' छ. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं उगमस्थान हेच आपलं खरं तीर्थस्थान : रायरेश्वर!

छ. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं उगमस्थान हेच आपलं खरं तीर्थस्थान : रायरेश्वर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत! किंवा सगळ्या भारत देशाचं, अवघ्या हिंदुस्तानचं दैवत शिवाजी महाराज आहेत, असं म्हटलं तरी ते फारसं चुकीचं ठरणार नाही.

महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवरायांनी केली. स्वराज्याचं स्वप्न साकार करणारा पहिला राजा, असा त्यांचा उल्लेख केला तरी तो चुकीचा ठरू नये.

‘जाणता राजा’ अशी ज्यांची ओळख असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, हिंदवी स्वराज्याची निर्मिती करण्याची शपथ घेतली, ती रायरेश्वराच्या मंदिरावर! या ऐतिहासिक शपथविधीचं स्थान असणाऱ्या रायरेश्वराविषयी आज जाणून घेऊया.

 

raireshwar im1

 

इथे आहे रायरेश्वर…

पुण्यातील भोर तालुक्यात समुद्रसपाटीपासून जवळपास १३३६ मीटर उंचीवर असणारं रायरेश्वर मंदिर, हे पूर्वी रोहिरेश्वर नावाने ओळखलं जात असे. त्याकाळात याभागात दादाजी नरस प्रभू यांची जहागिरी होती.

रायरेश्वराच्या पूजेसाठी आणि नियमित कामासांठी त्यांनी जवळच एक नाव गाव वसवलं. तत्कालीन राज्यकर्ता आदीलशाह याला मात्र ही बाबा अजिबात रुचली नाही.

दादोजींची सुभेदारी जाऊन घोरपडे यांना सुभेदारी देण्यात आली. कालांतराने शाहजीराजे भोसले आणि आदिलशाह यांच्यात समेट घडून आला. त्यामुळे या प्रांताची सुभेदारी पुन्हा दादोजी कोंडदेव यांच्याडे आली.

असे जमू लागले मावळे…

 

oath im

 

कान्होजी जेधे आणि शहाजीराजे यांचे चांगले संबंध होते. कान्होजी हे बाजी पासलकर यांचे जावई, त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या भोवताली मावळे जमू लागले त्यावेळी हे दोघेही त्यांच्यासह होते. महाराजांना साथ देणाऱ्या सुरुवातीच्या व्यक्तींपैकी हे दोघे आहेत. याशिवाय तानाजी मालुसरे यांनी सुद्धा शिवाजी महाराजांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता.

हळूहळू मावळ्यांची संख्या वाढू लागली. पावसाळ्याचे चार महिने शेतीभाती सांभाळणारी ही मंडळी, इतर दिवसांमध्ये शश्त्रास्त्र चालवायला शिकू लागली. राजमाता जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. बघता बघता मावळ्यांची संख्या हजाराचा आकडा पार करून गेली.

रोहीड खोरे या परिसराकडे मावळ्यांनी लक्ष वेधलं. हा भाग स्वराज्यात सामील करून घेण्याचं ठरवलं गेलं. दादोजी प्रभू यांनी शिवरायांना साथ द्यायचा निर्णय घेतला आणि खोऱ्याची सात हमहाराजांना लाभली.

तानाजी, दादोजी, येसाजी कंक, बाजी पासलकर या आणि अशा अनेक मावळ्यांसह शिवबांनी रायरेश्वराचं मंदिर गाठलं. तिथेच घेतली गेली, स्वराज्याची शपथ!

स्वराज्याचं तोरण..

१६४५ साली वयाच्या १६ व्या वर्षीच मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. अदिलशाहीसारख्या बड्या साम्राज्याशी टक्कर घेण्याची तयारी दर्शवली. मावळात नवा उत्साह संचारला. मावळ प्रांत जणू बदलून गेला होता.

त्यानंतर राजगडाच्या निर्मिती सुरु करण्यात आली. आदिलशहाच्या नजरेत ही बाबा सुद्धा खटकणारी होती. दादाजी यांना पत्र लिहून त्याने नाराजी व्यक्त केली. त्यांचे वडील नरसोबा यांची मात्र यामुळे चिंता वाढली.

छत्रपती शिवबांनी ही चिंता दूर करण्याचं काम केलं. त्यांना धीर दिला. एवढंच नाही, तर तोरणा जिंकून घेत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं आणि रायरेश्वरावर घेतलेल्या शपथेप्रमाणे नवी वाटचाल सुरु झाली.

असं आहे हे प्राचीन मंदिर…

 

raireshwar im

 

रायरेश्वर पठाराचा विस्तार जवळपास १६ किमी इतका आहे. या पठाराच्या आजूबाजूने तुंग, तिकोना, लोहगड-विसापूर, केंजळगड, कमळगड, प्रतापगड, विचित्रगड, मकरंद गड असे अनेक किल्ले आहेत.

रायरेश्वर मंदिर परिसरात एक शिवकालीन पाण्याची टाकी, जननी देवीचे मंदिर, पांडवकालीन लेणी, गोमुखकुंड, अस्वलखिंड अशा इतरही बघण्यासारख्या जागा आहेत.

रायरेश्वर मंदिर पांडवकालीन असल्याचं तेथील स्थानिक सांगतात. या मंदिराचं स्थापत्य शास्त्र पाहिल्यास, या म्हणाल्याला ऐतिहासिक पुरावे असल्याचं सुद्धा सिद्ध होतं.

रायरेश्वराच्या परिसराची आणखी एक खासियत म्हणजे तिथे असणारी विविध रंगी माती! हे विविध रंग रायरेश्वराचं सौंदर्य अधिक खुलवतात. मंदिराच्या गाभाऱ्यात एक स्वयंभू लिंग आहे. या गाभार्याच्या भिंतीवर शपथविधीचं एक उत्तम छायाचित्र सुद्धा पाहायला मिळतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?