' गौतम बुद्ध म्हणजेच गरजणारा सिंह! भारतीय संस्कृतीची अशीही ओळख सांगणारा अशोक स्तंभ!

गौतम बुद्ध म्हणजेच गरजणारा सिंह! भारतीय संस्कृतीची अशीही ओळख सांगणारा अशोक स्तंभ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘सत्यमेव जयते’ हे आपलं ब्रीदवाक्य आहे. कोणत्याही नाण्यावर किंवा नोटेवर जेव्हा आपण हे ब्रीदवाक्य आणि अशोकस्तंभाचं चिन्ह बघतो तेव्हा “सत्याचा नेहमीच विजय होतो” हा विश्वास द्विगुणित होतो. अशोकस्तंभात असलेले तीन सिंह जर आपण लक्ष देऊन बघितले तर प्रत्येक सिंह जगाला हे गर्जना करून सांगत आहे असा भास होतो.

राष्ट्रचिन्ह हे त्या देशाचं शासन, संस्कृती आणि विचारधारा प्रतीत करणारं चिन्ह मानलं जातं. अशोकस्तंभ हे भारताचं राष्ट्रचिन्ह आहे, हे भारताची राज्यघटना आणि भारताची सार्वभौम शक्ती यांचं ते प्रतिक आहे.

भारताचं राष्ट्रचिन्ह असलेलं अशोकस्तंभ हे भारताच्या नवीन संसदेच्या इमारतीवर असावं असं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न होतं. संसदेची नवीन इमारत पूर्णत्वास येण्यासाठी अजून कालावधी आहे. पण, त्या आधी संसदेच्या इमारतीवर असलेल्या अशोकस्तंभाच्या मूर्तीचं ११ जुलै रोजी पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. आपल्या नियोजित वेळेच्या सहा महिने आधी अशोकस्तंभाचं झालेलं हे उदघाटन सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.

२० फूट उंची आणि ९५०० किलो कांस्य धातूने तयार केलेली ही मूर्ती बहुतांश लोकांना आवडली आहे. पण, काही लोकांना या मूर्तीतील सिंह हे मूळ अशोकस्तंभात दिसणाऱ्या शांत सिंहांपेक्षा अधिक आक्रमक वाटत आहेत अशा देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. ‘नव्या आक्रमक’ भारताचं हे प्रतिक आहे असं समर्थन करणारे लोक सांगत आहेत.

 

ashok s im

 

भारताचं अधिकृत ‘राष्ट्र चिन्ह’ म्हणून अशोकस्तंभाची रचना करतांना, निवड करताना आणि त्याला भारताच्या चलनावर स्थान देतांना कोणता विचार प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवण्यात आला होता ? जाणून घेऊयात.

२६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली आणि तेव्हा अशोकस्तंभ हे आपलं राष्ट्रचिन्ह असेल यावर शिक्कामोर्तब झालं. अशोकस्तंभात अशोक चक्रावर चार आशियातील सिंह आहेत, ज्यापैकी तीन सिंह हे आपल्या दृष्टीस पडतात.

भारताच्या संसदेवर बांधण्यात आलेल्या अशोकस्तंभाच्या मूर्तीच्या प्रकाशित करण्यात आलेल्या फोटोंमध्ये आपल्याला हा चौथा सिंह दृष्टीस पडतो. अशोकस्तंभातील सिंहांच्या डाव्या हाताला आपण घोडे बघू शकतो आणि उजव्या हाताला शेतकऱ्यांचा मित्र असलेला बैल दाखवण्यात आला आहे.

इतिहासात डोकवूयात :

अशोकस्तंभामध्ये असलेलं अशोक चक्र हे बौद्ध धर्मात सांगितलेल्या कायदा किंवा कर्तव्याचं प्रतीक आहे. इसवीसन पूर्व २७३ मध्ये मौर्य वंशाचे तिसरे राजा सम्राट अशोक हे कलिंग युद्धात झालेल्या नरसंहाराला बघून राजगादीचा त्याग करून बौद्ध धर्माच्या शरण गेले होते.

उत्तरप्रदेशात असलेल्या सारनाथ येथे एक स्तंभ उभारला होता. या स्तंभात भद्रा आणि वज्रदत्त या दोन सिंहांच्या चारही दिशांना बौद्ध धर्मात सांगितलेली शांतता पसरवण्याच्या हेतूने ही प्रतिकृती बांधण्यात आली होती.

‘अशोकस्तंभ’ म्हणून प्रचलित झलेल्या या रचनेतील हे सिंह हे भगवान गौतम बुद्धांची शिकवण असलेल्या शक्ती, धैर्य आणि देशाबद्दलचा आदर लोकांपर्यंत पोहोचवेल असा आशावाद राजा अशोकाच्या मनात होता.

 

ashok s 1 im

तिबेटी लोक ज्यांना गौतम बुद्धाचा अवतार मानतात, त्या दलाई लामांची निवड नेमकी कशी होते?

भारतीय राज्यघटनेची तुम्हाला माहित नसलेली ९ वैशिष्ठ्यं…

सारनाथ येथे भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या धर्म उपदेशाला ‘सिंहगर्जना’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हेच कारण आहे की अशोकस्तंभामध्ये सिंहाचा वापर करण्यात आला होता. भगवान गौतम बुद्ध यांच्या नावांमध्ये ‘शाक्य सिंह’ आणि ‘नर सिंह’ यांचा सुद्धा समावेश होतो.

अधिकार कोणाला?

भारताचं राष्ट्रचिन्ह असलेल्या अशोकस्तंभाचा कागदोपत्री वापर हा केवळ सरकारी उच्चपदस्थ करू शकतात. ज्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, उपराज्यपाल, न्यायपालिका आणि इतर सरकारी संस्था यांचा समावेश होतो. सेवानिवृत्त झाल्यावर मात्र कोणताही माजी अधिकारी, लोकसभा सदस्य या राष्ट्रीय चिन्हाचा वापर करू शकत नाहीत.

 

loksabha-inmarathi
thehindu.com

 

भारताच्या राष्ट्रचिन्हाचा दुरुपयोग टाळण्यासाठी २००५ मध्ये सर्वपक्षीय संमतीने एक कायदा पास करण्यात आला आहे. या कायद्या अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने अशोकस्तंभ या राष्ट्रचिन्हाचा जर गैरवापर केला तर त्याला २ वर्षांसाठी अटक केली जाऊ शकते. ज्या सरकारी कागदपत्रावर अशोकस्तंभ हे राष्ट्रचिन्ह असतं त्यावर आपण विश्वास ठेवू शकतो असं आपला कायदा सांगतो.

जगात भारताची प्रतिमा उंचावणाऱ्या भारताच्या राष्ट्रचिन्ह अशोकस्तंभाला आमचा मानाचा मुजरा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?