' भूक लागल्यावर हे १० पदार्थ वाट्टेल ते खाल्लेत, तरीही वजन वाढीची चिंता सतावणार नाही – InMarathi

भूक लागल्यावर हे १० पदार्थ वाट्टेल ते खाल्लेत, तरीही वजन वाढीची चिंता सतावणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणताही पदार्थ खाताना आजकाल पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे ”वजन वाढलं तर ? हा पदार्थ खाऊ की नको?” आणि यानंतर प्रश्नांची सरबत्ती सुरुच होते. ”यात किती फॅट असेल? या पदार्थात साखर आहे, हा तळकट आहे, तो तेलकट आहे. खाऊ की नको?”.

 

belly fat inmarathi

 

पण आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत की ते खाऊनही तुमचे वजन वाढणार नाही. यांना शून्य कॅलरी पदार्थ म्हणतात. कोणते आहेत हे पदार्थ? चला जाणून घेऊया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आपल्या जेवणात चौरस आहार असावा असं आहारशास्त्र सांगतं. आहार षड्रस असला पाहिजेत असा कटाक्ष असलेल्या आपल्या आहार संस्कृतीमध्ये मीठ, लिंबू, लोणचं,चटणी कोशिंबीर,भाजी आमटी भाकरी किंवा चपाती हे आपले जेवणातील पदार्थ हमखास असतात.

खारट, आंबट, तिखट, तुरट, गोड, कडू हे सगळे रस आपल्या शरीराला उपयुक्त आहेत. ते योग्य प्रमाणात खावेत असं आहारशास्त्र सांगतं. त्यामध्ये पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ हे सारं आपल्या तब्येतीसाठी चांगलं असतं.

 

thakar thali inmarathi

 

पण आजकाल या धकाधकीच्या आयुष्यात खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, बेकरी पदार्थ यांनी सगळा मामला उलटसुलट होऊन गेला आहे. आता ते सारे टाळावे यासाठी आपण झीरो कॅलरी पदार्थ खाऊन आपल्या वाढत्या वजनाला आटोक्यात ठेऊ शकतात. ते पदार्थ-

१. होममेड पनीर

 

paneer-inmarathi

 

या पनीरमध्ये कॅल्शिअम, व्हिटामिन बी, आणि फॉस्फोरस हे घटक असतात आणि त्यामुळे प्रथिनांचे प्रमाण वाढते आणि भूक कमी होते.

२. तेलबिया

तेलबिया म्हणजे अशा बिया ज्यात तेलाचं प्रमाण मुबलक असतं. त्याशिवाय त्यातील फायबर्स पचनशक्ती वाढवतात. या बिया पौष्टिक तर असतात. त्यात भरपूर प्रोटीन असतात.

 

soya seeds im

 

कलिंगडाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया या बिया वजन वाढू देत नाहीत आणि आहाराचा बॅलन्स सांभाळतात.

३. सूप्स

वजन कमी करायचं आहे पण उपाशी राहणं जमत नाही? मग तुमच्यासाठी सूप, मटणाचा रस्सा हे उत्तम पर्याय आहेत.

 

palak soup inmarathi

 

कोणत्याही घन पदार्थांपेक्षा द्रव पदार्थ हे जास्त भरतात. यामुळे तुमचं पोट भरतंच पण फार तुम्हाला योग्य प्रमाणात कॅलरीज देऊन तुमची एनर्जी राखतात. जा

डी वाढायचा धोका नाही आणि उपासमारही होत नाही.

४. मासे-

आपल्याकडे खूपदा असं म्हटलं जातं की, मासे खाणाऱ्या माणसाची बुद्धी तल्लख असते. त्याचं कारण म्हणजे माशात ओमेगा फॅटी अॅसिड आणि भरपूर प्रथिने असतात. त्यामुळे मेंदू आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहतं.

 

fish inmarathi

 

फॅटी मासे खाल्यामुळे भरपूर पोषणमुल्ये आपल्या शरीराला मिळतात. आणि प्रथिने मिळून भूक कमी होते. आणि वजनही नियंत्रणात राहतं.

५. अंडी

अंडी अतिशय आरोग्यदायी असतात. त्यात भरपूर पोषणमूल्ये असतात ती उत्तम रोगप्रतिकार शक्ती प्रदान करतात. ताकद वाढते आणि भूकही भागते.

 

eggs inmarathi

 

अंड्यामध्ये अमिनो आम्ल असते. त्यात खूप प्रथिने असतात आणि ही प्रथिने शरीराच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असतात.

६. सलाड, कच्च्या भाज्या

जेवताना आपण ज्या कोशिंबिरी करतो त्या फळभाज्या, पालेभाज्या यांच्या असतात.

काकडीची कोशिंबीर, टोमॅटोची, मुळा, गाजर अशा वेगवेगळ्या फळभाज्या आपण कोशिंबिरीसाठी वापरतो. मेथी, मुळ्याची पाने यांची पचडी करतो. सलाड करताना हेच तर सारं वापरून बनवायचं असतं.

 

 

salad inmarathi

 

तुम्ही त्यात मोड आलेली कडधान्ये वापरू शकता. किंवा नुसते मोडदेखील खाऊ शकता. त्याने तुमचं पोट तर भरेलच पण अतिरिक्त चरबी वाढायचे पण कारण राहणार नाही.

७. उकडलेले बटाटे 

उकडलेले बटाटे थोडेसे मीठ किंवा सैंधव, चाट मसाला भुरभुरवून खाल्ला की चव पण चां लागते शरीराला आवश्यक असलेली उर्जा मिळते आणि वजन वाढायचा धोका पण राहत नाही.

 

potato peels inmarathi2
1mhealthtips.com

 

कारण त्यात व्हिटामिन स्टार्च आणि फायबर यांचं प्रमाण भरपूर असतं.

८. ओटमिल 

ओटमिल म्हणजे ओटचे जाडेभरडे पीठ. हे नाश्त्याला शिजवून खाल्ले असता पोट तर भरतेच पण जाडी वाढायचा प्रश्न येत नाही.

बीटा ग्लुकन यात मुबलक प्रमाणात असल्यामुळे पचन उत्तम रीतीने करते आणि कर्बोदकांचे शोषण कमी करते. त्यामुळे ओट नक्की खावेत.

९. सफरचंद

फळं हा आरोग्यपूर्ण आहाराचा खूप मोठा घटक आहे. त्यातल्या त्यात सफरचंद तर अतिशय उत्तम मानलं जातं. त्यात असलेले पेक्टिन आपली पचनशक्ती वाढवते.

 

apple inmarathi
thefoodmagzine.com

 

त्यातील पाण्याची मात्रा आपली भूक भाग्व्तेच पण आपल्या शरीराला आवश्यक असलेली एनर्जी देते आणि जाडी वाढू देत नाही.

१०. आंबट फळं

लिंबू, संत्री द्राक्षे यामध्ये पण पेक्टिन जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ते पचनशक्ती वाढवते.

 

oranges & grapes inmarathi
pikist.com

 

त्यात असलेले फायबर्स आणि पाण्याचे प्रमाण यांनी पोट भरते. वजन वाढायचा धोकाही राहत नाही. त्यामुळे ही फळे किंवा त्यांचा ज्यूस हा तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरतो.

अशा पद्धतीने तुम्ही योग्य आहार घेतला तर तुम्हाला उपासमार न करता पोट भरून खाऊन आरोग्यपूर्ण पद्धतीने वजन सुद्धा ताब्यात ठेवता येते.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?