'असुरी प्रवृत्तीत घुसमटणारं 'स्त्रीत्व'...

असुरी प्रवृत्तीत घुसमटणारं ‘स्त्रीत्व’…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका – ज्योती थोरवत 

खूप दिवस यावर लिहायचं होतं पण आज जमलं. बहुतांशी पुरुषांना हा विषय आवडणार तर नाहीच शिवाय माझा रागही येईल.

असो, पण ज्याला हे पटेल तो नक्कीच खरा “पुरुष आणि पुरुषार्थ” असेल.

“Not Only misses Raut” हा मराठी चित्रपट बऱ्याच वर्षांपूर्वी आला होता, ज्यामधे स्त्रीच्या आयुष्यातील वेगवेगळया घटना, तिला स्त्री म्हणून जगत असताना सहन करावे लागणारे जाच, प्रत्येक ठिकाणी करावा लागणारा संघर्ष-स्वत्व टिकवण्यासाठी, स्वतःचं स्रीत्व टिकवण्यासाठी, स्वतःचं आयुष्य स्वतः च्या मनाप्रमाणे जगण्यासाठी आणि मुख्य म्हणजे या सगळ्या सुशिक्षित, working women होत्या.

पण तरीही त्या पुरुषांच्या वर्चस्वाखाली दडपुन गेलेल्या.

त्यातले डायलॉगही इतके जबरदस्त होते की, ऐकल्यावर पटकन आपली परिस्थिति काय आहे, हे आठवावं.

 

not only mrs. raut InMarathi

 

१) “भर सभेत साडीच्या निरिला हात घालायचा मग कितीही धाडशी, भक्कम विचारांची बाई असो ती कोलमड़तेच..!!” एका स्त्री न्यायाधिशाच्या तोंडी होतं हे वाक्य.

२) “जेव्हा फिजिकली मारामारी करायची वेळ येते तेव्हा स्त्री कमीच पड़ते पुरुषासमोर…!!” हे स्त्री वकीलने बोललयं. (निसर्गानेच तशी रचना केलीये पण तिचा गैरवापरच जास्त होतो).

अगदी “लज्जा” या हिंदी चित्रपटामधेही अश्याच अनेक स्त्रीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय. अनेक मुद्दे मांडलेत अगदी परदेशातून कथेस सुरवात होते अन शेवट भारतातील एकदम दुर्गम खेड्यात होतो.

 

lajja InMarathi

 

पण स्त्रीचं आयुष्य काहीच वेगळं नाही हे त्यात दाखवलय. कुठेही जा स्त्रीला(पत्नीला) मिळणाऱ्या वागणुकीमध्ये विशेष फरक नाही, दुर्दैवाने हे चित्रपट जास्त कुणी पाहिले नाहीत, मुख्यत्वेकरून स्त्रीयांनीचं.

असो, यातला मुद्दा असा की, भलेही स्त्री कमावती आहे, आत्मनिर्भर आहे, तिला स्वतःचे विचार आहेत, तिच्याही इच्छा आहेत, स्वप्न आहेत, भावना आहेत, तिला तिचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे, मर्यादा आहेत म्हणून ती स्वैराचारही करत नाही.

पण मुळात ही पुरुषप्रधान संस्कृती आणि त्या संस्कृतीत वाढलेले पुरुष मान्य करुच शकत नाहीत. स्त्री म्हणजे निव्वळ उपभोगाचं साधन आणि ते आपण म्हणेल तेव्हा समोर तयार पाहिजे अशी पारंपारिक सडलेली पुरुषी मानसिकता.

 

women InMarathi

 

दिवसभर सगळं काही निट वागतीलं पण रात्रीच्यावेळी पुरुषातला “माणूस” जिवंत नसतोच फक्त एक “पुरुष “जागा असतो. त्यातल्या पुरुष नावाच्या जनावाराला फक्त स्त्रीचं शरीर ओरबाडायचं असतं आणि आपला पुरुषीपणा सिद्ध करायचा असतो.

 

couple 1 InMarathi

 

त्यामुळे तो स्त्रीच्या मनाचा, तिच्या मताचा विचार तर करतच नाही, अगदी एखादी स्त्री स्पष्टपणे नाही बोलली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा अगदी मारझोडही केली जाते आणि बऱ्याचवेळी स्त्री मनाने तयार नसतेच.

ती फक्त तिच्या नवऱ्याचं/प्रियकराचं मन राखण्यासाठीचं ती नाईलाजाने स्वतःचे शरीर पुरुषाच्या हवाली करत असते, पण काळोखाचा किलविष ही गोष्ट पुरुषांच्या लक्षात येवू देत नाही, तो इतका हावी होतो की दिवसाही ही गोष्ट त्यांच्या लक्षात नाही येत की, आपण आपल्या पत्नीशी बरोबर वागतो/वागलो का?

माहीत नाही असं किती पुरुष त्यांच्या बायकोच्या “नकाराचा” आदर करतात, तो मान्य करतात आणि त्या नकारामगचं कारण जाणून घेवून त्यावर तोडगा काढतात???

 

indian couple fight inmarathi

 

स्त्रीही थकलेली असू शकते, काही ताणतणावाखाली असू शकते, तिची इच्छा नसू शकते. आजारी असू शकते पण ही बाजू जाणून घेतातच कोण आणि किती जण? जर का नकार दिला तर लगेच पुरुष तिच्या चारित्र्यावर संशय घेणार.

जसं रामाने सीतेला तिची पवित्रता सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा देण्यास भाग पाडलं, का पण असं?

 

indian couple feature InMarathi

 

शास्त्रीयदृष्टया शारीरक संबंधामध्ये स्त्री जास्त उद्द्युक्त आणि उतावीळ असते, पण ते केव्हा जर तिला तिच्या कलाने घेतलं, तिला तिची space दिली, तिच्या मनाचा, मतांचा विचार केला तरच.

“जसं आपण एखाद्या फुलपाखराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावलो तर ते कधीच सापडत नाही आणि सापडलच तरी ते निपचित पडून राहतं, पण जर त्याला हवी तशी फुलं उपलब्ध करून दिली, तर ते स्वतःहून हातावर बसेल स्त्री ही तशीच असते.”

 

unhappy_couple_in_bed-Inmarathi

 

पण पुरुषांना हे माहितचं नसतं त्यांना वाटतं की ही प्रतिसादच देत नाही किंवा हिच्यातच काही प्रॉब्लम आहे.

स्त्रीचा सर्वात मौल्यवान दागिना तिचं शील, चारित्र्य आहे जे ती तिच्या नवऱ्यावर विश्वास ठेवून सोपवते. पण जर हे समजुन न घेताच फक्त आपली असुरी भूक मिटवण्यासाठी आधाश्यासारखं तिच्या शरीरावर तुटून पडायचं, तिच्या शरीराची विटंबना करायची मग काय आदर राहील तिच्या मनात पुरुषांबद्दल, तिच्या नवऱ्याबद्दल?

फक्त पुरुषाच्या अश्या वागण्याने दोघेही असमाधानीच राहतात. पण इथे स्त्रीला काय हवे याचा विचार कितीवेळा होतो हाच मुद्दा आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com |वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com |त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?