' पानशेत धरण फुटण्याच्या आठवणी आजही पुणेकरांच्या अंगावर काटा आणतात – InMarathi

पानशेत धरण फुटण्याच्या आठवणी आजही पुणेकरांच्या अंगावर काटा आणतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘पुणे तेथे काय उणे’ ही म्हण जवळपास संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तुळशीबाग असो की पेठ, कला, शिक्षण, साहित्य असो की पर्यटन पुण्याच्या प्रत्येक भागाने आपली स्वतःची एक वेगळी खासियत निर्माण केली आहे. मात्र आज जितके कठीण, कणखर, स्वावलंबी पुणे आपणाला दिसत आहे त्यामागे तेवढेच मोठे आघात आणि त्याग आहेत.

त्यातीलच एक मोठी आणि दुर्दैवी घटना म्हणजे पानशेत धरण फुटल्यावर झालेली पुण्याची दयनीय अवस्था. या घटनेमुळे पुण्याचा संपूर्ण मोहराच बदलून टाकला होता. आज या घटनेला ६१ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु अजुनही जर आपण आपल्या आजी-आजोबांना या घटनेविषयी विचारलं तर त्यांना ही घटना, कालच घडलेली आहे असेच वाटेल……!

दरवर्षी जुलै महीना आला आणि त्यातही १२ तारीख आली की पुणेरी लोकांच्या मनामध्ये एक धडकी भरते. कारण याचदिवशी १९६१ व्या वर्षी या पानशेत धरणाची भिंत फुटली होती आणि यामुळे पुणेमध्ये सर्वत्र पाणी भरले होते.

 

paanshet im

 

त्या भयंकर दिवसाला आता साठ वर्षे उलटून गेली आहेत, जेव्हा रात्रीच्या मुसळधार पावसानंतर, पानशेत धरणाचे पाणी शहरातून वाहून गेल्यानं, शेकडो घरे आणि हजारो लोक वाहून गेले होते ज्यामुळे पुण्यामध्ये सर्वत्र शोककळा पसरली होती.

पानशेत धरण फुटण्यामागचं कारण म्हणजे या धरणाच्या भिंतीचं बांधकाम कमी दर्ज्याचं होतं आणि यामुळे या धरणाच्या भिंतीमध्ये भेग पडली. यानंतर संततधार पाऊस आणि पाण्याचा दाबामुळे शेवटी १२ जुलैला सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी धरण फुटले.त्यादिवशी फक्त एक बंड गार्डनच्या पूलाचा अपवाद सोडला तर बाकी सगळे पूल पाण्याखाली गेले होते.

शनिवार पेठ, कसबा पेठ, नारायणपेठ, सोमवार पेठ, डेक्कन परिसर हे भाग तर संपूर्णपणे पाण्याखाली गेले होते. त्यानंतर या भागातील लोकांनी चक्क पर्वतीवर आश्रय घेतला होता.

त्याकाळी पुणे आजच्या इतके मोठे नव्हते, त्यामुळे संपूर्ण पुणे पाण्याखाली गेल्याने पुणे सोबतचा संपर्क तुटून गेला होता. या घटनेनंतर पुण्यात तब्बल एक महिना, वीस दिवस वीजपुरवठा नव्हता अणि किमान एक महिना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती.

या आपत्तीमुळे जवळपास संपूर्ण पुणे शहरातील घरे वाहून गेल्यानं, पुणे शहराला नव्याने वसवण्याची गरज निर्माण झाली होती. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लगेचच पुण्याच्या आजुबाजुचे परिसर म्हणजेच आजचे कोथरुड आणि बानेर या जागा पुरग्रस्त लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या.

 

paanshet im 1

 

आतापर्यंत ज्या पुण्यानं आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपून ठेवला होता, तेच पुणे आता नव्याने अस्तित्वात येण्यास म्हणजेच पुनर्जन्म घेण्यास सुसज्ज झालं होतं. परंतु आपल्याला असा प्रश्न पडत असेल की हे धरण फुटण्यामागचे नेमके कारण तरी काय असतील. तर हा धरण बांधण्यामध्ये मातीचा वापर केला जात होता. तसेच त्याकाळी मशीनी उपलब्ध झाल्याने याचे काम जलदगतीने होत होते. परंतु काम झाल्यानंतर लक्षात आले की, एका बाजुची भींत ही कच्ची राहिली आहे. त्यानंतर या भागातून लगेचच गळती सुरु झाली.

यानंतर परिस्थिती लक्षात घेऊन गळती थांबवण्यासाठी लष्कराची मदत घेतली गेली होती. त्यांनी मातीची पोती टाकून गळती रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु याचा काहीही फायदा झाला नाही आणि शेवटी धरण फुटलेच.

या घटनेनंतर पुणे मधील सगळी सरकारी निमसरकारी यंत्रणा पावसाळा सुरु झाला की लगेच सतर्क होऊन जातं. या आपत्तीनंतरच्या दशकांमध्ये अशा धरणांमध्ये बरीचशी सुधारणा केली गेली. तसेच पुणे महानगरपालिका (PMC) कडे आता एक नियुक्त आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे आणि अशा प्रकारच्या आपत्ती टाळल्या जातील याची खात्री करण्यात ही टीम सतत गुंतलेली असते.

 

paanshet im 3

कोल्हापूर-सांगलीत नेहमी येणाऱ्या पुरामागची कारणं सर्वांनाच काळजीत टाकणारी आहेत

२ दिवसांत ६ कोटी लिटर पाणी साठवण्याची किमया करणारा महाराष्ट्राचा शेतकरी!

१९५० पर्यंत पुण्याला पाणीपुरवठा करणारं धारण होत ते म्हणजे खडकवासला मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे आणि उन्हाळ्यात या धरणाचे पाणी कमी पडत असल्याने मुठा नदीची उपनदी असणाऱ्या अंबड नदीवर पानशेत धारण बांधण्याचे ठरवले. १९५७ चाय दरम्यान हे धरण बांधण्यास सुरवात केली होती. १९६२ पर्यंत याचं काम पूर्ण झालं होत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?