' ललित मोदींच्या कॅन्सरग्रस्त पत्नीला मदत केली म्हणून सुषमा स्वराज अडचणीत आल्या होत्या...

ललित मोदींच्या कॅन्सरग्रस्त पत्नीला मदत केली म्हणून सुषमा स्वराज अडचणीत आल्या होत्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या दोन तीन दिवसांपासून बातम्यांमध्ये आपण केवळ पाऊस पाऊस आणि पाऊस या संबंधी बातम्या ऐकत होतो. शिंदे सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील कुरबुरी मधून मधून माध्यम आपल्याला सांगत असतातच. काल आणखीन एक बातमी वाऱ्यासारखी पसरली ती म्हणजे ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांच्या प्रेमप्रकरणाची.

ललित मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपण सुश्मिता सेनला डेट करत आहोत अशी पोस्ट टाकली. भारतातून पसार झालेला ललित मोदी सध्या लंडनमध्ये सुश्मिता सोबत आपली प्रेमकहाणी रचत आहे. खरं तर ललित मोदी हे नाव ऐकलं की आठवत ते म्हणजे IPL.

 

lalit im

 

गेल्या दशकभरापासून भारतीयांना वेड लावणाऱ्या IPL लीग चा सर्वेसर्वा म्हणजे ललित मोदी. पण साहेबांनी लीगमध्ये बरेच घोटाळे केले आणि देशातून पसार झाला. मूळचा दिल्लीकर असलेला ललित तसा खानदानी माणूस घरात व्यवसायाची परंपरा, त्याचे आजोबा गुजरामल खरं तर उद्योगसम्राट मात्र नातवाने उद्योग बरेच केले मात्र त्यात घोटाळे देखील केले.

अनेक वर्ष गायब असलेला ललित चर्चेत आला तो सुश्मितामुळे, मात्र ललितची पहिली लव्ह स्टोरी देखील तितकीच रंजक आणि मसालेदार आहे. आपल्या आईच्या मैत्रिणीशी सूत जुळवणारा ललित बायकोच्या कॅन्सरच्या उपचारामध्ये चांगलाच हताश झाला होता. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याने आपली हळहळ व्यक्त केली होती.

भारतात पुरेशी सुविधा नसल्याने ललितने आपल्या बायकोच्या उपचारासाठी परदेशात जाण्याचा विचार केला, आधीच तो IPL घोटाळ्यात अडकल्याने त्याच्यावर बंधनं टाकण्यात आली होती. तेव्हा परदेशात जाण्यासाठी कामी आल्या त्यावेळच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज. सुषमा स्वराजला मदत केली खरी मात्र त्यानंतर त्याच अडचणीत आल्या होत्या…

नेमका आरोप काय होता :

विरोधकांच्या मते, सुषमा स्वराज यांनी ललित मोदींना त्यांच्या पत्नीच्या कॅन्सर उपचारांसाठी पोर्तुगालला जाण्यासाठी त्यासंबंधीची कागतपत्रे मिळवण्यासाठी मदत केली.

 

lalit im 2

 

नेमकं काय म्हणाल्या सुषमा स्वराज :

ही घटना २०१५ सालातली जेव्हा नुकतंच मोदींच सरकार येऊन १ वर्ष झालं होत. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या. विरोधकांनी सातत्याने त्यांच्यावर ललित मोदीला लंडनला जाण्यासाठी मदत केली असा आरोप करत होते. मात्र सुषमा स्वराज यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.

त्या असं म्हणाल्या होत्या की, ललित मोदींना ट्रॅव्हल व्हिसासाठी मी कोणत्याही ब्रिटिश अधिकाऱ्याशी संपर्क केलेला नाही, माझ्यावर जे आरोप केले जात आहेत ते संपूर्णपणे निराधार आहेत. ललित मोदींच्या प्रवासासाठी मी कोणतीही शिफारस केलेली नाही.

त्या पुढे असं म्हणाल्या की, इकॉनॉमिक टाईम्सने युकेच्या सरकारला विचारलेल्या एका प्रश्नावर त्या सरकारने उत्तर दिलं की ललित मोदींच्या प्रवासाची सर्व कागपत्र ही नियमानानुसारच झाली आहेत. त्यामुळे हा वाद संपलेला आहे तरी देखील विरोधक सातत्याने हा मुद्दा लावून धरत आहेत.

 

sushma swaraj inmarathi
nenow.in

 

पुढे सुषमा स्वराज असंही म्हणाल्या होत्या की, मी जे काही केलं ते मानवतावादी दृष्टिकोन ठेवून केलं, त्यानं मला जेव्हा सांगितलं की युकेसाठी कागपत्र पाठवली आहेत तेव्हा मी ब्रिटिश आयुक्तांना सांगितलं ललित मोदींच्या कागदपत्रांची तपासणी ब्रिटिश कायदे नियमानुसार करावी. तसेच पत्नीला कॅन्सर असल्याने त्याची उपस्थिती तिथं असणं महत्वाचं होत. मी एका भारतीय महिलेला मदत केली आहे. मला विरोधी पक्षाला विचारायचं आहे की मी काय गुन्हा केला आहे? तस असेल तर मी परिणाम भोगायला तयार आहे.

विरोधकांनी राजीमानाच्या मागणी :

मोदी सरकारला १ वर्ष पूर्ण होत असतानाच अशी घटना घडल्याने साहजिकच विरोधी पक्षाने सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. काँग्रेसचे रंजीता  राजन असं म्हणाल्या होत्या की सुषमा स्वराज केवळ महिलेचा अँगल घेऊन सभागृहाला फसवत आहेत. मंत्री गरिबांसाठी कोणतंही शिफारस करत नाहीत मात्र करोडपतींना मदत करत आहेत.

 

congress symbol im

घोटाळ्यांमुळे ललित मोदी कुप्रसिद्ध, मात्र त्यांच्या आजोबांनी भारतात उभारलं उद्योगाचं साम्राज्य

मल्ल्या आणि मोदी सारखे आर्थिक गुन्हे करणारे लपण्यासाठी `या’ देशाचीच निवड का करतात

या संपूर्ण प्रकरणात सुषमा स्वराज यांच्यासोबत वसुंधरा राजे देखील होत्या असे आरोप केले जात होते. खुद्द ललित मोदीने हे एका मुलाखतीत सांगितलं होत. भाजपने मात्र या प्रकरणात सुषमा स्वराज यांना पाठिंबा दिला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?