो. या कारणानं या स्त्रिया सतत दु:खी, चिडचिड्या राहू लागतात. लहानमोठ्या गोष्टींवरुन त्यांचे सतत इतरांशी खटके उडू लागतात. काहीवेळेस गोष्टी इतक्या विकोपाला जातात की पतीपत्नीतला संवादच हरवून जातो. मुलांमुळे, समाज काय म्हणेल या दडपणामुळे जबरदस्तीनं संसार ओढले जातात.

यातला जीव कधीन हरवलेला असतो आणि एक मृतवत नातं समाजाला दाखविण्यापुरतं निभावण्यावाचून पर्याय नसतो. गोष्टी या थराला जाण्यापूर्वीच काही प्रयत्न केले तर नात्याला नवसंजिवनी मिळण्याची शक्यता असते. शेवटी मृतवत नात्यात आयुष्य घालविण्यापेक्षा संवादानं मोकळेपणा आणत नकारात्मकतेचा निचरा करत आयुष्य नव्यानं सुरवात करणं कधिही चांगलंच. यासाठी काय करायला हवं?

 

Angry Indian couple Inmarathi

 

१.  मनातल्या मनात घुसमटत रहाण्यापेक्षा, उलट सुलट विचार करुन त्रास करुन घेत रहाण्यापेक्षा पतीशी शांतपणे, थेट संवाद साधा. तुमच्या भावनांचा त्याला आदर वाटतो का? तो तुमच्या भावनांचा विचार करतो का? हे थेट विचारा. बरेचदा आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असा प्रकार नात्यात घडतो. म्हणजे नाराजीचं कारण एक असतं आणि त्याचा राग इतरच गोष्टींवर निघत असतो.

मोकळ्या संवादामुळे तुमचा पती तुमच्याशी फ़टकून का वागतो आहे? तुमच्या भावनांशी का खेळतो आहे? याचं कारण शोधता येईल. सर्वात महत्वाचं म्हणजे एक चूक करणं आवर्जून टाळा, तुमचा पती तुमच्याशी फ़टकून, वाईट वागतोय म्हणून तुम्हीही तसेच वागू नका. यानं साध्य काहीच होणार नाही. उलट विसंवाद वाढत जाईल. उलट त्याच्याशी प्रेमानं वागा, त्याच्या मनात काय चाललंय हे शांतपणे समजून घ्यायचा प्रयत्न करा.

 

Husband Wife InMarathi

 

२. बरेचजणांना सवय असते की पत्नि तिच्यादृष्टीन महत्वाचं काही सांगत असेल तरिही ते लक्ष देऊन न ऐकणं किंवा त्याचा मूड असेल तरच ऐकणं अन्यथा आपल्याच जगात गुंग असणं. अशा परिस्थितीत साधारणपणे भांडणं तरी होतात किंवा पत्नी चिडून अबोला तरी धरते. याउलट त्याच क्षणी त्याला ठामपणे सांगा की तिच्यादृष्टीनं हा महत्वाचा विषय असून त्यानं तिचं ऐकायला हवंय. भावनिकदृष्ट्या पती पत्नीत “कनेक्ट” असणं फ़ार महत्वाचं असतं.

३. संयम, ही प्रत्येकच नात्याला सुखी करण्याची गुरुकिल्ली आहे. पती पत्नीच्या नात्यात तर ही सोनेरी किल्ली आहे म्हणायला हरकत नाही. लहान सहान गोष्टींवर चिडचिड करत अशांतता निर्माण करण्याऐवजी थोडा संयम राखला तर संसारातली भांडणं निम्म्यानं कमी होती. म्हणूनच कितिही राग आला तरिही तो त्याक्षणी व्यक्त करण्याची काहीच गरज नसते.

 

husband-wife-inmarathi

केवळ प्रेम, हँडसम लुक्स यापेक्षा या ९ गोष्टींच्या शोधात असतात मुली!

लग्नाआधी मुलांनी या ७ गोष्टी शिकल्या नाहीत, तर संसार सुखाचा होऊच शकत नाही!

४ सर्वात महत्वाचं म्हणजे समोरची व्यक्ती कसं वर्तन करेल हे आपल्या हातात नसतं त्यामुळे त्याच्या वर्तनाचा त्रास स्वत:ला करुन घेणं टाळा. तुम्ही या वर्तनावर कसे व्यक्त होता हे जास्त महत्वाचं आहे. स्वत:कडे लक्ष द्या, व्यायाम, प्राणायम, आहार याकडे काहीही झालं तरीही दूर्लक्ष करु नका. निरोगी शरीरात निरोगी मन वास करतं हे लक्षात ठेवा. मन शांत ठेवण्यासाठी या गोष्टींची खूप मदत होते.

अनेक स्त्रियांचं असं म्हणणं असतं की माझ्या पतीला माझ्या भावनांची कदरच नाही. अशा भावनाशून्य पतीचं मन जिंकून संसारात आनंद फ़ुलवणं हे कसरतीचं काम आहे. मनातल्या मनात धुसफ़ुसत राहून संसारात अशांतता निर्माण करण्यापेक्षा यावर शांतपणे विचार करुन मार्ग काढावा…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?