' ‘वख्खा विख्खी वुख्खू’ अशोकमामांचा अजरामर डायलॉग जन्माला येण्यामागे आहे खास किस्सा – InMarathi

‘वख्खा विख्खी वुख्खू’ अशोकमामांचा अजरामर डायलॉग जन्माला येण्यामागे आहे खास किस्सा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अशोक सराफ म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके अशोकमामा हे मराठी चित्रपटसृष्टीतलं लाडकं व्यक्तिमत्व. त्यांना ‘विनोदाचा बादशाह’ म्हटलं, तरीही वावगं ठरू नये. मामा त्यांच्या चित्रपटांमधून आणि नाटकांमधून कायमच लोकांना मनमुराद हसवतात.

अशोक मामांचं विनोदाचं टायमिंग इतकं जबरदस्त आहे, की आजही त्यांचे अनेक डायलॉग्स लोकप्रिय आहेत. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या डायलॉग्सवर आजही मिम्स बनवले जातात आणि ते तुफान व्हायरल देखील होतात.

 

ashok saraf inmarathi

 

चित्रपटाचं शूटिंग म्हटलं, की किस्से हे होणारच. कलाकार वेगवेगळ्या लोकेशन्सवर काम करत असतात. आता शूटिंग करताना परिस्थितीप्रमाणे काही विनोद होतात, आणि हसता- हसता केलेलं काम अजरामर होतं.

खरंतर फक्त कलाकारच नाहीत, तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांसोबतही अशी गोष्ट बऱ्याचदा घडते, सहज- किंवा आपल्याही नकळत आपल्या हातून काहीतरी काम घडतं आणि तेच सगळ्यांना खूप भावतं. ऑफिसमध्ये – किचनमध्ये तर अशा गोष्टी हमखास घडतात.

धुमधडाका या चित्रपटातील ‘वख्खा विख्खी वुख्खू’ हा अशोक मामांचा अजरामर डायलॉग सगळ्यांनाच आठवत असेल, या डायलॉगमागेही अशीच ‘सहज’, नकळत झालेली एक गोष्ट आहे.

 

ashok mama im

 

महेश कोठारे यांना हिंदीतील एका चित्रपटाचा रिमेक करायचा होता. ‘प्यार किये जा’ हे त्या चित्रपटाचं नाव. आणि त्याचा रिमेक म्हणेज धुमधडाका. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ या जोडीने आपल्या अभिनयाने या चित्रपट चांगलाच गाजवला होता.

या चित्रपटात अशोक मामा ‘यदुनाथ जवळकर’ हे पात्र साकारत होते. ‘वख्खा विख्खी वुख्खू’ या तीनच शब्दांनी लोकांची मन जिंकली, पण हा डायलॉग त्यांना सुचला कसा, यामागे कोणता किस्सा घडला होता का?

एका टेलिव्हीजन शो मध्ये त्यांनी या डायलॉगमागचा किस्सा सांगितला. हा डायलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हताच मुळी. हा डायलॉग म्हणताना मामांना तोंडात स्मोकिंग पाईप ठेवायचा होता. त्यामुळे संवाद म्हणताना त्यांना ठसका लागलाआणि त्याचवेळी या डायलॉगचा जन्म झाला.

सेटवर सगळ्यांनाच ही स्टाईल खूप आवडली आणि म्हणून पुढे चित्रपटातही मामांनी तीच स्टाईल ठेवली. आणि आज तो डायलॉग सुप्रसिद्ध आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?