' रेड, ऑरेंज आणि यलो… पावसासाठी दिल्या जाणाऱ्या अलर्टचा नेमका अर्थ काय?? – InMarathi

रेड, ऑरेंज आणि यलो… पावसासाठी दिल्या जाणाऱ्या अलर्टचा नेमका अर्थ काय??

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो तुम्ही अनेकदा फुटबॉल मॅच पाहिली असेल आणि त्यात खेळाडूंना पेनल्टीची संधी देण्यापासून ते वार्निंग देण्यापर्यंत वेगवेगळी आणि वेगवेगळ्या रंगांची कार्डस पंचांकडून खेळाडूंना दाखवली जातात हे ही तुम्हाला माहिती असेलच . त्यानुसार खेळाडूंकडून कृती केली जाते. हा त्या खेळाचा नियम आहे.

ही झाली खेळातली गोष्ट. पण तुम्हाला माहिती आहे का वातावरणातील बदलांसाठी, नैसर्गिक आपत्तींसाठी, पावसासाठी हवामान खात्याकडून देखील असे वेगवेगळ्या रंगांचे अलर्टं दिले जातात.

शक्यतो असे निर्देश हे पावसाळ्यात, अचानक येणारे वादळ, त्यामुळे पडणारा पाऊस अथवा पूर अशा आपत्तींसाठी दिले जातात.

 

alert im

 

काय असतात या रंगांचे अर्थ? किंवा त्यामागची धोक्याची तीव्रता? या गोष्टी जाणून घेणे खूपच गरजेचे आणि आवश्यक आहे. तेव्हा या लेखातून चला या अलर्ट विषयी आणि त्यामागच्या धोक्याच्या सूचनेविषयी जाणून घेवू.

राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, रायगड,पुणे, नांदेड, गोंदिया, नवी मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं थैमान घातलंय. कोकणातही पावसाचं धुमशान सुरू असताना आता हवामान खात्याकडून महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी केला आहे.

 

rainy season IM

 

यामुळे सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अतिआवश्यक कामासाठी बाहेर पडा असं सांगण्यात आलं आहे.

अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक संकटांच्या वेळी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातो.

आपत्तीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, येलो, ऑरेंज किंवा रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. रंगाच्या तीव्रतेनुसार आलेल्या किंवा येवू घातलेल्या नैसर्गिक संकटाची तीव्रता समजते. रेड, ऑरेंज , यल्लो आणि ग्रीन असे चार प्रकारचे अलर्ट वापरले जातात.

१. रेड अलर्ट :

जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता! त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात.

नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहावं, यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाणं टाळावं.

 

red im

 

रेड अलर्टच्या वेळी मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते.

२. ऑरेंज अलर्ट :

हवामान खात्याकडून मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो.

याचा अर्थ असा की, कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून हा अलर्ट देण्यात येतो.

गरज असेल आणि महत्त्वाचं काम असेल तर घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या, असंही या अलर्टमध्ये सांगितलं जातं.

 

rain 1 im

 

वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केलेली असते.

३. यलो अलर्ट :

हवामान खात्याकडून अनेक शहरांना यलो अलर्ट दिला जातो.

याचा अर्थ असा होतो की, संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता असून आगामी काही दिवसांमध्ये हवामानातील बदलामुळे नैसर्गिक संकट ओढवू शकतं,

 

tree fall im

 

जुन्या मालमत्ता, इमारती पडू शकतात, वादळामुळे रस्त्यावर झाडे पडू शकतात, दैनंदिन कामं रखडू शकतात. अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यासाठी आणि सावधगिरी बाळगण्याच्या हेतून येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

४. ग्रीन अलर्ट :

ग्रीन अलर्ट हा सर्वसामान्य परिस्थितीमध्ये असतो. याचा अर्थ कोणतंही संकट नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे.संबंधित शहरांमध्ये पावसाची परिस्थिती सामान्य असेल. यावेळी कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते.

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्यामुळे मुंबई-ठाण्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि महाराष्ट्रातील इतर अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट दिला आहे.

 

rain mumbai im

 

या सर्व परिस्थितीत एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. तेव्हा मित्रांनो महत्वाच्या कारणाशिवाय घरातून बाहेर पडण्याची रिस्क घेवू नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?